• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

“शक्ति”चा महाराष्ट्राला धोका टळला; चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले!

वादळाने दिशा बदलल्यास गुजरात किनारपट्टीचा धोका कायम; "शक्ति" नाव कुणी अन् का ठेवले, ते जाणून घ्या ...

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
October 6, 2025
in हवामान अंदाज
0
“शक्ति”चा महाराष्ट्राला धोका टळला; चक्रीवादळ ओमानच्या दिशेने सरकले!
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : वायव्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य अरबी समुद्रावर असलेल्या अन् महाराष्ट्राला धोकेदायक ठरू पाहणाऱ्या तीव्र चक्रीवादळ “शक्ति”चा धोका टळला आहे. मान्सूननंतर या हंगामातील हे पहिलेच चक्रीवादळ आता नैऋत्येकडे ओमानच्या दिशेने सरकले आहे. आता ते ओमनमधील मसिरापासून सुमारे 150 किमी पूर्वेला केंद्रस्थानी असल्याचे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) म्हटले आहे. दरम्यान, चक्रीवादळ शक्तिचे आता उष्णकटिबंधीय वादळात (डाऊनग्रेड) रूपांतर झाले आहे. त्यामुळे तीव्रतेची शक्यता आता कमी झाली आहे.

एकाच वेळी तीन हवामान प्रणाली: अरबी समुद्रावरील तीव्र चक्रीवादळ शक्ति, जे आता डाऊनग्रेड झाले आहे. जोडीला वायव्य भारतात पश्चिमी विक्षोभ आणि पूर्वेकडील राज्यांमध्ये अतिवृष्टी

शक्ति चक्रीवादळ आता सोमवार, 6 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत नैऋत्येकडे सरकत राहण्याची आणि हळूहळू चक्रीवादळात रूपांतरित होण्याची शक्यता आहे. त्यानंतर, ते पुन्हा वळेल आणि पश्चिममध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर जवळजवळ पूर्वेकडे म्हणजे गुजरातकडे सरकेल. या बदलामुळे दीव-वेरावळ, द्वारकासह सौराष्ट्राच्या समुद्रात जोरदार प्रवाह दिसून येत आहेत आणि प्रणाली सतर्कतेवर आहे. तथापि, मंगळवार, 7 ऑक्टोबरपर्यंत कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होऊन हे वादळ आणखी कमकुवत होईल.

राज्यातील “या” जिल्ह्यात आज पावसाचा इशारा
चक्रीवादळ तुलनेने सौम्य झाले असले तरी महाराष्ट्रात सोमवारी काही ठिकाणी मुसळधार पावसाचा पुर्वानुमानित इशारा “आयएमडी”ने दिलेला आहे. वादळाचा परिणाम कोकण किनारपट्टी आणि आसपासच्या जिल्ह्यांवर होण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबई, ठाणे आणि कोकणात तसेच विदर्भातील अनेक जिल्ह्यांना पावसाचा अलर्ट जाहीर करण्यात आलेला आहे. या भागात आता हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे. नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, धाराशिव, लातूर, नांदेड तसेच धुळे, जालना आणि नंदुरबार जिल्ह्यांत पूर्वानुमानित हलक्या पावसाची शक्यता आहे.

शक्ति चक्रीवादळ सध्या ओमानपासून 150 किलोमीटरवर केंद्रस्थानी आहे.

चक्रीवादळाचे गुजरातवरील संभाव्य परिणाम
6 ऑक्टोबरच्या सकाळपर्यंत, शक्ति चक्रीवादळ अधिक शक्तिशाली होईल. त्यानंतर, ते यू-टर्न घेईल आणि पश्चिम-मध्य आणि वायव्य अरबी समुद्रावरून पूर्वेकडे (गुजरातकडे) सरकेल. चक्रीवादळाच्या प्रभावामुळे, येत्या 5 दिवसांत गुजरातच्या किनारी भागात जोरदार वाऱ्यांसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. जामनगर, देवभूमी द्वारका, पोरबंदर, सुरत, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यात 8 ऑक्टोबर रोजी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे. सध्या गीर सोमनाथ, वेरावळ, देवभूमी द्वारका आणि दीवसह समुद्रात जोरदार वारे आणि लाटा उसळत आहेत. “आयएमडी”ने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला दिला आहे. दिलासा देणारी गोष्ट म्हणजे 7 ऑक्टोबरच्या दुपारपर्यंत हे वादळ कमकुवत होऊन कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची शक्यता आहे.

ऑक्टोबर हीटपासून दिलासा.?

देशाच्या अनेक भागात मुसळधार पाऊस
“शक्ति”मुळे देशात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस आणि गारपीट सुरू आहे. आसाम, मेघालय, उप-हिमालयी पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होत आहे. अरुणाचल प्रदेश, बिहारमध्येही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. याशिवाय, पंजाब, तामिळनाडू, पुडुचेरी, कराईकल, तेलंगणा, पश्चिम राजस्थान, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख-गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि पंजाबमध्ये काही ठिकाणी गारपीटीसह वादळ होण्याची शक्यता आहे.

या चक्रीवादळाला “शक्ति” असे नाव का?
चक्रीवादळांना नावे देण्याची प्रक्रिया खूप खास आहे. बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातून येणाऱ्या वादळांना नावे देण्याची ही पद्धत 2024 मध्ये सुरू झाली होती. भारत, बांगलादेश, मालदीव, म्यानमार, ओमान, पाकिस्तान, श्रीलंका आणि थायलंड सारखे देश यात समाविष्ट असून क्रमाने एकेक देश वादळाला नाव देतो. सध्याच्या चक्रीवादळाचे नाव श्रीलंकेने ‘शक्ति’ ठेवले आहे. हा एक तमिळ शब्द आहे, ज्याचा अर्थ होतो ताकद! वादळांची नावे देताना, हे सुनिश्चित केले जाते की, ते नाव लहान, सोपे आणि कोणत्याही प्रकारे आक्षेपार्ह नसावे. तसेच, एकदा वापरल्यानंतर ते नाव पुन्हा वापरता येत नाही.

Jain Irrigation

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 

  • रिटर्न मान्सून आठवडाभर खोळंबलेलाच.! राज्यातला पाऊस नेमका कधी थांबणार ते जाणून घ्या…
  • महाराष्ट्रावर पावसाचे नवे संकट! अरबी समुद्रावर शक्ती चक्रीवादळाचा धोका

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: पावसाचा इशारामहाराष्ट्रशक्ति चक्रीवादळ
Previous Post

रिटर्न मान्सून आठवडाभर खोळंबलेलाच.! राज्यातला पाऊस नेमका कधी थांबणार ते जाणून घ्या…

Next Post

GST बूस्ट : सप्टेंबर 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत 45% वाढ

Next Post
GST बूस्ट

GST बूस्ट : सप्टेंबर 2025 मध्ये ट्रॅक्टर विक्रीत 45% वाढ

ताज्या बातम्या

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

पीक विमा

रब्बी पीक विमा: मुदत जवळ आली! शेतकऱ्यांनो, हे 5 मोठे बदललेले नियम तुम्हाला माहित आहेत का?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 15, 2025
0

शेती-माती ते वर्ल्ड कप

शेती-माती ते वर्ल्ड कप: रेणुका सिंग ठाकूरचा प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य

गुजरातच्या विक्रमी केळी उत्पादकतेचे रहस्य आणि भरघोस उत्पादनाासाठीच्या खास टिप्स!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 14, 2025
0

न्याय्य व्यापार करारा

ट्रम्प नरमले! भारतासोबत ‘न्याय्य व्यापार करारा’चे संकेत, आयात शुल्क कमी होणार?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 12, 2025
0

थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

महाराष्ट्रासह देशातील काही राज्यांमध्ये थंडीच्या तीव्र लाटेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 11, 2025
0

AI

शेतात AI कसे वापरावे? सोप्या ट्रिक, मोठे फायदे!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 10, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

राज्यात थंडीची लाट

राज्यात थंडीची लाट कायम!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2025
0

एमएसएमई कर्ज योजना

शेती उद्योगासाठी एमएसएमई कर्ज योजना – अर्ज कसा करावा?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 1, 2025
0

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

मका – एकरी 100 क्विंटल उत्पादन – बी. डी. जडे.

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 18, 2025
0

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

अमेरिकेची मजबुरी अन् भारताला फायदा; ट्रम्प यांनी घटवले फूड टेरिफ!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
November 16, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish