मुंबई : (IMD) राज्यातील काही भागात पावसाचा जोर कमी झाला आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतीविषयक कामांना वेग आला आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, आजही (7 ऑगस्ट) राज्याच्या काही जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा अंदाज आहे.
या जिल्ह्यात जोरदार पावसाचा इशारा
सातारा आणि पुणे जिल्ह्यांतील घाट भागांसाठी हवामान विभागाने (IMD) यलो अलर्ट जारी केला असून याठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे. पुणे शहरात आणि आसपासच्या भागात सतत पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
IMD : या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट नाही
जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, पुणे, बीड, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अहमदनगर, पालघर, मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना कोणताही अलर्ट देण्यात आला नाही. तरी काही ठिकाणी पावसाची रिपरिप सुरु राहणार असल्याचा अंदाज आहे.