देशात सरकारी खरेदीच्या निर्णयानंतर मक्याचे भाव वाढले आहेत. इथेनॉलसाठी सरकारी मका खरेदीला त्याचा फटका बसण्याची भीती आहे. गेल्या हंगामात मक्याची दोन हजार नव्वद रुपये इतक्या एमएसपी दराने खरेदी केली गेली होती. मात्र, लागवड जास्त असूनही, गेल्या वर्षीच्या 38 दशलक्ष टन उत्पादनाच्या तुलनेत यंदा मका उत्पादन 32.4 दशलक्ष टनांपर्यंत घसरण्याचा अंदाज आहे.
बिहारमध्ये सध्या मक्याचे सरासरी भाव 2,400 रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. फेब्रुवारी अखेरीस हा भाव 2,300 रुपये प्रति क्विंटल इतका होता. यंदा बिहार बरोबरच कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्येही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक मका लागवड आहे. त्यामुळं एप्रिलच्या अखेरीस रब्बी मका बाजारात येण्यास सुरुवात होईल, त्या वेळी हे भाव खाली येतील, असं सरकारी यंत्रणा सांगत आहेत.
दुसरीकडं, साखरेचा मुबलक पुरवठा प्रभावित होऊ नये म्हणून, इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाच्या मळीऐवजी मक्याचा वापर सध्या होत आहे. इथेनॉल निर्मितीसाठी उसाचा रस वापरण्यावर साखर कारखान्यांना बंदी घालण्यात आली आहे. त्यानंतर एमएसपी दराने सरकारी मका खरेदी करणाऱ्या केंद्रीय एजन्सींनी 40 हून अधिक डिस्टिलरीजसोबत सामंजस्य करार केले आहेत.
वाढलेल्या भावामुळे शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना मक्याची विक्री केल्यास सरकारी खरेदी कमी राहिल. त्यामुळं डिस्टिलरीजना इथेनॉल निर्मितीसाठी मक्याची उपलब्धता कमी राहण्याची भीती आहे. यंदा शेतकऱ्यांना आकर्षित करणाऱ्या हमी भाव दराचे सरकारी खरेदीपुढे मोठे आव्हान राहील.
- 🥭 आपल्याला अस्सल देवगड हापूस उपलब्ध करून देण्यासाठी अॅग्रोवर्ल्डची टीम निघाली कोकणच्या दिशेने..
- 🐐 अॅग्रोवर्ल्डतर्फे 18 सप्टेंबरला जळगावात एकदिवसीय कार्यशाळा.. मर्यादित प्रवेश; कार्यशाळेतच सहभाग प्रमाणपत्र वाटप ठिकाण – डीपीडीसी हॉल, जिल्हाधिकारी कार्यालय, जळगाव
- 🌱 “केळी लागवडीचे यशस्वी रहस्य – रेवा फ्लोरा टिशू कल्चर !” 🍌
- ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा
- ॲग्रोवर्ल्डतर्फे देवगड हापूस गुढीपाडव्याच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध होणार…