मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या अनुमनानुसार, येत्या 24 तासात पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाचे अनुमान आहे. पुणे व सातारा जिल्ह्यातही चांगल्या पावसाची शक्यता आहे. याशिवाय, ठाणे, रायगड व रत्नागिरीतही मोठ्या पावसाचे अनुमान आहे. विदर्भात गडचिरोली, चंद्रपूर आणि यवतमाळमध्येही 120 मिलिमीटरपर्यंत पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राज्यात पावसाचे धुमशान सुरूच आहे. पुणे, रायगडमध्ये आज रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि विदर्भातील गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
ॲग्रोवर्ल्डच्या सल्ल्याने मर रोगावर नियंत्रण
राज्यात पुढील 4-5 दिवस मुसळधारेचे असतील असे पुणे वेधशाळेचे के.एस. होसाळीकर यांनी म्हटले आहे. पालघर, रायगडला रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील 2 दिवस मध्य भारताच्या काही भागातही अति मुसळधार पाऊस होईल. कोकणचा काही भाग, सातारा, पुणे, नाशिक घाट परिसरातही पाऊस थोडा जास्त असेल. मराठवाड्यातील काही भागात तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस राहील.
पूर्व विदर्भात हाहाकार; माथेरानमध्ये 342 मिमी पाऊस
पूर्व विदर्भात पावसाने हाहाकार माजविला आहे. गेल्या 24 तासात चंद्रपूरमध्ये 242 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. माथेरानमध्ये राज्यातील सर्वाधिक 342.6 मिमी पाऊस झाला. गेल्या 24 तासात महाबळेश्र्वरमध्ये 275.6 मिमी पाऊस झाला. या पावसाच्या हंगामातील 2,000 मिमीचा टप्पा महाबळेश्वरने पार केला. रायगड जिल्ह्यातही अतिवृष्टी झाली. कर्जतमध्ये 252.8, पेणमध्ये 235, पोलादपूर 223, खालापूर 213, महाड 193, सुधागड 167, उरण 165, माणगाव 128, पनवेल 115.4 आणि अलिबाग तालुक्यात 102 मिमी पावसाची नोंद झाली. याशिवाय, राज्यात इतरत्र भीमाशंकर 268 मिमी, प्रतापगड 250, खंडाळा 241, सावंतवाडी 170, तर गगनबावडा तालुक्यात 140 मिमी पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यात 70 मिमीहून अधिक पाऊस झाला आहे. पुण्यात लोणावळ्यात 216.5 तर लवासा क्षेत्रात 131 मिलिमीटर पाऊस नोंदविला गेला.
निर्मल रायझामिका 👇
जळगाव जिल्ह्यातील गेल्या 24 तासातील पाऊस
पाचोरा – 42 मिलिमीटर, बोदवड – 32 मिमी, मुक्ताईनगर – 21, भडगाव – 20, जामनेर – 19, यावल – 13.3, धरणगाव – 9, अमळनेर – 8, चाळीसगाव – 7, एरंडोल – 4, चोपडा – 6, भुसावळ – 2.2, रावेर – 2 मिमी.
छत्रपती संभाजीनगर, जालना जिल्हयातील पाऊस
संभाजीनगर : सोयगाव – 30, खुलताबाद – 25, सिल्लोड – 18, फुलंब्री – 11, गंगापूर – 9.
जालना : मंठा – 61, घनसांगवी – 35, जाफराबाद – 29, भोकरदन – 18, बदनापूर – 10.
आज दिवसभरात अपेक्षित जिल्हानिहाय पाऊस
भारतीय हवामान विभागाच्या अनुमानानुसार, येत्या 24 तासात अपेक्षित पाऊस (बुधवार, 19 जुलै सकाळी 8:30 ते गुरुवार, 20 जुलै सकाळी 8:30) –
जळगाव – 38 मिलिमीटर, नाशिक – 55 मिमी, नंदुरबार – 35, धुळे – 38, पुणे – 75, अहमदनगर – 40, छत्रपती संभाजीनगर – 36, जालना – 14, ठाणे – 120, पालघर – 135, रायगड – 115, रत्नागिरी – 112, सिंधुदुर्ग – 70, बुलडाणा – 23, अकोला – 18, अमरावती – 30, गडचिरोली – 125, गोंदिया – 72, चंद्रपूर – 121, भंडारा – 66, नागपूर – 25, वर्धा – 68, वाशिम – 69, यवतमाळ – 120, सोलापूर – 13, कोल्हापूर – 45, सांगली – 20, सातारा – 95, परभणी – 30, बीड – 20, हिंगोली – 18, लातूर – 20, नांदेड – 22, धाराशिव – 15 मिमी.