नागपूर : Rabi Season… येत्या काही दिवसात रब्बी हंगामाला (Rabi Season) सुरुवात होणार आहे. रब्बी हंगामात शेतकरी बांधव हरभरा आणि गव्हाची मोठ्या प्रमाणात पेरणी करत असतात. शेतकरी बांधवांना खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांना रब्बी हंगामासाठी बियाण्यांची खरेदी करणे हेतू पैशांची मोठी कमतरता जाणवणार आहे. शेतकरी बांधवांची हीच परिस्थिती जाणून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ अर्थात महाबीज यांच्याकडून शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी गहू आणि हरभरा बियाण्यांवर अनुदान उपलब्ध करून देण्यात आले आहे.
केंद्र आणि राज्य शासनामार्फत राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना आणि कृषी उन्नती योजनेंतर्गत ग्रामबिजोत्पादन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. दोन्ही योजनेत शेतकऱ्यांना हरभरा आणि गहू प्रमाणित बियाणे अनुदानावर मिळणार आहे. हरभरा व गहू बियाणे महाबीज विक्रेत्याकडे उपलब्ध राहणार आहेत.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध
खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याच्या उद्देशाने या योजनेची सुरुवात करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी अनुदानित दराने बियाणे प्राप्त करुन घेण्याकरीता नजिकच्या कृषी कार्यालय तसेच महाबीज कार्यालयात संपर्क साधावा. अनुदानावर कमी दरात महाबीजचे हरभरा व गहू प्रमाणित बियाणे उपलब्ध असून याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महाबीजचे विभागीय व्यवस्थापक विनोद पाटील यांनी केले आहे.

प्रति क्विंटल अनुदान व अनुदानित विक्री दर
10 वर्षाआतील हरभरा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 2 हजार 500 रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 4 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान -2 हजार रुपये राहणार असून अनुदानित विक्री दर 5 हजार राहणार आहे. 10 वर्षाआतील हरभरा काबुली वाणासाठी अनुदान- 2 हजार 500 राहणार असून अनुदानित विक्री दर 8 हजार 500 रुपये आहे. 10 वर्षावरील हरभरा काबुली वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान- 2 हजार राहणार असून अनुदानित विक्री दर – 9 हजार रुपये आहे.

गहू बियाण्यांवर मिळणार ‘इतके’ अनुदान
10 वर्षाआतील गव्हाचा वाणासाठी प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विकी दर – 2 हजार 500 रुपये तर 10 वर्षावरील गव्हाचा प्रती क्विंटल अनुदान 1 हजार 500 असून अनुदानित विक्री दर 2 हजार 700 रुपये आहेत. या प्रकारे हरभरा व गहू बियाण्यांकरिता प्रती क्विंटल अनुदान व अनुदानित विक्री दर असणार आहेत.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇