• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

डायबिटीस, ओबेसिटी नियंत्रणात ठेवणारे गव्हाचे नवे वाण विकसित

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 11, 2023
in हॅपनिंग
0
गव्हाचे नवे वाण
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मुंबई : रक्तातील साखर आणि लठ्ठपणा म्हणजेच डायबिटीस आणि ओबेसिटी नियंत्रणात ठेवणारे गव्हाचे नवे वाण विकसित करण्यात आले आहे. गव्हाच्या या नव्या वाणामध्ये अमायलोज स्टार्चचे प्रमाण जास्त असते, ज्यामुळे टाइप-2 मधुमेह आणि हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोगांचा धोका कमी होतो. रक्तातील साखरेचे नियमन आणि लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी हे गव्हाचे नवीन वाण अतिशय उपयुक्त ठरू शकेल. हे वैशिष्ट्यपूर्ण वाण विकसित करण्यासाठी दहा वर्षे संशोधन आणि गव्हाच्या पाच जातींचा संकर केला गेला.

लुधियानातील पंजाब कृषी विद्यापीठाने (PAU) गव्हाची ही नवीन जात विकसित केली आहे. LPBW RS1 असे या गव्हाच्या नवीन वाणाचे नाव आहे. पंजाब कृषी विद्यापीठाने (पीएयू) भारताला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवणाऱ्या हरितक्रांतीत सातत्याने योगदान दिले आहे. विद्यापीठाने निरंतर संशोधन आणि गुणवत्तेवर भर दिला आहे.

टोमॅटोला ‘या’ बाजार समितीमध्ये मिळतोय सर्वाधिक दर
https://eagroworld.in/tomato-fetches-the-highest-price-in-this-market-committee-11-7-2023/

पचन प्रक्रिया हळूवार; जास्त खाण्यावर बंधन

साधारणतः नेहमीच्या गव्हापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने ग्लुकोजच्या पातळीत त्वरित आणि जलद वाढ होते. मात्र, नवीन PBW RS1 वाणापासून बनवलेल्या चपात्या खाल्ल्याने ग्लुकोजच्या पातळीत एकदम वाढ होत नाही. या गव्हातील उच्च अमायलोज आणि प्रतिरोधक स्टार्चमुळे रक्तप्रवाहात ग्लुकोज हळूहळू मिसळत जाते. याव्यतिरिक्त, मंद पचन प्रक्रियेमुळे तृप्ततेची भावना निर्माण होते. त्यामुळे नेहमीच्या गव्हापासून बनवलेल्या चार चपात्याच्या तुलने PBW RS1 पासून बनवलेल्या फक्त दोन चपात्या खाल्ल्यानंतर पोट भरल्यासारखे वाटते.

इतर गव्हांपेक्षा प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण अधिक

PBW RS1 मध्ये इतर गव्हाच्या वाणांइतकेच म्हणजे सुमारे 66-70 टक्के एकूण स्टार्चचे प्रमाण आहे. इतर वाणात फक्त 7.5-10 टक्के प्रतिरोधक स्टार्च असते. मात्र, नव्या वाणात 30.3 टक्‍के म्हणजे लक्षणीयरीत्या जास्त प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण आहे. त्यात 56.63 टक्के अमायलोज असते, तर इतर वाणात ते फक्त 21-22 टक्के असते. ही वैशिष्ट्ये PBW RS1 या गावाच्या नव्या वाणाला कमी ग्लायसेमिक इंडेक्स वाढवण्यासाठी फायदेशीर बनवतात. त्यामुळे लठ्ठपणा आणि टाइप 2 मधुमेह यासारख्या आहार-संबंधित विकारांचे प्रमाणही कमी होते.

दहा वर्षे संशोधन; पाच वाणांचा संकर

PBW RS1 हे गव्हाचे नवीन वाण विकसित करायला तब्बल 10 वर्षांचा कालावधी लागला. पंजाब विद्यापीठातील वनस्पती प्रजनन आणि आनुवंशिकी विभागाचे प्रमुख डॉ. व्ही.एस. सोहू यांच्या नेतृत्वात नव्या वाणाचे संशोधन करण्यात आले. त्यासाठी गव्हाच्या विविध जातींचे संकर (व्हीट ब्रीडींग) करण्यात आले. नव्या वाणात विविधता विकसित करण्यासाठी प्रतिरोधक स्टार्चच्या पातळीवर परिणाम करणारे पाच नवीन जीन्स एकत्र केले गेले. असा प्रयोग करणारे पंजाब विद्यापीठ ही जगातील पहिली संशोधन संस्था ठरली आहे.

यापूर्वी पंजाब विद्यापीठाने गव्हाच्या इतर दोन जातींच्या संकरातून उच्च झिंक युक्त PBW Zn1 आणि चांगल्या, मऊ चपातीसाठी प्रीमियम गुणवत्तेसह PBW1 वाण विकसित केले होते. आता PBW RS1 हे नवे वाण त्याच्या विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे पूर्वीच्या दोन वाणांहून वेगळे ठरणार आहे.

बाजरीसारखे गुणधर्म; गव्हाच्या चवीचा अनुभव

बाजरी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. त्यामुळे बाजरी शरीरासाठी निरोगी मानली जाते, असे पंजाब विद्यापीठातील मुख्य व्हीट ब्रीडर अचला शर्मा यांनी कबूल केले. तथापि, गव्हाचे उत्पादन आणि वापर जास्त आहे. प्रत्येकजण आपल्या दैनंदिन आहारात बाजरी समाविष्ट करू शकत नाही. त्यामुळे सामान्य गव्हाच्या चवीचा अनुभव देणारी पण जास्त प्रतिरोधक स्टार्च आणि कमी ग्लायसेमिक इंडेक्स असलेल्या गव्हाचे वाण विकसित करण्याचे ध्येय होते. नव्या PBW RS1 वाणातून ते साध्य झाले.

कापसाच्या गॅप फिलिंगसाठी तरुणाचा भन्नाट प्रयोग 👇
https://youtu.be/vJ7zM35MvpM

कमी उत्पादकता हा मुख्य अडसर

पंजाबमधील इतर गव्हाच्या वाणांच्या तुलनेत PBW RS1 ची लागवड करण्यातील एक मुख्य अडसर आणि आव्हान म्हणजे त्याची कमी उत्पादकता! पंजाब विद्यापीठाच्या क्षेत्रीय चाचण्यांमध्ये नोंदवलेले नव्या वाणाचे सरासरी उत्पादन 43.18 क्विंटल प्रति हेक्टर होते. याउलट, राज्यातील सरासरी गहू उत्पादन 48 क्विंटल इतके आहे. त्यामुळे नव्या, उपयुक्त वाणाला सरकारने पाठबळ देण्याची अपेक्षा कुलगुरू डॉ. सतबीर सिंग गोसाल यांनी व्यक्त केली आहे. सरकारने पोषण सुरक्षेला चालना देणे आवश्यक आहे. त्यामुळे पंजाब सरकारने उच्च औषधी आणि पौष्टिक मूल्य असलेले उत्पादन म्हणून PBW RS1 गव्हाच्या प्रसारास योग्य मार्केटिंगसह पाठिंबा द्यायला हवा, असे डॉ. सिंग म्हणाले. धानाच्या इतर वाणांपेक्षा बासमती तांदळाचे भाव जास्त असतात. त्याच धर्तीवर इतर गव्हापेक्षा नव्या गव्हाची किंमत जास्त असू शकते, असेही ते म्हणाले.

पंजाब सरकारने प्रसार करण्याची अपेक्षा

पीबीडब्ल्यू आरएसवन या वाणाला पंजाब सरकारने एक विशेष-वैशिष्ट्य वाण म्हणून मान्यता द्यावी, अशी मागणी पंजाब विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सतबीर सिंग गोसाल यांनी केली आहे. त्यामुळे उत्पादकता कमी असूनही शेतकर्‍यांना या वाणाची लागवड वाढवण्यासाठी प्रोत्साहन देणे शक्य होऊ शकेल. पंजाब स्टेट कोऑपरेटिव्ह सप्लाय अँड मार्केटिंग फेडरेशनने (मार्कफेड) नव्या गव्हाच्या वाणाचे पीठ एक विशेष दर्जाचे पीठ म्हणून मार्केटिंग करावे, अशी कल्पना डॉ. सिंग यांनी मांडली आहे. त्यांच्या मते, PBW RS1 ही देशातील असे पाहिले गव्हाचे सुधारित वाण आहे, ज्यात उत्पादकतेपेक्षा औषधी तत्त्व आणि गुणवत्तेवर भर आहे.

यंदाच्या रब्बी हंगामापासून लागवड शक्य

PBW RS1 चे बियाणे शेतकऱ्यांना सप्टेंबरमध्ये उपलब्ध करून दिले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आगामी रब्बी हंगामात पंजाबातील शेतकरी या नव्या गव्हाची पेरणी करू शकतील. पौष्टिक फायद्यांव्यतिरिक्त, PBW RS1 पणे पिवळी पडण्याच्या बुरशीजन्य यलो रस्ट रोगाला पूर्णपणे प्रतिरोधक आहे. याशिवाय, बुरशीजन्य तपकिरी गंज म्हणजेच ब्राऊन रस्ट रोगाविरोधातही नवे गव्हाचे वाण माफक प्रमाणात प्रतिरोधक आहे. PBW RS1 गव्हाच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या आणि बिस्किटांची चव आणि इतर गव्हापासून बनवलेल्या चपात्या, बिस्किटाच्या तुलनेत फारच वेगळी, अधिक खुमासदार आहे.

Ellora Natural Seeds

चपातीचा अधिक पौष्टिक पर्याय, बेकऱ्यांनाही उपयुक्त

PBW RS1 या गव्हाच्या नव्या वाणापासून चपतीचा अधिक पौष्टिक पर्याय मिळणार असून हे नवे वाण बेकऱ्यांनाही उपयुक्त ठरेल. यातील उच्च अमायलोज आणि प्रतिरोधक स्टार्चचे प्रमाण यामुळे हे हाय एनर्जी फायबर फूड ठरते. बेकर्स आणि फूड प्रोसेसरना देखील ते फायदेशीर ठरते. त्यामुळे इतर बाहेरील स्त्रोतांकडून फायबर किंवा ऍडिटीव्ह न जोडता ते उच्च पोषण दर्जाची उत्पादने तयार करू शकतात.

एकूणच, पंजाब कृषी विद्यापीठाद्वारे विकसित केले गेलेले गव्हाचे PBW RS1 हे नवे वाण पौष्टिक सुरक्षेला चालना देण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरेल. याशिवाय, भारतातील आहार-संबंधित रोगांच्या अटकावातही हे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. केवळ उत्पादकतेपेक्षा पोषणमूल्य अन् गुणवत्तेवर लक्ष केंद्रित करून, शेतकरी आणि ग्राहक या दोघांनाही फायदेशीर ठरणारे हे सुधारित पीक वाण विकसित करणाऱ्या पंजाब विद्यापीठाचे ॲग्रोवर्ल्ड परिवार अभिनंदन करीत आहे.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल.👇

  • कृषी निविष्ठा गुणवत्ता व पुरवठ्याबाबत कृषी आयुक्तालयात नियंत्रण कक्ष स्थापन
  • नॅनो युरिया, नॅनो डीएपी फवारणीसाठी इफको खरेदी करणार 2,500 कृषी ड्रोन IFFCO Agri Drones
Tags: ओबेसिटीगव्हाचे नवीन वाणडायबिटीसपंजाब कृषी विद्यापीठ
Previous Post

राज्यात पुढील 4-5 दिवस संमिश्र पाऊस; विदर्भात आज यलो अलर्ट, मराठवाड्याच्या काही भागातही मुसळधार

Next Post

इंजिनिअर ब्रदर्स नोकरी सोडून रमले शेतीत

Next Post
नोकरी

इंजिनिअर ब्रदर्स नोकरी सोडून रमले शेतीत

ताज्या बातम्या

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2023
0

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2023
0

दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती

दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2023
0

शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2023
0

द्राक्ष – भुरीचे नियंत्रण..; डिसेंबर महिन्यातील व्यवस्थापन

द्राक्ष – भुरीचे नियंत्रण..; डिसेंबर महिन्यातील व्यवस्थापन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2023
0

कांदा बाजारभाव

कांदा बाजारभाव ; या बाजार समितीत मिळतोय सर्वाधिक दर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 4, 2023
0

राज्यात रविवारपासून पुन्हा तीन दिवस अवकाळी पाऊस; उत्तर-मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला तडाखा, विदर्भात ऑरेंज अलर्ट

राज्यात रविवारपासून पुन्हा तीन दिवस अवकाळी पाऊस; उत्तर-मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला तडाखा, विदर्भात ऑरेंज अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 3, 2023
0

दुग्ध व्यवसाय

हिवाळ्यात होऊ शकते दुग्ध व्यवसायात नुकसान; गुरांचे थंडीपासून संरक्षण करण्यासाठी करा हे उपाय

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2023
0

पाणी व्यवस्थापन

वाफसा आणि पिकांसाठी पाणी व्यवस्थापन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2023
0

ग्रेन ड्रायर म्हणजे काय ?

ग्रेन ड्रायर म्हणजे काय? शेतकरी सर्वात स्वस्त किंमतीला कोणते ग्रेन ड्रायर खरेदी करू शकतात?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2023
0

तांत्रिक

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2023
0

पाणी व्यवस्थापन

वाफसा आणि पिकांसाठी पाणी व्यवस्थापन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 2, 2023
0

कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण

कृषी सल्ला : वेलवर्गीय भाजीपाला फळांवरील फळमाशी कीड नियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 26, 2023
0

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2023
3

जगाच्या पाठीवर

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

सेंद्रिय खत (Organic Manure): शाश्वत शेतीसाठी वरदान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2023
0

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

दुर्दैवी, देशात दररोज 145 शेतकरी, शेतमजूर, रोजंदारी मजूर करताहेत आत्महत्या; महाराष्ट्रात सर्वाधिक आत्महत्या

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 6, 2023
0

दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती

दक्षिण भारतातील समुद्रात केली जाणारी लाल शेवाळाची सागरी शेती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2023
0

शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

शाश्वत विकास परिषदेत शेतकरी गटाचा सन्मान

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 5, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group