मुंबई : PM- Kisan… प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेंतर्गत फेब्रुवारी महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 13 वा हफ्ता वर्ग करण्यात आला असून शेतकरी आता 14 व्या हफ्त्याची आतुरतेने वाट बघत आहेत. तुम्हाला जर पीएम किसान योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर एक महत्त्वाचे काम पूर्ण करावे लागणार आहे. चला तर मग जाणून घेऊया..
पंतप्रधान किसान सन्मान निधी (PM-Kisan) योजना देशात 1 डिसेंबर 2018 पासून लागू करण्यात आली. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रतिवर्ष 6 हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते.
हे काम करा पूर्ण
प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा 14 वा हफ्ता मिळविण्यासाठी तुम्हाला ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. तुम्ही जर ई-केवायसी केले नसेल तर 14 व्या हप्त्यापासून तुम्ही वंचित राहू शकता. यासाठी तुम्ही पीएम किसान योजनेच्या संकेतस्थळ https://pmkisan.gov.in/ ला भेट देऊ शकता. या संकेतस्थळावर ई-केवायसीचा पर्याय तुम्हाला मिळेल आणि पुढे तुम्हाला आधार क्रमांक प्रविष्ट करावा लागेल. आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला आधारशी संलग्न असलेल्या मोबाईल क्रमांकारावर ओटीपी येईल. हा ओटीपी तुम्हाला प्रविष्ट करावा लागेल आणि ‘सबमिट करा’ यावर क्लिक करावे लागेल.
खात्यात 14 वा हप्ता येईल की नाही? येथे तपासा
पीएम किसान योजनेचा 14 वा हप्ता मिळेल की नाही हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या https://pmkisan.gov.in/ संकेतस्थळावर जावे लागेल. याठिकाणी लाभार्थी स्थितीचा पर्याय उपलब्ध आहे. या पर्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाकावा लागेल. तसेच यासोबत कॅप्चा कोड दिलेल्या असतो. तो देखील तुम्हाला टाकावा लागेल. यानंतर तुम्हाला सबमिट बटनावर क्लिक करावे लागेल. आता स्क्रीनवर तुम्हाला तुमची स्थिती दिसेल. यानंतर ई-केवायसी, पात्रता आणि जमीन साईडिंगच्या पुढील मेसेज तपासा. या तिघांच्या पुढे ‘Yes’ लिहिले असल्यास तुम्हाला 14 व्या हप्त्याचा लाभ मिळू शकतो. तसेच यापैकी एकाच्या पुढे NO लिहिले असल्यास हप्त्याच्या लाभापासून वंचित राहावे लागेल.