राज्यावर मान्सूनची कुठलीही मजबूत सिस्टीम नसल्यामुळे महाराष्ट्रात पुढील 5 ते 7 दिवस अति हलक्या ते हलक्या स्वरूपाचाच पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याचे (आयएमडी) पुण्यातील शास्त्रज्ञ अनुपम काश्यप यांनी ही माहिती दिली आहे. ऑगस्ट कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमधील पावसाकडे डोळे लावून बसलेल्या बळीराजासाठी ही चिंता वाढविणारी बातमी आहे.
FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना
https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/
शेतकऱ्यांसाठी पिके वाचविण्याच्या दृष्टीने ही कसोटीची वेळ आहे. शेतातील उभी पिके वाचविण्यासाठी पिकांना हलक्या स्वरूपाच्या सिंचनाची गरज आहे.
3-4 सप्टेंबरपासून मान्सूनचे आंशिक पुनरुज्जीवन?
3-4 सप्टेंबरपासून राज्यात मान्सूनचे आंशिक पुनरुज्जीवन होण्याची शक्यता आहे. हळूहळू काही नव्या मान्सून सिस्टीम विकसित होतील आणि राज्यात 3-4 दिवसात पावसाचा जोर वाढू शकेल, अशी आशा आहे. विशेषत: विदर्भ, कोकण आणि दक्षिण-पूर्व मराठवाड्यात या काळात पावसाचा जोर राहू शकेल. मेघगर्जना तसेच विजांचा यलो अलर्ट 2-3 सप्टेंबरपासून पुढे द्यावा लागण्याची शक्यता असून राज्याच्या काही भागात मुसळधार पावसाचीही शक्यता असल्याचे पुणे वेधशाळेने म्हटले आहे.
हवामान अभ्यासक नटराजन गणेशन यांनी केलेल्या हवामान ECMEF मॉडेलवर आधारित अंदाजानुसार, येत्या 8-10 दिवसांत मान्सूनची नवी सिस्टीम विकसित होऊ शकते. बंगालच्या उपसागरात तीव्र कमी दाबाचा पट्टा निर्माण होण्याची शक्यता आहे. जर हा अंदाज खरा ठरला तर देशाच्या पश्चिम किनारपट्टीसह कोअर मान्सून झोनमध्ये म्हणजेच महाराष्ट्र, मध्यप्रदेशसह मध्य भारतात मुसळधार पावसाची शक्यता आहे.