मुंबई : देशातील प्रमुख बाजारपेठात आजचे कपाशी बाजारभाव आपण “ॲग्रोवर्ल्ड”च्या माध्यमातून जाणून घेऊ. आज, शनिवार, 7 ऑक्टोबर 2023 रोजी देशाच्या बाजारपेठेतील कापसाचे भाव काय आहेत, ते जाणून घेणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी नक्कीच फायद्याचे ठरेल.
भारत कापूस उत्पादनात जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे. देशात दरवर्षी सुमारे 6 दशलक्ष टन कापसाचे उत्पादन होते, जे जागतिक कापूस उत्पादनाच्या 23% आहे. भारतात कापसाचे सर्वाधिक उत्पादन गुजरात राज्यात होते. देशातील प्रमुख नगदी पीक असलेले कापूस योग्य वेळी बाजारात विकून अनेक शेतकरी चांगला नफा कमावतात. सध्या कापसाच्या भावात दररोज 200 ते 300 रुपयांची चढ-उतार पाहायला मिळत आहे.
गेल्या काही दिवसांच्या तुलनेत आज कापसाच्या दरात वाढ झाली आहे. देशातील विविध बाजारपेठांमध्ये कापसाच्या दरात ही वाढ झाली आहे.
शनिवार, 7 ऑक्टोबर : आजचा कापूस बाजारभाव
आज कापसाचा बाजारभाव 8,000 ते 9,500 रुपयांपर्यंत दिसून येत आहे. भारत सरकारने 2023-24 मध्ये कापसाच्या किमान आधारभूत किमतीत (MSP) वाढ करून नवी किंमत निश्चित केली आहे. यामध्ये मध्यम फायबर कापसाचा भाव 5,515 वरून 5,726 रुपये प्रति क्विंटल तर लांब फायबर कापसाचा भाव 5,825 वरून 6,025 रुपये प्रतिक्विंटल झाला आहे. इच्छुक शेतकरी या शासकीय दराने कापूस विकू शकतात. खुल्या, खासगी बाजारात आज कापसाचा भाव 7,690 रुपये ते 10,535 रुपये इतका आहे.
देशातील प्रमुख बाजार समितीतील भाव
रोहतक – 9,520 रुपये प्रति क्विंटल
फतेहाबाद – 9,570 ₹
एलनाबाद – 9,560 ₹
भेसन – 10,950 ₹
मेहम – 9,510 ₹
सिरसा – 9,540 ₹
हिस्सार, हरियाणा – 9,550 ₹
आदमपूर – 9,550 ₹
रतिया – 9,580 ₹
धोराजी – 10,920 ₹
महुवा स्टेशन – 10,040 ₹
जामनगर – 10,960 ₹
भावनगर – 10,950 ₹
अमरेली – 10,010 ₹
गोंडल – 11,000 ₹
राजकोट, गुजरात – 11,000 ₹
आंध्र प्रदेश – 9,950 ₹ (सरासरी)
गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव, शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी
या दिवसांत कापूस पिकांवर गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. या गुलाबी बोंडअळीने गतवर्षी पिकाचे मोठे नुकसान केले होते, त्याचा परिणाम उत्पादनावर दिसून आला, तसेच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागले. खरीप हंगामातील या प्रमुख नगदी पिकावर या कालावधीत रोगाचा प्रादुर्भाव दिसून आल्यास कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य कीटकनाशकांचा वापर करावा.
सूचना :- बाजार समितीतील आवकनुसार दरात बदल होऊ शकतो. तरी शेतकऱ्यांनी संबंधित बाजार समिती व व्यापाऱ्यांशी संपर्क साधूनच शहानिशा करावी. याचा ॲग्रोवर्ल्डशी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या कोणताही संबंध नसेल.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇
- कृषी सल्ला : कापूस पाते व बोंड गळ कशी रोखावी
- कृषी सल्ला : मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव कसा रोखावा