• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2023
in यशोगाथा
0
दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

तमिळनाडूमधील रामेश्वरम्‌जवळ मनिकाडू नावाचे बेट आहे. तेथील सागरी किनाऱ्यावरील मच्छीमारांना नित्यनेमाने रोजगार मिळवून देणारा व्यवसाय मिळालेला आहे. तो म्हणजे लाल रंगाच्या शेवाळाची शेती. या शेवाळाला शास्त्रीय नाव आहे – ‘कप्पाफायकस अल्वारेझाय’ (रेड अल्गी). यासाठी शेत लागत नाही, कारण ही शेती सागरातच केली जाते. या प्रकल्पाला ‘ॲक्वा ॲग्रिकल्चरल सोल्युशन प्रकल्प’ म्हणतात. हा प्रकल्प ‘इंडो-यूएस सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी एन्डॉव्हमेन्ट फंड’ म्हणून ओळखला जातो.

लाल शेवाळे उगवण्यासाठी बांबूचा उपयोग करून चौकोनी बांध तयार करतात. त्याला सर्व बाजूने जाळी बांधलेली असते. हा तरंगणारा बांध शेतकरी सागरात नेऊन तरंगत ठेवतात. या नंतरचे काम महिलावर्गाकडे असते. त्या किनाऱ्यावर बसून शेवाळाची लागवड करण्यासाठी शास्त्रशुद्ध पद्धतीने शेवाळ्यांची सफाई करतात. यामुळे त्यांनादेखील रोजगार मिळतो.

शेवाळाची बांबूंच्या बांधामध्ये लागवड

साधारण 60 किलोग्रॅम शेवाळाची बांबूंच्या बांधामध्ये लागवड केली जाते. काही दिवसांतच त्यापासून 260 किलो शेवाळी वाढतात. कोणतेही वेगळे खत वापरावे लागत नाही. शेवाळे वाढण्यासाठी लागणारे सर्व प्रकारचे घटक सागरी पाण्यामार्फत मिळतात. या शेवाळापासून निर्यातक्षम ‘अक्वासॅप’ नावाचा द्रवरूप माल, म्हणजे अर्क तयार करण्यासाठी जवळच्या लघु उद्योगांमध्ये पाठवले जाते. या अर्कात पुरेसा नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम असते. त्यात पोलिसॅखराईडस्‌, कायटोसॅन्स आणि प्रथिनांचे छोटे तुकडे (प्रोटिन हायड्रोलिसिट) असतात.

अर्काची अमेरिकेला निर्यात

हा अर्क उत्तम पॅकिंग करून अमेरिकेतील सात राज्यांकडे निर्यात होतो. तो सेंद्रिय ‘जैवउत्तेजक’ म्हणून ओळखला जातो. हा घटक निसर्गतःच वनस्पतीची वाढ होण्यासाठी विविध रसायने सूक्ष्म प्रमाणात पुरवत असतो. यामुळे शेतातील पिकांना जोम धरतो. शेतातील माल उठावदार दिसतो आणि काहीसा टिकाऊ बनतो. त्याचा दर्जा वाढतो. उभी पिके बऱ्याचदा अनेक प्रतिकूल परिस्थितीत वाढत असतात. उदाहरणार्थ ओला किंवा कोरडा दुष्काळ, कडक थंडी किंवा तीव्र उष्मा, धुके, गारपीट, कीड-किटकांचा प्रादुर्भाव आदी. अशा प्रतिकूल परिस्थितीत तगून राहण्यासाठी बायो- स्टिम्युलंटचा वापर केला तर बराच फायदा होतो. एवढेच नव्हे तर पिकांना कमी पाणी लागते, असा अनुभव आहे.

ऑरगॅनिक सर्टिफाईड प्रॉडक्‍टिव्हिटी इन्हान्सर

कॅलिफोर्निया आणि ‘वॉशिंग्टन स्टेट डिपार्टमेंट ऑफ फूड अँड ॲग्रिकल्चर’ या दोन संस्थांनी लाल शेवाळापासून तयार झालेल्या या मालाला ‘ऑरगॅनिक सर्टिफाईड प्रॉडक्‍टिव्हिटी इन्हान्सर’ म्हणून मान्यता दिलेली आहे. या जैवउत्तेजकामध्ये वनस्पतींना वाढीसाठी लागणारे घटक आहेत. त्यात सोडियमचे प्रमाण नगण्य असते, पण पोटॅशियमचे प्रमाण भरपूर असते. तसेच ऑक्‍झिन, सायटोकायनिन आणि जिबरेलीन ही संप्रेरके (हॉर्मोन) असतात. सायटोकायनिन हे वनस्पतींच्या पेशी विभाजनाला मदत करते आणि ऑक्‍झिन वनस्पतीच्या वाढीवर नियंत्रण करते. जिबरेलीन खोडाची लांबी वाढायला मदत करते. बायो-स्टिम्युलंटमध्ये ह्युमिक आम्ल आणि फल्व्हिक आम्लदेखील असते. त्यात वनस्पतींच्या उत्तम वाढीसाठी पोषक द्रव्ये असतात.

बायो-स्टिम्युलंट निर्यातीत दुपटीहून अधिक वाढ शक्य

बायो-स्टिम्युलंटची तुलना जीवनसत्वांबरोबर करता येईल. कारण त्यांचा वापर केल्यावर पिकाच्या दर्जाबरोबर त्याचे उत्पादनही बरेच वाढते. खतांसाठी पूरक रसायने पुरवल्यामुळे बायो-स्टिम्युलंटचे महत्त्व वाढत आहे, कारण हा घटक पूर्णतः नैसर्गिक आहे आणि याचा वापर केला तर रासायनिक खतांचा वापर कमी होईल. सेंद्रिय शेतीचे फायदे आहेतच. ग्राहक ‘ऑरगॅनिक’ मालाची मागणी करत असतात. साहाजिकच पुढील पाच वर्षांमध्ये या मालाची निर्यात सध्यापेक्षा अडीच पटीने वाढणार आहे.
– डॉ. अनिल लचके

 

Planto Advt
Planto

 

Panchaganga Seeds

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान
  • द्राक्ष – भुरीचे नियंत्रण..; डिसेंबर महिन्यातील व्यवस्थापन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: तमिळनाडूलाल शेवाळसागरी शेती
Previous Post

शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

Next Post

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

Next Post
दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.