मुंबई – महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा येथे मंगळवारी (9 जुलै) पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने जारी केला आहे. 12 जुलैपर्यंत मुंबईत काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आयएमडीने (IMD) वर्तवला आहे.
पावसाचा आजही जोर कायम राहणार आहे. मुंबईसह उपनगराला पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला असून रायगड रत्नागिरीलाही मुसळधार पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. तसेच, आणखी पुढील चार दिवस असाच पाऊस असेल, असा इशारा भारतीय हवामान विभागाने (IMD) दिला आहे.
IMD : या जिल्ह्यांना ऑरेंज आणि यलो अलर्ट
पालघर, ठाणे, अमरावती, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, छ. संभाजीनगर, जालना, बुलढाणा, वाशीम, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, उस्मानाबाद, सोलापूर, सांगली आणि अहमदनगर या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.