मुंबई : शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. 2021 मध्ये ज्या शेतकऱ्यांनी कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत अर्ज भरले आहेत. अशा शेतकऱ्यांना आता सेल्फ सर्वेसाठी मॅसेज यायला सुरु झाले आहेत. केंद्र आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जात असतात. यातीलच कुसुम सोलर योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सोलर पंपसाठी अनुदान दिले जात आहे.
राज्यातील शेतकऱ्यांनी सप्टेंबर 2021 मध्ये कुसुम सोलर योजनेसाठी अर्ज भरले होते. यामधील काही शेतकरी पात्र झाले होते आणि काही पात्र झाले नव्हते. त्यानंतर पुन्हा एकदा मे महिन्यामध्ये अर्ज सुरू झाले होते आणि तेव्हा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अर्ज केले होते. अशा अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची लाभार्थी शेतकऱ्यांची यादी फायनल करण्यात आली आहे. आता या योजनेमध्ये पात्र झालेल्या शेतकऱ्यांना सेल्फ सर्वेचे मेसेज सुरु झाले आहे.
सेल्फ सर्वेचे मेसेज सुरू
प्रधानमंत्री कृषी सोलर योजनेच्या लाभार्थ्यांना आता सेल्फ सर्वेचे मॅसेज येऊ लागले आहेत. शेतकऱ्यांना हा सर्व्हे ऑनलाईन पद्धतीने करता येणार आहे. तुम्हाला यासाठी मोबाईलमध्ये प्लेस्टोअर (Play Store)वरून महाऊर्जेचं ‘मेडा’ (MEDA) नावाचं ॲप डाऊनलोड करावे लागेल. हे ॲप केवळ ‘कुसुम ब’च्या लाभार्थ्यांसाठी आहे. यावर सेल्फ सर्व्हेच्या ऑप्शनवर तुम्हाला सर्व्हे करावा लागणार आहे. तसेच प्रधानमंत्री कुसुम योजना व ऑनलाईन अर्ज करण्याची संपूर्ण माहिती महाऊर्जा (http://www.mahaurja.com) या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
जमिनीची अट काय आहे?
2.5 एकर क्षेत्रासाठी 3 HP सोलर पंपाची शेतकरी मागणी करू शकतो. मात्र, त्याहून कमी क्षेत्र असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकत नाही.
5 एकर जमिनीसाठी 5 HP व त्याहून जास्त क्षेत्र धारण करणाऱ्या शेतकऱ्यांना 7.5 HP DC पंप मिळू शकतो.
5 एकरापेक्षा जास्त क्षेत्र असणारा शेतकऱ्याला जर 10 HP चा सोलर पंप हवा असेल तर शासनाच्या माध्यमातून 7.5 HP पर्यंतचा खर्च देण्यात येतो. आणि उर्वरित खर्च सदर शेतकऱ्याला करावा लागणार आहे.
तसेच या सौर कृषीपंपाची किंमत याप्रमाणे आहे. 1.56 लाख रुपये (3 HP), 2.225 लाख रुपये (5 HP), 3.435 लाख रुपये (7.5 HP) इतकी आहे.
या योजनेसाठी लागतील ही कागदपत्रे
7/12 उतारा (विहिर/कुपनलिका शेतात असल्यास 7/12 उताऱ्यावर नोंद आवश्यक) एकापेक्षा जास्त नावे असल्यास इतर भोगवटादाराचे ना हरकत प्रमाणपत्र 200 रुपये च्या मुद्रांक कागदावर सादर करावे. आधारकार्ड प्रत. रद्द केलेली धनादेश प्रत/बँक पासबुक प्रत. पासपोर्ट आकाराचा फोटो. शेत जमीन/विहिर/पाण्याचा पंप सामाईक असल्यास इतर भागीदाराचे ना हरकत प्रतिज्ञापत्र.