Home हॅपनिंग कृषी निविष्ठा गुणवत्ता व पुरवठ्याबाबत कृषी आयुक्तालयात नियंत्रण कक्ष स्थापन

कृषी निविष्ठा गुणवत्ता व पुरवठ्याबाबत कृषी आयुक्तालयात नियंत्रण कक्ष स्थापन

कृषी निविष्ठा
कृषी निविष्ठा

पुणे : खरीप हंगामात राज्यातील शेतकऱ्यांना गुणवत्तापूर्ण निविष्ठा म्हणजेच बियाणे, खते व किटकनाशके यांचा पुरवठा वेळेत, मुबलक प्रमाणात होण्यासाठी व शेतकरी, उत्पादक, वितरक व विक्रेते यांना क्षेत्रीयस्तरावर येणाऱ्या वेगवेगळ्या अडचणींचे निवारण करण्याकरिता आयुक्तालयस्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आल्याची माहिती निविष्ठा व गुण नियंत्रणचे कृषि संचालक विकास पाटील यांनी दिली आहे.

कृषी निविष्ठा
Soil Charger

स्थापन करण्यात आलेला नियंत्रण कक्ष हा कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी २४ तास सूरू राहणार असून संपर्क साधण्यासाठी भ्रमणध्वणी क्रमांक ८४४६११७५००, ८४४६२२१७५० व ८४४६३३१७५० उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. कृषि विभागाचा टोल फ्री क्रमांक १८००२३३४००० या क्रमांकाही संपर्क करता येईल. यासोबतच अडचण किंवा तक्रार controlroom.qc.maharashtra@gmail.com या ईमेल पत्त्यावरही पाठविता येईल, असेही कळविण्यात आले आहे.

तक्रारी कोऱ्या कागदावर लिहून व्हॉटस्ॲप वर किंवा ई-मेलवर पाठवलेल्या तक्रारीदेखील स्वीकारल्या जातील. व्हॉट्सॲपद्वारे तक्रारी पाठवणे शक्य नसल्यास भ्रमणध्वणी क्रमांकावर तोंडी तक्रारी नोंदविल्या तरी चालतील. संबंधितांनी निविष्ठांची गुणवत्ता, किंमत, साठेबाजी व लिंकींग बाबत असलेल्या तक्रारी व अडचणींचा संक्षिप्त तपशिल भ्रमणध्वणी, टोल फ्री क्रमांक व ई-मेलवर कळवाव्यात असे, आवाहनही करण्यात आले आहे.

कृषी निविष्ठा
Rise N Shine

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇