एमएस स्वामीनाथन फाउंडेशन आणि सोशल अल्फा यांच्याकडून एक कोटी रुपयांचे अॅग्रीटेक इनोव्हेशन ग्रँड चॅलेंज जाहीर करण्यात आले आहे. भारतातील कृषी अन् ग्रामविकासातील आव्हानांना तोंड देणाऱ्या उपक्रमांना प्रोत्साहन देण्यासाठी ही योजना असेल. एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशनच्या अध्यक्षा सौम्या स्वामीनाथन यांनी चेन्नईतील पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.
FPC ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 ते 6 कोटींपर्यंत अनुदान
Agri Startup ला ₹ 10 लाख ते ₹ 10 कोटींपर्यंत फंडिंग..
FPC & Agri Startup – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला कार्यशाळा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे होणाऱ्या एमएस स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय शताब्दी परिषदेदरम्यान हा एक कोटी रुपयांचे अनुदान देणारा उपक्रम सुरू केला जाईल. सौम्या स्वामीनाथन म्हणाल्या की, “एमएस स्वामीनाथन रिसर्च फाउंडेशन; तसेच सामाजिक, आर्थिक आणि पर्यावरणीय समस्यांना तोंड देणारे उद्यम विकास व्यासपीठ असलेले ‘सोशल अल्फा’ यांच्या सहकार्याने हे अॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज सुरू करणार आहे. कृषी आणि ग्रामीण विकासातील तातडीच्या आव्हानांना तोंड देणारे अविष्कार/उपक्रम ओळखणे आणि त्यांचे प्रमाण वाढवणे, हे या योजनेचे उद्दिष्ट आहे.”
भारतरत्न पुरस्कार विजेते आणि भारताच्या हरित क्रांतीचे जनक प्रोफेसर एमएस स्वामीनाथन यांच्या 7 ऑगस्ट 2025 रोजी 100 व्या जयंतीनिमित्त आयोजित एमएस स्वामीनाथन आंतरराष्ट्रीय शताब्दी परिषदेदरम्यान हे अहवाल सादर केले जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी दिल्ली येथे 7 ऑगस्टला उद्घाटन होणाऱ्या व 7 ते 9 ऑगस्ट दरम्यानच्या या परिषदेची थीम “सदाहरित क्रांती – जैविक आनंदाचा मार्ग” ही असेल.

“ही शताब्दी परिषद म्हणजे नुसते प्राध्यापक एमएस स्वामीनाथन यांना श्रद्धांजली वाहणे नाही, तर त्याहून कितीतरी अधिक आहे, ती कृती करण्याचे आवाहन आहे. हवामान बदल, जैवविविधतेचे नुकसान आणि ग्रामीण संकटाचा सामना करत असताना, आपल्याला समानता आणि शाश्वततेवर आधारित धाडसी, विज्ञान-नेतृत्वाखालील उपायांची आवश्यकता आहे. अॅग्रीटेक ग्रँड चॅलेंज त्या दृष्टिकोनाचे प्रतिबिंबित करते, जे गरीब-केंद्रित, निसर्ग-केंद्रित आणि शेतकऱ्यांच्या ज्ञानावर आधारित नवकल्पनांना समर्थन देते,” असे सौम्या स्वामीनाथन यांनी सांगितले.
ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा