मुंबई : शेतीच्या सुरुवातीपासूनच शेतकरी आणि पक्ष्यांमधील लढाई हा संघर्ष कायमच सुरू आहे. अनेक पक्षी व कीटक कापणीच्या 48 तासातच 75% पीक नष्ट करू शकतात, ज्यामुळे शेती उत्पन्नात मोठी हानी होते. कीड नियंत्रणासाठी आजवर जगभरात अनेक उत्पादने, साधने आजमावली गेली आहेत. मात्र, कीटक व पक्षी निसर्गाच्या उत्क्रांतीवादी नियमाने या सर्व साधनांशी जुळवून घेत नुकसानी कायम ठेवतात.
आता कीटक व पक्ष्यांच्या नुकसानीवर र्होड आयलंड विद्यापीठातील एका संशोधकाने कायमस्वरूपी उपाय शोधून काढला आहे. ऱ्होड आयलंड हे अमेरिकेतील आकाराने सर्वात लहान राज्य आहे. अमेरिकेच्या ईशान्य भागातील न्यू इंग्लंड प्रदेशात वसलेला हा शेतीप्रधान प्रदेश आहे. याच र्होड आयलंडमधील विद्यापीठातील एका संशोधकाने पक्ष्यांना शेतापासून दूर ठेवण्यासाठी नवीन प्रतिबंधक शोध लावला आहे. या संशोधकाने एक लेसर उपकरण विकसित केले आहे. हे उपकरण हिरव्या रंगाचा लेझर प्रकाश सोडते. सूर्यप्रकाशात मानवाला हे हिरवे लेझर किरण दिसत नाही. पक्ष्यांच्या मात्र हिरव्या रंगाच्या संवेदनशीलतेमुळे हे लेझर किरण पूर्ण प्रभावित करते. हे स्वयंचलित लेसर डार्ट्स 600 फुटांपर्यंतच्या शेताची राखणदारी करते. पक्षी या हिरव्या रंगाच्या लेझर प्रकाशाला घाबरतात. या चकव्यामुळे ते लेझर किरण क्षेत्रात फिरकतही नाहीत.
पीक नष्ट करण्यापासून रोखते
हे उपकरण पक्ष्यांना कोणतेही पीक नष्ट करण्यापासून प्रभावीपणे रोखते. पक्षी त्याचा धसका घेऊन त्या भागात फिरकतही नाहीत. कीटकांवरही तसाच परिणाम होतो. शेताला संरक्षक जाळीच्या वापराच्या तुलनेत हे उपकरण पर्यावरणपूरक आणि कमी कटकट, कमी श्रमाचे व वापरायला सहज-सोपे, सुटसुटीत आहे. “लेझर स्केअरस्क्रोज” असे या उपकरणाचे नाव आहे, ज्याचा अर्थ कावळ्यांना (पक्ष्यांना) घाबरणारे लेझर उपकरण.
तणांच्या नियंत्रणासाठी कृषीसम्राटचे ग्लायकिल… | Glykill |
या लेझर उपकरण तंत्रज्ञानातही अनेक भिन्नता, विविधता आहेत. त्यापैकी काही सौर उर्जेवर चालतात आणि पक्ष्यांवर ऑटोमॅटिक लक्ष ठेवणाऱ्या स्वयं-लक्ष्यीकरण प्रणालीसह येतात. हे तंत्रज्ञान आता जगभरातील अनेक आघाडीच्या कीटक नियंत्रण कंपन्यांनी देखील स्वीकारले आहे. हे उपकरण 90% पर्यंत पीक नुकसान टाळू शकते. ही एक विनाआवाजाची भन्नाट युक्ती आहे, ज्याचा इतर शेजाऱ्यांना काहीही व्यत्यय होत नाही. हे अत्यंत प्रभावी उपकरण असल्याचे दिसून आले आहे.
लवकरच पोहोचेल जगभरात
आजपर्यंत तरी, पक्षी या उपकरणाच्या घाबरण्याच्या डावपेचांशी जुळवून घेण्याची शक्यता कमीच असल्याचे स्पष्ट झाले आहे. सध्या हे उपकरण अमेरिकेत लोकप्रिय होत असून लवकरच जगभरात पोहोचेल. आपल्याकडे सध्या या धर्तीवरील कमी क्षमतेची “ॲनिमल-बर्ड रिपेलियंट” उपलब्ध आहेत. अर्थात ती फारशी प्रभावी नसल्याचे दिसून आले आहे.