• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

रानभाजी शेंदळीचे यशस्वी उत्पादन

Team Agroworld by Team Agroworld
June 19, 2019
in यशोगाथा
0
रानभाजी शेंदळीचे यशस्वी उत्पादन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT


महाजन कुटुंबियांनी शेंदळी फळपिकाचे केले जतन

नामशेष होणार्‍या रानभाज्या संवर्धनाच्या वेडाने काही शेतकर्‍यांना झपाटून टाकले आहे. अशा शेतकर्‍यांमध्ये चुंचाळे (ता.चोपडा, जि.जळगाव) येथील तरुण शेतकरी उदय महाजन यांचा समावेश होतो. आहारातील विविध पोषक घटक युक्त अनेक रानभाज्या शिवारात सहज उपलब्ध होतात. या रानभाज्यांच्या उपयुक्ततेची जागरूकता नसल्याने यापैकी अनेक भाज्या लुप्त होत चालल्याचे दिसते. यापैकीच शेंदळी ही एक.

या शेंदळीच्या उत्पादन आणि विक्रीचा ध्यास महाजन कुटुंबाने घेतला आहे.

चंचाळे येथील उदय महाजन हे तरुण शेतकरी. त्यांची एकत्रित कुटुंबाची 60 एकर शेती आहे. विहीर व बोअरवेल ही सिंचनाचे साधने त्यांच्याकडे आहेत. बागायती शेती करण्यासाठी पुरेशे व शाश्वत जलस्रोत त्यांच्याकडे उपलब्ध असल्याने संपूर्ण शेती बागायती आहे. उदय यांचे ेवडील बालमुकुंद महाजन व काका अवधूत महाजन असे हे कुटुंब. शेतीत सतत प्रयोग करणारे म्हणून महाजन कुटुंब सर्वत्र परिचित आहे. केळी, काकडी, ऊस, कांदा ही पिके घेण्यात ते अग्रेसर आहेत. अवधूत महाजन यांना शेतीतील यशस्वी प्रयोगांबद्दल उद्यान पंडित पुरस्कार देऊन शासनाने सन्मानित केले आहे.

शेंदळी रानभाजी
खान्देशात शेंदळी नावाने प्रचलित असलेल्या या काकडी वर्गीय फळभाजीला प्रदेशनिहाय वेगवेगळे नाव आहे. काळी भागात शेंदाड म्हणूनही याला ओळखले जाते आणि खरबुजाप्रमाणे खाल्ले जाते. निसर्गतः पेरणी होवून उगवणारी रान फळभाजी आहे. क्वचितच बाजारात दृष्टीस पडणारी शेंदळी खेड्यातल्या शेतकरी कुटुंबाच्या भोजनात अधून मधून आढळते. पावसाळा सरता सरता पक्व झालेल्या शेंदळी फुटून बी शेतात पडते व पुढच्या पावसाळ्यात पुन्हा उगवून येते. अलीकडे तणनाशकांच्या वापरामुळे पूर्वी सहज नजरेस पडणारे शेंदळीचे वेल आता दिसत नाहीत. ही फळभाजी काळाच्या पडद्याआड जाण्याआधी तिचे संवर्धन व्हावे, हा ध्यास उदय महाजन व त्यांच्या कुटुंबाने घेतला असून येत्या काळात शेंदळी ग्रामीण व शहरी कुटुंबाच्या आहारात दिसावी यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

बीजोत्पादन करून लागवड
तूर, कापूस या सारख्या पिकात पावसाळा संपूनही शेंदळीचे वेल दिसतात. अंतर मशागत करतांना हे वेल जपले जातात. सातपुडाच्या रांगांमधील आदिवासींच्या शेतात उत्तम प्रतीच्या शेंदळ्या आढळतात. महाजन यांनी याची लागवड पहिल्या वर्षी पिकात केली. त्या वर्षीच्या वेलांपासून उपलब्ध शेंदळ्यांची सुरवातीला 10 गुंठे क्षेत्रात स्वतंत्र लागवड केली. पहिली 3 वर्षे तर बिजोत्पादनातच गेली. मोठ्या व समान आकाराच्या व नारंगी रंगाच्या निवडक शेंदळ्यांचे बीज तयार करून 2018 च्या हंगामात मोठ्या स्वतंत्र क्षेत्रात शेंदळी लागवड केली.

पेरू, शेवग्यात आंतरपीक
शेंदळीचे वेल सावलीतही चांगले पसरत असल्याने कोणत्याही उंच वाढणार्‍या पिकात चांगले येते, हा महाजन यांचा अनुभव असल्याने त्यांनी 7 एकर पेरू व 3 एकर शेवगा पिकात आंतरपीक म्हणून शेंदळीची लागवड केली. पावसाळ्याच्या सुरुवातीला खरीप हंगामातील इतर पिकांची पेरणी करतांना शेंदळीची लागवड केली. पेरू व शेवग्याच्या ओळीतच 2 फूट अंतरावर बिया टोचण्यात आल्या. पेरू व शेवग्याला ठिबक सिंचन व्यवस्था करण्यात आली असून 2 फुटावर ड्रीपर असल्याने गरजेच्या वेळी पाणी देता आले.


बीनखर्ची, टिकाऊ फळपीक
कोणत्याही प्रकारच्या खते-औषधांची गरज या पिकाला नसते. पावसाळ्यातील नैसर्गिक वातावरणात शेंदळीचे वेल चांगले फोफावतात. कमी पावसात देखील हे पीक येऊ शकते. वेलींना फळ लागल्यानंतर मात्र ढगाळ वातावरणामुळे फळ माशीचा प्रादुर्भाव होतो. त्यापासून बचावासाठी संपूर्ण शेतभर एकरी 2 या प्रमाणे फेरोमेन सापळे लावले होते. याव्यतिरिक्त कोणताही खर्च आला नाही. कोल्डस्टोरेज शिवायही हे फळ अनेक दिवस टिकू शकते, असा अनुभव महाजन यांनी यावर्षी घेतला. टिकाऊ असल्याने उत्पादन निघाल्यापासून 3 ते 4 महिन्यांपर्यंत बाजारात विकता येतात. हंगाम संपल्यावर विक्री न झालेली शेंदळी कापून तिला वाळविल्यास ती अधिक चविष्ट बनते. तरीही माल उरल्यास त्यापासून बियाणे तयार होते.

परदेशात निर्यातीचा प्रयत्न
ऑगस्ट – सप्टेबर महिन्यात पक्व झालेल्या शेंदळीची तोडणी केली जाते. स्थानिक बाजारात चांगली मागणी असल्याने महाजन यांनी यावर्षी सुमारे 50 क्विंटल शेंदळीची विक्री केली. परदेशात माहिती नसलेली ही फळभाजी निर्यात करण्याचा प्रयत्न उदय महाजन यांनी करून पाहिला. त्यात त्यांना थोड्या प्रमाणात यश आले आहे. अपेडा व पाल कृषी विज्ञान केंद्राच्या मदतीने काही माल त्यांनी परदेशात पाठवला. परंतू, मार्केटिंगच्या दृष्टीने अद्याप या पिकाचा अभ्यास झालेला नाही. या रानभाजीबाबत बाजारातील ग्राहकांसह कृषी विद्यापीठे व शास्रज्ञ आदी अद्यापही अनभिज्ञ आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात उत्पादन आल्यानंतर मार्केटींगचा प्रश्न निर्माण होतो. हे उत्पादन पूर्णतः नैसर्गिक असल्याने विषमुक्त आहे. येत्याकाळात आंतरराष्ट्रीय बाजारात माल विक्रीसाठी पाठवण्या आधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्याची निर्यात करण्यात येणार आहे. सध्या रानभाज्यांचा चांगला प्रसार होत आहे. त्या पार्श्वभूमीवर शेंदळीचे संवर्धन झाल्यास शेतकर्‍यांना कमी खर्चाच्या आंतरपिकातून उत्पन्न मिळेल व ग्राहकांना नैसर्गिक फळभाजीचा आस्वाद घेता येईल.


शेंदळी पिकाचे संशोधन व्हावे!
शेंदळी हे तसे रानटी पीक आहे. त्यामुळे ते नैसर्गिक वातावरणानुसार वाढते. कमी जास्त पाऊस झाला तरी हमखास पीक हाती येते. आंतरपीक म्हणूनच घ्यायचे असल्याने स्वतंत्र लागवडीची गरज नाही. यात भरपूर पोषक अन्नघटक असावेत. त्याबाबत संशोधन होऊन त्याचा प्रचार झाल्यास शेतकर्‍यांना कमी खर्चाचे एक चांगले उत्पादन घेता येऊ शकेल.

  • उदय बालमुकुंद महाजन,
    रा. चुंचाळे ता. चोपडा, जि.जळगाव
    मो.नं. 9767713332

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: आंतरपीकरानभाजीशेंदळी पिकशेंदाड
Previous Post

नोकरी अन् शेती सांभाळून यशस्वी शेळीपालन

Next Post

कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी कंपनी

Next Post
कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी कंपनी

कोरडवाहू पट्ट्यातील शेतकरी कंपनी

ताज्या बातम्या

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन

अमेरिकेत विक्रमी मका उत्पादन; निर्यातीसाठी दबाव

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात

राज्यातून मान्सून माघारीला सुरुवात; येत्या 24 तासात संपूर्ण महाराष्ट्रातून होणार एक्झिट – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 13, 2025
0

हवामान दुष्चक्र

हवामान दुष्चक्र: युरोपात उष्णतेच्या लाटेने घेतले 62 हजार बळी!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 11, 2025
0

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

हुश्श… रिटर्न मान्सून दोन दिवसात राज्यातून परतणार; अशी असेल वाटचाल – आयएमडी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 10, 2025
0

हवामान विभागा

आजचा दिवस पावसाचा! “या” जिल्ह्यांसाठी हवामान विभागाचा अलर्ट जारी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 9, 2025
0

Agriculture Minister Dattatray Bharane

Agriculture Minister Dattatray Bharane Receives Invitation for AgroWorld Agricultural Expo

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 8, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

खान्देशच्या मातीत बांबूच्या शेतीतून वर्षाला तब्बल 25 लाखांचा नफा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 18, 2025
1

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

धराक्षा इकोसोल्युशन्स : पिकांच्या अवशेषांचे सोने करणारे स्टार्ट अप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 16, 2025
0

गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप

आईसोबत तरुणाने सुरु केला गावठी कोंबडीचा स्टार्ट-अप; आज 45 कोटींचा व्यवसाय !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 15, 2025
0

खान्देशातील धरणे फुल्ल

खान्देशातील धरणे फुल्ल; रब्बी “नो टेन्शन”; मका, भाजीपालासह रब्बी क्षेत्र वाढीचा अंदाज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 14, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish