Monsoon Update : “स्कायमेट”ने जारी केलेल्या ताज्या हवामान बुलेटिननुसार, अजून मुंबईत मान्सून पोहोचलेला नाही. मुंबईत काल, सोमवारी (12 जून) पावसाचा शिडकावा झाला. 15 जूनपर्यंत मुंबईत पाऊस अपेक्षित आहे. मात्र, हा मान्सूनचा नव्हे तर बिपरजॉय चक्रीवादळाने पडणारा पाऊस आहे. मुंबई शहरात गेल्या 24 तासात 4 मिमी इतका हलका पाऊस झाला आहे. जूनाची 12 तारीख उलटली तरी मुंबईत नेहमीचा मान्सून पाऊस अजूनही पडलेला नाही. एरव्ही जून महिन्यात मुंबईत मासिक सरासरी 526 मिमी इतका मुसळधार पाऊस पडत असतो.
हे ही वाचा 👇
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे 15 जूनपर्यंत मुंबईत काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, या सरी दरवर्षी जूनमध्ये या काळात दिसतात तशा मुसळधार नसतील. 15 जून रोजी चक्रीवादळ गुजरात किनारपट्टी ओलांडणार असल्याने महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होईल. शिवाय, येत्या काही दिवसांत मुंबईत मान्सूनपूर्व पावसाचीच शक्यता आहे. चक्रीवादळ विसर्जित झाल्यानंतरच मुंबईत मान्सून पोहोचण्याची अपेक्षा आहे. सध्याच्या मान्सूनपूर्व सरींचे रूपांतर 15 जूननंतर मान्सूनच्या पावसात होईल, असा “स्कायमेट”चा अंदाज आहे.
बिपरजॉय चक्रीवादळामुळे गुजरात आणि देशाच्या इतर काही भागातही मान्सूनपूर्व पाऊस पडू शकतो, असा अंदाज या खासगी हवामान संस्थेने वर्तविला आहे.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇