मुंबई : PM मोदी लवकरच पीएम किसान योजनेचा (PM Kisan Yojana) 12वा हप्ता जारी करणार आहेत. केंद्र सरकारद्वारे PM किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्षाला 6 हजार रुपये जमा केले जातात.
केवायसी केली असेल तरच मिळेल लाभ
केंद्र सरकारद्वारे गरीब, शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक महत्त्वाच्या योजना राबवल्या जातात. अशीच एक PM किसान निधी योजना आहे. या अंतर्गत देशातील गरीब शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये दिले जातात. ही रक्कम ठराविक कालावधीनंतर थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होते. मात्र, या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना ई-केवायसी करणे गरजेचे आहे. केवायसी न केल्यास शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा फायदा मिळणार नाही.
कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/5hVluXXF3J0
12वा हप्ता ‘या’ तारखेला होणार जमा
या योजनेंतर्गत रक्कमेचा पुढील 12 वा हफ्ता 17 ऑक्टोंबर 2022 रोजी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपली केवायसी प्रक्रिया पूर्ण करणे गरजेचे आहे.
अशी करा EKYC ऑनलाईन
सर्वात प्रथम PM किसान सन्मान निधी योजनेची अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जा.
येथे तुम्हाला खाली आल्यावर उजव्या बाजूला farmer corner मध्ये EKYC पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर टाका व सर्चवर क्लिक करा.
आता आधार कार्डशी लिंक असलेला मोबाईल नंबर टाका. पुढे ‘GET OTP’ वर क्लिक करा.
त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी टाका OTP व्हेरिफाय केल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.
आधार कार्ड शी मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुमची EKYC आपले सरकार सेवा केंद्र मध्ये जाऊन करावी.
‘अशा’ प्रकारे तुमचा अर्ज करा अपडेट
पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत
(PM Kisan Yojana) तुम्हाला कोणतीही समस्या येत असेल तर ती लवकर सोडवा.
यासाठी हेल्प लाइन नंबरवर कॉल करून किंवा मेल आयडीवर मेल करून तुम्ही उपाय काढू शकता.
पीएम किसानचा हेल्पलाइन क्रमांक- 155261 किंवा 1800115526 (टोल फ्री) किंवा 011-23381092 वर संपर्क साधला जाऊ शकतो.
तुम्ही तुमची तक्रार ई-मेल आयडी ([email protected]) वर पाठवू शकता.
तुम्ही अद्याप अर्ज केला नसेल, तर अधिकृत वेबसाइट pmkisan.gov.in वर जाऊन नोंदणी करा.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇