• Home
    • आमच्याविषयी
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

श्रीरामपूरच्या 11 शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या FPCची प्रेरणादायी कहाणी; आता 120 कोटी रुपयांचे किसान-कनेक्ट ॲग्रीटेक स्टार्टअप

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 1, 2023
in यशोगाथा
0
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

किसान-कनेक्ट (KisanKonnect) ही महाराष्ट्रातील तरुण शेतकऱ्यांनी स्थापन केलेल्या FPCच्या सामूहिक प्रयत्न आणि जिद्दीची कथा आहे. या शेतकर्‍यांनी आता इतरही अनेक शेतकर्‍यांना एकत्र केले आहे. बाजार समिती, APMC किंवा मध्यस्थ, दलाल यांसारख्या पारंपरिक बाजार-चालित शक्तींवर अवलंबून न राहता त्यांनी शेतकऱ्यांना थेट ग्राहकांशी कनेक्ट केले. शेतकऱ्यांच्या सहअस्तित्वासाठी आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी एक भक्कम कृषी व्यवसाय चळवळ यातून उभी राहिली आहे.

FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना

https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/

कोविड आपत्तीने मिळाली संधी

मार्च 2020 मध्ये कोरोना व्हायरसच्या अचानक प्रादुर्भावामुळे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील अकरा शेतकर्‍यांनी त्यांच्या भाज्या आणि फळ उत्पादनांसाठी बाजार गमावला. त्यांचे नियमित उत्पन्न प्रभावित झाले. या आव्हानात्मक काळातून मार्ग शोधण्यासाठी ते धडपडत होते. हा प्रगतीशील शेतकऱ्यांचा समूह होता, त्यांच्यापैकी काहींकडे कृषी, व्यवस्थापन या विषयातील पदवी होती, तर काहींना कृषी रिटेल साखळीत काम करण्याच्या पूर्वीचा अनुभव होता.

व्हॉटस्-अप ऑर्डरने केली सुरुवात

महामारीच्या संकटांना शरण न जाता, या तरुण शेतकऱ्यांनी एक नवीन संकल्पना शोधली – कृषी उत्पादन त्यांच्या शेतातून थेट ग्राहकांच्या दारापर्यंत पोहोचवणे! लॉकडाऊनच्या काळात सुरुवातीला व्हॉट्सअ‍ॅप आणि फोनद्वारे ऑर्डर नोंदवून मुंबई आणि पुण्यातील काही गृहनिर्माण सोसायट्यांना पुरवठा केला गेला. ताज्या, आरोग्यदायी आणि दर्जेदार उत्पादनांमुळे मागणी वाढू लागली. वाढत्या ऑर्डरमुळे, सुरुवातीच्या यशाने, नव्याने धोरणे आखली गेली.

40 लाखांची प्राथमिक उलाढाल

किसान कनेक्टने पहिल्या दोन महिन्यांत 40 लाख रुपयांच्या उलाढालीपासून सुरुवात केली. भाजीपाला आणि फळांच्या पुरवठ्यासाठी 2,000 हून अधिक शेतकरी त्यांच्याशी जोडले गेले. मुंबई आणि पुण्यात दररोज शेकडो पेट्यांची विक्री करून 10 कोटी रुपयांची उलाढाल पार केली.

कृषी उत्पादन बाजारपेठेतील भविष्याचा वेळीच अंदाज

आज, अनेक D2C म्हणजेच डायरेक्ट टू कस्टमर (थेट ग्राहकांपर्यंत) ॲग्रीटेक स्टार्टअप वाढले आहेत. प्रत्येकजण घरोघरी भाज्या आणि फळे पुरवत आहे. परंतु, KisanKonnect हे फार कमी FPCsपैकी एक होते, ज्यांनी D2C कृषी उत्पादन बाजारपेठेतील भविष्याचा वेळीच अंदाज लावला. इतकेच नाही तर शेतकऱ्यांसाठी एक यशस्वी व्यवसाय मॉडेल तयार केले.

इतर शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात कराराच्या आधारावर खरेदी करणाऱ्या, त्यांचे मार्कअप जोडून अंतिम ग्राहकांना विकणाऱ्या उद्योजकांद्वारे प्रोत्साहन दिलेल्या इतर ॲग्रीटेक स्टार्टअपपेक्षा किसान-कनेक्ट हे वेगळेच मॉडेल आहे. KisanKonnect ची जाहिरात तिऱ्हाईत उद्योजकांद्वारे केली जात नाही, तर शेतकऱ्यांकडूनच त्यांच्या फायद्यासाठी आणि स्वत: द्वारेच केली जाते. सर्व प्रकारचे मध्यस्थ, दलाल काढून टाकल्याने ग्राहकांच्या हातात वाजवी खर्चात ताजे उत्पादन मिळते.

अलीकडे, तंत्रज्ञानाच्या आघाडीवर, या प्रगतीशील शेतकऱ्यांनी ट्रेसेबिलिटी सारखी विशेष QR कोड-समर्थित वैशिष्ट्ये सादर केली आहेत. त्यामुळे ग्राहक त्यांच्या घरी आलेल्या कृषी उत्पादनाची उत्पत्ती आणि स्त्रोत बघून उत्पादनाची विश्र्वासार्हता, खात्रीने तपासून पाहू शकतात.

FPC (फार्मर प्रोड्युसर कंपनी) ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 कोटींपासून 6 कोटींपर्यंत अनुदानाच्या योजना
https://eagroworld.in/loan-up-to-%e2%82%b9-10-crore-to-fpc-farmer-producer-company/

फक्त FPC नाही तर एक सामाजिक एकीकरण मॉडेल

KisanKonnect म्हणजे केवळ एक FPC नाही तर एक सामाजिक एकीकरण मॉडेल आहे, जेथे शेतकऱ्यांनी इतर शेतकऱ्यांना एकत्र केले आहे. APMC किंवा मध्यस्थ यांसारख्या बाजार-चालित शक्तींवर अवलंबून न राहता सह-अस्तित्वासाठी आणि आर्थिकदृष्ट्या प्रगती करण्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः एकत्र येऊन ही एक मोठी चळवळ उभी केली आहे. या शेतकऱ्यांनी पॅकिंग सेंटर्स, टेक-लेड कॉल सेंटर्स इत्यादीची स्थापना केली आहे. कृषी शास्त्रज्ञ आणि श्रीरामपूर येथील स्थानिक कृषी विकास केंद्राच्या मदतीने कृषी नियमांचे पालन करून ग्रामीण भागातील लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या आहेत.

शिल्पा शेट्टीने केली गुंतवणूक

चित्रपट अभिनेत्री शिल्पा शेट्टी कुंद्रा आणि सेलिब्रिटी शेफ मेघना यांनी “किसानकनेक्ट”चे समर्थन केले आहे. शिल्पा शेट्टी यांनी यात अघोषित गुंतवणूक केली आहे. अनेक ग्राहकांबरोबरच अनेक सेलिब्रिटीही आता किसानकनेक्टेड झाल्या आहेत. ­विवेक निर्मळ आणि निधी निर्मळ या तरुण जोडप्याने शेतकऱ्यांना एकत्र घेऊन 2020 मध्ये किसान कनेक्ट स्टार्टअप म्हणून स्थापन केले. 5,000 शेतकऱ्यांच्या नेटवर्कमधून ते थेट कृषी उत्पादने मिळवतात आणि मुंबई, पुण्यातील ग्राहकांपर्यंत पोहोचवतात. फार्म-टू-फोर्क असे या ॲग्रीटेक स्टार्टअपचे स्वरूप आहे. आपल्याच एफपीसीकडून ते माल घेतात. ग्राहकांना थेट त्याच्या मोबाइल अॅप आणि फार्म स्टोअरद्वारे सेवा प्रदान करतात. या ॲग्रीटेक स्टार्टअपने आत्तापर्यंत वार्षिक रेव्हेन्यू रन रेट (ARR) मध्ये 120 कोटी रुपये कमावल्याचा आणि पुणे-मुंबईतील 1 लाखाहून अधिक ग्राहकांना सेवा देण्याचा दावा केला आहे.

किसान-कनेक्ट आता बिगबास्केट सारख्या ईकॉमर्स मार्केटप्लेससह WayCool आणि Ninjacart या दोन्ही B2B ऍग्रीटेक कंपन्यांशी स्पर्धा करत आहे. अर्थात ही स्टार्टअप ग्राहकांना त्याच्या मोबाइल ॲप आणि फार्म स्टोअर्सद्वारे थेट सेवा देते, जे या स्पेसमधील DeHaat, Ninjacart आणि WayCool या इतर स्पर्धकांपेक्षा अगदी वेगळे आहे.

Shri Renuka Sales
Shri Renuka Sales

1.75 लाख एकर लागवडीखालील जमीन व्यवस्थापन

सध्या किसान-कनेक्ट स्टार्टअप सुमारे 1.75 लाख एकर लागवडीखालील जमीन व्यवस्थापित करते आणि 200 पेक्षा जास्त प्रकारच्या भाज्या आणि 100 प्रकारची फळे ऑनलाइन ऑफर करते. दर महिन्याला भाजीपाला आणि फळांचे अंदाजे 1.5 लाख बॉक्स वितरित करत असल्याचा कंपनीचा दावा आहे.

संयमाने तयार केले यशस्वी मॉडेल

किसान-कनेक्टचे संस्थापक विवेक निर्मळ सांगतात, “आम्ही पुरवठा साखळीला प्राधान्य देणारी कंपनी तयार करण्यासाठी संयमाने आमचे मॉडेल तयार केले. त्यासाठी तीन वर्षे घेतली. शेताच्या पातळीवर काम करणे, कचरा कमी करणे, शेवटच्या टप्प्यावर एक मजबूत नेटवर्क उभारणे आणि ग्राहकांच्या अनुभवात पसंती मिळवणे, हे नेहमीच आमचे प्राधान्य राहिले आहे. आम्ही जलद वितरणापेक्षा चांगल्या गुणवत्तेला महत्त्व देतो.”

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • भाजीपाला लागवडीतून शोधला प्रगतीचा मार्ग
  • सिंधिया राजघराण्यातील राजकुमार महाआर्यमन यांनी सुरू केले शेती-उद्योग स्टार्ट अप
Tags: FPCKisan-Connectकिसान-कनेक्टकृषी व्यवसायॲग्रीटेक स्टार्टअप
Previous Post

अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही – मुख्यमंत्री शिंदे

Next Post

पाऊस उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून बरसणार; मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात आज सरींची शक्यता

Next Post
पाऊस उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून बरसणार

पाऊस उत्तर महाराष्ट्रात उद्यापासून बरसणार; मराठवाडा, दक्षिण-मध्य महाराष्ट्रात आज सरींची शक्यता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

AIF Agri Infrastructure Fund

AIF Scheme : या योजनेत शेतकर्‍यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

पॉट इरिगेशन

उत्तर कर्नाटकात 2,000 वर्षे पुरातन पॉट इरिगेशन सिंचन प्रणाली पुनरुज्जीवित!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

आंध्र प्रदेशातील पिके

सिंचनाच्या “या” पद्धतीमुळे दुष्काळापासून वाचली आंध्र प्रदेशातील पिके!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

किसान क्रेडिट कार्ड

किसान क्रेडिट कार्ड : वार्षिक 4% व्याजाने आता सहज मिळणार शेतकरी कर्ज

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 20, 2023
0

AgroWorld Magazine Sepr 2023

AgroWorld अॅग्रोवर्ल्ड मासिक सप्टेंबर 2023 Great Positive Stories

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 18, 2023
0

सीताफळ लागवडीतून साधला उन्नतीचा मार्ग !

सीताफळ लागवडीतून साधला उन्नतीचा मार्ग !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 18, 2023
0

Return Monsoon Delayed India

पाऊस सुरूच राहणार; रिटर्न मान्सूनची तारीख लांबणार!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 18, 2023
0

तांत्रिक

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

कृषी सल्ला : भाजीपाला पीक व्यवस्थापन – लागवड, रोगनियंत्रण

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 13, 2023
3

कृषी सल्ला : खोडवा ऊस, सुरू ऊस पीक व्यवस्थापन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 12, 2023
2

कृषी सल्ला : आडसाली ऊस लागवड

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 9, 2023
1

झूम खेती

ईशान्य भारतातील झूम खेती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2023
0

जगाच्या पाठीवर

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

सीएमव्हीमुळे नुकसान झालेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार मदत

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

AIF Agri Infrastructure Fund

AIF Scheme : या योजनेत शेतकर्‍यांना मिळतेय 2 कोटी रुपयांपर्यंतच्या कर्जावर पत हमी

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

पावसाच्या अनियमिततेचा शेतकर्‍यांना मोठा फटका

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 22, 2023
0

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र, राज्यात पुढील 4-5 दिवस पावसाची शक्यता

by टीम ॲग्रोवर्ल्ड
September 21, 2023
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

WhatsApp Group