मुंबई : Sugarcane Plant… नवनवीन तंत्रज्ञानामुळे शेती क्षंत्रात मोठ्या झपाट्याने बदत घडत आहेत. त्यातच नवीन वाणांचे देखील संशोधन केले जात आहे. त्यामुळे शेतकर्यांना कमी वेळेत अधीक दर्जेदार उत्पादन घेणे देखील शक्य होत आहे. अशीच ऊसाची नवीन जात शास्त्रज्ञांनी विकसित केली असून या नवीन जातीच्या माध्यमातून शेतकर्यांना 110 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन घेता येणार आहे.
शेतकर्यांना अधीक दर्जेदार उत्पादन घेता यावे यासाठी कृषी संशोधकांकडून नवनवीन तंत्रज्ञान, नवीन आधुनिक बियाणे व जाती तयार करण्याचे काम केले जात आहे. कृषी क्षेत्राच्या विकासात शेतकर्यांसह विविध कृषी संशोधन संस्था, कृषी विद्यापीठांचा वाटा मोठा आहे. नवीन वाणांच्या संशोधनामुळे शेतकर्यांना देखील अधीक दर्जेदार व उत्पादन देणार्या पिकांची लागवड करता येत आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
महाराष्ट्रासह मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश यासह विविध राज्यात ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर घेतले जाते. त्यामुळे आपला भारत देश हा ऊस उत्पादक देशांच्या यादीत आघाडीवर आहे. ऊसाचा वापर साखर, गुळ तयार करण्यासह विविध कामांसाठी केला जातो. त्यामुळे बहुतांश शेतकर्यांकडून ऊसाची प्रामुख्याने लागवड केली जाते. ऊसाच्या बाबत सांगायचे तर शास्त्रज्ञांनी उसाचे नवीन वाण विकसित केले आहे. जे शेतकरी बांधवांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
COJN 9505 असे शास्त्रज्ञांनी नवीन विकसीत केलेल्या वाणाचे आहे. नर्मदापुरममधील पवारखेडा येथील ऊस संशोधन केंद्राच्या चार शास्त्रज्ञांनी ही जात विकसित केली असून 110 टन प्रति हेक्टर ऊस उत्पादन देणारी ऊसाची ही नवीन जात शेतकर्यांच्या जीवनात गोडवा आणू शकते.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, मध्यप्रदेश राज्याच्या कृषी विभागाने हे बियाणे शेतकर्यांना वितरित केले आहे. या जातीच्या ऊसापासून अधिक उत्पादन घेणे शक्य होणार असून कोगेन 9505 मध्ये 22 टक्के साखर आढळून आली आहे. दहा ते चौदा महिन्यांत शंभर ते 110 टन उत्पादन मिळू शकते.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- Maka Lagwad : रब्बीच्या हंगामात लागवडीसाठी मकाच्या या वाणाची करा निवड
- जगात सर्वात महाग आहे हा तांदूळ ; जाणून घ्या.. किंमत आणि कुठे पिकतो?