मुंबई : चीन समुद्रातील नोरू चक्रीवादळामुळे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले असून वादळी वारे वाहत आहेत. त्यामुळे आर्द्रता वाढल्याने पाऊस पडत आहे. हा पाऊस ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत कायम राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच त्याचा फटका महाराष्ट्रासह 20 राज्यांना बसण्याची शक्यता देखील हवामान विभागाने वर्तविली आहे.
देशभरात मान्सूनचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. अशात भारतीय हवामान खात्याने ओडिशा, छत्तीसगड, गुजरात, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे.
शेतकऱ्यांनी लवकरात लवकर कापूस वेचणीसह पावसापूर्वीची कामे करावी
रब्बी हंगामाला सुरुवात झाली असून हरभरा, गहू यासारख्या पिकाच्या मशागतीची कामे सुरु झाली आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना आर्थिक समस्या भेडसावू लागल्या आहे. अशातच आता महाराष्ट्रासह 20 राज्यांना पावसाचा फटका बसण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, शेतातील पिकं काढणीच्या वेळेसच पावसानं हजेरी लावल्यानं शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी अद्याप कापूस वेचणीसह सोयाबीन काढणी झालेली नाही त्यामुळे शेतकऱ्यांनी लवकरात लवकर पावसापूर्वीची कामे करावी.
एकात्मिक फलोत्पादन अभियान : वैयक्तिक शेततळे अस्तरीकरण योजनेसाठी 50% अनुदान ; असा घ्या लाभ
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/vniBFTSBoj4
महाराष्ट्रातील ‘या’ जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी
विदर्भ, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रासह अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील दोन ते तीन दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. महाराष्ट्रातही अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व आणि पश्चिम विभागासाठी अलर्ट जारी करण्यात आला आहे. पूर्व भागात गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदियासाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला असून नागपूर, वर्धा आणि यवतमाळसाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही रत्नागिरी, पुणे, रायगड आणि पालघर या चार जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. सातारा, कोल्हापूर, नाशिक, ठाणे या जिल्ह्यांमध्येही मुसळधार पावसाची शक्यता आहे.
राज्यात आणखी तीन दिवस पावसाचा इशारा
राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस होत असून पुढील तीन दिवस हीच परिस्थिती कायम राहणार असल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी रेड आणि ऑरेंज अलर्ट
हवामान खात्यानुसार, पुढील काही दिवस उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या काही भागात पाऊस पडेल. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. ७-८ ऑक्टोबर रोजी उत्तराखंडमधील कुमाऊं आणि गढवाल भागात अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करत रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर उत्तर प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचबरोबर मध्य प्रदेश, छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेशमध्ये काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२० राज्यांसाठी यलो अलर्ट
हवामान खात्याने देशातील २० राज्यांमध्ये पावसाबाबत यलो अलर्ट जारी केला आहे. म्हणजेच मेघगर्जनेसह जोरदार वाऱ्यासह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही राज्ये आहेत – उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेश, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्र, तेलंगणा, पुद्दुचेरी, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, केरळ, सिक्कीम, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा.
यामुळे माघार घेण्यास झाला विलंब
नैऋत्य मान्सून भारतातून माघार घेत असल्याने त्याची माघार घेण्याची रेषा सध्या उत्तरकाशी, नझीबाबाद, आग्रा, ग्वाल्हेर, रतलाम आणि भरूचमधून जात आहे. साधारणपणे, मान्सून उत्तराखंडमधून 30 सप्टेंबरपर्यंत आणि उत्तर प्रदेशातून 5 ऑक्टोबरपर्यंत निघतो, ज्यामुळे या वर्षी माघार घेण्यास विलंब झाला.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇