मुंबई : मधाचा वापर गेल्या कित्येक वर्षांपासून केला जात आहे. पूजा, होमहवन यात देखील मधाचा वापर केला जातो. हे मध तुम्हाला कोणत्याची दुकानात सहज मिळू शकते. आज आपण अशा माधाविषयी जाणून घेणार आहोत जे जगातील सर्वात महाग मध असून सर्वात खास आहे. चला तर मग जाणून या खास मधाविषयी थोडक्यात माहिती.
अनेक वर्षांपासून मधाचा आहार आणि औषधांमध्ये वापर केला जात असून आयुर्वेदातही मधाला असाधारण महत्त्व दिले आहे. मधमाशा फुलांतील मध गोळा करून आपल्या पोळ्यामध्ये मध साठवत असतात. त्याचे अँटी-बॅक्टेरियल गुण मधाला सर्वात खास बनवतात. मध ते एक नैसर्गिक गोड पदार्थ असून जगातील विविध गोष्टींमध्ये मधाचा वापर केला जातो. जगातील सर्वात महागडे मध हे 9 लाख रुपये प्रति किलो दराने विकले जाते. चला तर मग जाणून घेऊया या मधाची खासियत..
निर्मल बायो संजीवनी । Bio Sanjivani।
हे आहे जगातील सर्वात शुद्ध मध
हे खास प्रकारचे मध तुर्कीस्तानजवळील काळ्या महासागराच्या जवळच्या भागात आढळते. या मधाचे नाव एल्विश हनी आहे. या मधाच्या विशेष चवीमुळे आणि शुध्दतेमुळे याला जगातील सर्वात शुद्ध मध म्हटले जाते. विशेष म्हणजे हा मध वर्षातून फक्त एकदाच काढता येतो. तुर्कीच्या आर्टविन शहरात १८०० मीटर खोल गुहेतून हे मध काढले जाते. या मधाची किंमत जगातील इतर मधापेक्षा कितीतरी जास्त आहे. यापैकी एक किलो मध खरेदी करण्यासाठी तुम्हाला किमान 10000 युरो खर्च करावे लागतील. ज्याची किंमत भारतीय रुपयांमध्ये 9 लाख रुपये आहे.
You can see why certain varieties of Honey cost so much. 😮 🐝 pic.twitter.com/JxlGccJo3v
— HOW THINGS WORK (@HowThingsWork_) August 6, 2023
ही आहे एल्विश मधाची खासियत
पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखे सर्व पोषक घटक या मधात आहेत. हा मध महान असण्यामागचे सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे खोल गुहेच्या आजूबाजूला औषधी वनस्पती उगवल्या जातात. ज्यामुळे मधमाश्या येथे लावलेल्या फुलांचा रस शोषून घेतात. शुद्ध हवेत आणि प्रदूषणापासून दूर सुरक्षित वातावरणात राहता येतात.
मधाच्या गुणवत्तेची घेतली जाते खास काळजी
हा मध काढण्याची पद्धत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मधमाश्या कितीही चावल्या तरी सेफ्टी गियरला टांगलेल्या या माणसांना मध काढावे लागते. या मधाचे उत्पादन करणारी कंपनी सर्वात आधी मधाची गुणवत्ता अतिशय काळजीपूर्वक तपासते. यानंतर, तुर्की अन्न संस्था त्याच्या गुणवत्तेचे मूल्यांकन करते. मधाला योग्य किंमत मिळावी म्हणून त्याच्या शुद्धतेची पूर्ण काळजी घेतली जाते.