Home हवामान अंदाज राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

राज्यात आजपासून तीन दिवस पावसाचे..; 23 जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’

मुंबई – तळकोकणात बरेच दिवस निष्क्रिय राहून नंतर अवघ्या दोन दिवसात संपूर्ण महाराष्ट्र व्यापल्यानंतर काहीसा रेंगाळलेला मान्सून आता राज्यात पुन्हा एकदा नव्याने सक्रिय झाला आहे. पश्चिमेकडील वारे समुद्रसपाटीपासून सुमारे दीड किलोमीटर उंचीपर्यंत अधिक मजबूत झाले असून, उत्तर सोमालिया किनारपट्टीलगत कमी दाबाचा जेट प्रवाह सक्रिय झाल्याने पावसासाठी अत्यंत पोषक वातावरण निर्माण झाले आहे. भारतीय हवामान विभाग (आयएमडी)च्या माहितीनुसार, राज्यात आज(शनिवार) पासून पुढील तीन दिवस राज्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. राज्यातील तब्बल २३ जिल्ह्यांना पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. मान्सूनच्या या दमदार पुनरागमनामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

जूनमध्ये आजवर महाराष्ट्रात 59% तर देशभरात 42% तूट* जूनमध्ये आजवर महाराष्ट्रात 59% तर देशभरात 42% तूट आहे. 26 जूनअखेर, राज्यात विभागनिहाय तूट पुढीलप्रमाणे आहे - कोकण-गोवा: 59% मध्य महाराष्ट्र: 64% मराठवाडा: 51% विदर्भ: 55%
जूनमध्ये आजवर महाराष्ट्रात 59% तर देशभरात 42% तूट
 जूनमध्ये आजवर महाराष्ट्रात 59% तर देशभरात 42% तूट आहे. 26 जूनअखेर, राज्यात विभागनिहाय तूट पुढीलप्रमाणे आहे –
कोकण-गोवा: 59%
मध्य महाराष्ट्र: 64%
मराठवाडा: 51%
विदर्भ: 55%

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा सर्वाधिक प्रभाव दिसून येणार आहे. पालघर, ठाणे आणि मुंबईसह काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह दमदार पावसाचा अंदाज आहे. रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना वादळी वाऱ्यांसह पावसाचा यलो अलर्ट दिला असून, सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा विशेष इशारा देण्यात आला आहे. याशिवाय, पश्चिम महाराष्ट्रातील पुणे, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा परिसरातही जोरदार पावसाची शक्यता असल्याने या भागांना हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ दिला आहे. घाटाच्या प्रदेशांत पावसाची तीव्रता अधिक राहू शकते, त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे अशा सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.

आज सकाळी नऊ वाजताची उपग्रह स्थिती; IMD च्या अपडेटनुसार, 30 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर राहील, जुलैपासून राज्यात सर्वदूर पुन्हा जोरदार मान्सूनधारा बरसण्याचा अंदाज आहे.
आज सकाळी नऊ वाजताची उपग्रह स्थिती; IMD च्या अपडेटनुसार, 30 जूनपर्यंत कोकण किनारपट्टीलगत पावसाचा जोर राहील, जुलैपासून राज्यात सर्वदूर पुन्हा जोरदार मान्सूनधारा बरसण्याचा अंदाज आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची सक्रियता लक्षणीयरीत्या वाढली आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यांसह पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. दुसरीकडे, मराठवाड्यात पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता असून बीड, अंबाजोगाई, केज आणि माजलगाव या तालुक्यांमध्ये पावसाची जोरदार हजेरी लागण्याची शक्यता आहे. असे असले तरी, परळीसारख्या काही भागांत अद्यापही समाधानकारक पावसाची प्रतीक्षाच आहे. पुढील दोन ते तीन दिवसांत हा मान्सून उत्तर अरबी समुद्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या आणखी काही भागांत पुढे सरकण्याची शक्यता आहे.

जून अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची अलर्ट स्थिती
जून अखेरपर्यंत राज्यातील जिल्हानिहाय पावसाची अलर्ट स्थिती

 

तुम्हाला हे वाचायला नक्की आवडेल