Monsoon Return : मान्सूनच्या परतीची तारीख ठरली ; IMD अधिकाऱ्यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
मुंबई : Monsoon Return… देशभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीच्या पावसाने मोठे नुकसान केले आहे. दरम्यान, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, उत्तर महाराष्ट्रातून थांबलेल्या मान्सून या आठवड्याच्या अखेरीस परतण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याबाबत भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या (IMD) अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पुढील 3 ते 4 दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारतातील प्रदेशातून परण्याची शक्यता असल्याचे असे IMD ने दिलेल्या अहवालात सांगितले आहे.
कडबा कुट्टी मशीनसाठी 75 टक्के अनुदान
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/5hVluXXF3J0
पुढील दोन दिवसांत मान्सून परतीची (Monsoon Return) वाटचाल करणार
मागच्या 10 दिवसांपासून उत्तरकाशी, नझीयाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम आणि भरुचमधून मान्सून परतीच्या दिशेने वाटचाल करत आहे. दरम्यान, या महिन्यातील 14 आणि 15 तारखेपर्यंत उत्तर प्रदेश आणि बिहारपर्यंत राज्यात मान्सून कमी झालेला दिसेल. तर पुढच्या दोन दिवसांत महाराष्ट्र, छत्तीसगड आणि झारखंडच्या बहुतांश भागांतून मान्सून परतीची वाटचाल करणार आहे. दरम्यान मागच्या काही दिवसांत भारतातील काही भागात परतीच्या मान्सून पावसाने जोरदार हजेरी लावली. पश्चिमेत होत असलेल्या वादळामुळे मान्सून पुन्हा सक्रीय झाला होता परंतु मागच्या दोन दिवसांत त्याची तिव्रता कमी झाल्याचे दिसून येत असल्याचे पुणे वेदशाळेतील अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

‘या’ तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून पाऊस थांबणार
IMD च्या दिलेल्या माहितीनुसार, वायव्य आणि उत्तर भारतात परतीच्या पाऊस पूर्णपणे थांबेल. तसेच 14-15 ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागातून पाऊस थांबणार असल्याचे सांगण्यात आले. दक्षिण भारतातील काही प्रदेश वगळता उर्वरित देशात या महिन्याच्या सुरुवातीपासून अतिरिक्त पाऊस झाला आहे. उत्तर प्रदेश (696%), उत्तराखंड (539%), हरियाणा (577%), दिल्ली (625%) आणि मध्य प्रदेश (301% टक्के) पाऊस झाला आहे.

मान्सूनच्या माघारीस पोषक स्थिती
मान्सून वायव्य भारतातून 3 ऑक्टोबर रोजी परतल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. परतीच्या वाटचालीत मान्सूनची उत्तरकाशी, नाझियाबाद, आग्रा, ग्वालियर, रतलाम, भारूच पर्यंतची सीमा तब्बल आठवड्यानंतरही म्हणजेच 11 ऑक्टोबर रोजी कायम होती. माघारीस पोषक वातावरण होत असल्याने चार ते पाच दिवसांत मध्य भारताच्या काही भागातून मान्सून गायब होण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇



