नवी दिल्ली : Tomato-Potato… तुम्ही कधी वांग्याच्या झाडाला टोमॅटो आणि बटाट्याच्या रोपाला वांग लागलं असल्याचं पाहिलं आहे का? नसेल ना. पण, असं घडलं आहे. आता वैज्ञानिकांनी एका नवीन टेक्निकचा वापर करून एकाच झाडाला टोमॅटो आणि बटाटे उत्पादित करण्याची किमया साधली आहे. मित्रांनो खरे पाहता या टेक्निकला ग्राफ्टिंग असे म्हणतात.
कृषी वैज्ञानिकांनी एक पाऊल पुढे टाकत आता ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी भाजीपाला वर्गीय नाजूक पिकांमध्ये देखील यशस्वी केली जाऊ शकते हे दाखवून दिले आहे. या टेक्निकचा वापर करून कृषी वैज्ञानिकांनी एकाच झाडाला टोमॅटो आणि बटाटे उत्पादित केले आहेत. यामुळे निश्चितच भारतीय शेती हायटेक बनण्याच्या दिशेने मार्गक्रमण करू लागली आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
काय आहे ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजी
हे एक असे शेतीचे तंत्र आहे, ज्याचा जास्तीत जास्त फायदा अल्पभूधारक शेतकरी आणि किचन गार्डन करणाऱ्या शेतकरी बांधवांना होणार असल्याचा दावा केला जात आहे. खरं तर, भारतीय भाजीपाला संशोधन केंद्र वाराणसीच्या शास्त्रज्ञांनी कलमी तंत्राद्वारे अर्थात ग्राफ्टिंग टेक्नॉलॉजीचा वापर करत देशात प्रथमच भाजीपाला पिकवण्यात यश मिळविले आहे. या तंत्राद्वारे बटाटा आणि टोमॅटो, वांगी आणि मिरची एकाच वेळी तयार केली जाऊ शकतात. त्याला पोमॅटो आणि ब्रिमेटो असे नाव देण्यात आले आहे. या तंत्राद्वारे एकाच रोपातून दोन प्रकारच्या भाजीपाला छोट्या ठिकाणी किंवा कुंडीत पिकवता येते .
इतर भाज्या विकसित करण्यासाठी देखील संशोधन सुरु
कृषी शास्त्रज्ञ सुदर्शन कुमार मौर्य स्पष्ट करतात की, टोमॅटो आणि बटाटा एकाच वनस्पतीमध्ये कलम तंत्राचा वापर करून लागवड करता येते. त्याला पोमॅटो असे नाव देण्यात आले आहे. याशिवाय भाजीपाला संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांनी अशी रोपे विकसित केली आहेत जी जास्त पाण्यातही वाया जाणार नाहीत. या अंतर्गत शास्त्रज्ञांनी टोमॅटोची अशी विविधता विकसित केली आहे जी कमी पाण्यात किंवा जास्त पाण्याच्या स्थितीत तग धरू शकते.
कसे तयार होते टोमॅटो आणि बटाटा ग्राफ्टिंग
टोमॅटो आणि बटाटे एकत्र वाढवण्यासाठी, बटाट्याचे रोप जमिनीच्या सहा इंच वरपासून कलम केले जाते. कलम करण्यासाठी झाडे आणि देठांची लांबी सारखीच असावी. कलम केल्यानंतर 20 दिवसांनी दोन्ही झाडे जोडली जातात आणि ती शेतात लावली जातात. लावणीनंतर दोन आठवड्यांनी टोमॅटोची काढणी सुरू करता येते. मग जेव्हा टोमॅटोची रोपे सुकतात, त्यानंतर तुम्ही बटाटे देखील काढणी करू शकता. अगदी याचंप्रमाणे वांगी आणि टोमॅटोची कलमे केली जातात.
अशी घेतली काळजी
वांगी आणि टोमॅटोची संतुलित वाढ व्हावी यासाठी सुरुवातीच्या टप्प्यात जास्त काळजी घेण्यात आली. शास्त्रज्ञांनी गरजेनुसार रोपाला खत दिलं. ब्रिमॅटोच्या एका झाडापासून 2.383 किलो टोमॅटो आणि 2.64 किलो वांग्याचं उत्पादन मिळालं, अशी माहिती या शास्रज्ञांनी दिली. ग्राफ्टिंग तंत्रानं तयार केलेली वनस्पती कमी वेळेत आणि कमी जागेत जास्त भाजीपाला उत्पादन देण्यात सक्षम आहे.
शहरी भागातील नागरिकांसाठी फायदेशीर
शहरी भागात राहणाऱ्या नागरिकांसाठी ताजा भाजीपाला मिळण्यासाठी नवा प्रयोग फायदेशीर आहे. शहरातील लोक टेरेस गार्डन द्वारे हा प्रयोग करुन एकाच झाडाला वेगवेगळा फळभाज्या मिळवू शकतात.