शिवतीर्थ मैदानावर अवतरणार कृषीची पंढरी !
१५ ते १८ नोव्हेंबर २०१९ रोजी जळगांव येथिल शिवतीर्थ मैदानावर तब्बल 4 एकर
क्षेत्रावर होत असलेल्या ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन २०१९ च्या आयोजनासाठी जय्यत
तयारी सुरु झाली आहे . मागील वर्षी १ लाखाहून अधिक शेतकऱ्यांनी या प्रदर्शनाला भेट
दिली होती. प्रत्येक वर्षी मिळणारा शेतकऱ्यांचा वाढता प्रतिसाद पाहता या वर्षी
सव्वा लाखाहून अधिक शेतकरी या ठिकाणी भेट देतील असा अंदाज आहे, त्यामुळे
आयोजकांतर्फे मोठ्या प्रमाणात तयारी सुरु आहे. दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील आयोजकांनी
प्रदर्शनाला नवीन गोष्टींची जोड देली आहे. भारतातील सर्वात मोठा बैल या ठिकाणी
पाहायला मिळणार आहे सुमारे एक टन वजन, १० फुट लांब, ६ फुट उंची असे या बैलाचे वैशीष्ट
आहे.
प्रदर्शनाचे इतर वैशिष्टये –
# खान्देशातील सर्वांत मोठे कृषी प्रदर्शन… ॲग्रोवर्ल्ड.. एक लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या भेटी
# प्रदर्शन तब्बल 4 एकर क्षेत्रावर
# नवीन यंत्र, तंत्र बियाणे – वाण यांसह 225 हून अधिक स्टॉल्स
# डोम स्ट्रक्चर व फेब्रिकेटेड सिस्टीम स्टॉल्स
# प्रात्यक्षिकांवर भर – बदलत्या हवामानात शाश्वत शेतीसाठी पॉलीहाऊस, शेडनेटचे प्रात्यक्षिक.. विविध आकार, प्रकारातील शेततळे.. सूक्ष्म सिंचन व शेतातील सोलरचे Live Demo.. रेशीम शेती ते गांडूळ खताचे प्रात्यक्षिक..
# यंत्र व औजारांचे स्वतंत्र दालन
# पशूधनासाठी अल्प खर्चातही उपयुक्त ठरेल असा मुरघास, अझोला, हायड्रोपोनिक चारा व्यवस्थापन प्रात्यक्षिक
# रेशीम, फ़ायदेशीर दुग्ध व्यवसाय, गटशेती तसेच मशरूमची फ़ायदेशीर शेतीबाबत माहिती
# सर्व शासकीय विभाग, बँक तसेच प्रोजेक्ट रिपोर्टसह अनुदानाबाबत सर्व काही आता एकाच छताखाली माहिती
स्टॉल बुकींगसाठी संपर्क –
9130091621 (खान्देश)
9130091622 (उर्वरित महाराष्ट्र)
9130091623 (नाशिक)
9130091624 (मुंबई)
9130091625 (मराठवाडा, विदर्भ)
9130091633 (पुणे – प महाराष्ट्र)