धुळे : कांदा निर्यातबंदीमुळे कांदा उदत्पादक शेतकऱ्यांना फटका बसत होता. यामुळे कांदा दर घसरल्याने शेतकरी चिंतेत होते. दरम्यान, आता कांद्यावरी निर्यात खुली झाल्याने धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील दहिवेल आणि पिंपळनेर येथील उपबाजार समितीत क्विंटल मागे 500 ते 700 रुपयांनी कांद्याचे दर वाढले आहेत.
येथे कांद्याला 1800 ते 2100 पर्यंत प्रतिक्विंटल भाव मिळाला. गेल्या आठवड्यात कांद्याला सरासरी प्रतिक्विंटल 1500 ते 1800 रुपये दर मिळाला होता. कांद्याला बऱ्यापैकी भाव मिळत असल्याने साठवणूक केलेल्या कांदा बाजारात विक्रीसाठी येण्याची शक्यता आहे त्यामुळे आवक अधिक वाढण्याची देखील शक्यता आहे.