एका शेतकऱ्याची लेक जहाजावरील देशातील पहिली महिला डेक ऑफिसर ठरली आहे. सध्या सातासमुद्राला गवसणी घालत असलेल्या या मुलीचं नाव आहे सिमरन ब्रम्हदेव थोरात!
पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर तालुक्यातील वडापुरी या छोट्याशा गावातील एका सामान्य शेतकरी कुटुंबातली ही मुलगी. सिमरनने आतापर्यंत 20 हून अधिक देशांमध्ये जहाजाचा यशस्वी प्रवास करून आपल्या कामाची छाप पाडली आहे.
तिचं बारावीपर्यंतचं शिक्षण इंदापूरमध्येच श्री नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये झालं. बारावीनंतर तिनं प्रवेशपरीक्षा देऊन पुण्यातल्या ‘महाराष्ट्र ॲकॅडमी ऑफ नेव्हल एज्युकेशन अँड ट्रेनिंग’ म्हणजेच एमएएनटीई या संस्थेत प्रवेश घेतला. तिनं बीएसस्सी नॉटिकल सायन्स ही पदवी घेतली. कॉलेज कॅम्पसमधूनच तिची कॅनडातील व्हँकुव्हर येथील ‘सी स्पन शिप मॅनेजमेंट’ या कंपनीत निवड झाली.
या कंपनीमध्ये अनेक देशातील मुली उच्च पदावर होत्या. मात्र, भारतातून निवड होणारी सिमरन पहिलीच मुलगी असल्यानं इतिहास घडला. तिच्या यशस्वी कामगिरीनंतर कंपनीनं अनेक भारतीय मुलींची निवड केली. सिमरननं 2019मध्येच जहाजावर ट्रेनी डेक कॅडेट म्हणून सुरुवात केली. तिनं पुढची परीक्षा देऊन लायसन्स मिळवलं. त्यानंतर तिची देशातील पहिली महिला नेव्हिगेटिंग ऑफिसर म्हणून ‘ सी-स्पन’मध्ये निवड झाली.
आपल्या आजवरच्या या यशाचं श्रेय सिमरन वडील ब्रह्मदेव, आई आशा आणि भाऊ शुभम यांना देते. त्यांनी सिमरनच्या स्वप्नांची पूर्तता करण्यासाठी जीवाचं रान केलं. थोरात कुटुंबानं तीन एकर जमीन विकून सिमरनच्या स्वप्नांना बळ दिलं.
- 🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
- 🐐 अॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
- 🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌
- ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा
- ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणार…