मुंबई : (IMD 19 Aug 2024) गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती मात्र, आता पुन्हा पावसाने उघडीप दिली आहे. पुण्यात काल रविवारी (18 ऑगस्ट) पावसाने जोरदार हजेरी लावली. दरम्यान, पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी आजपासून पुढील तीन ते चार दिवस काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज असल्याने ट्विटर (X) च्या माध्यमातून सांगितले आहे. आज राज्यातील काही जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला असून आजचा (IMD 19 Aug 2024) महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज जाणून घेऊयात.
राज्यातील काही जिल्ह्यांत गेल्या काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे जमिन वापसा स्थितीत आली असून शेतातील आंतरमशागतीच्या कामांना वेग आला आहे. परंतु, राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने (IMD 19 Aug 2024) दिला आहे.
IMD 19 Aug 2024 : जळगाव जिल्ह्यासह या जिल्ह्यांना यलो अलर्ट
धुळे, नंदुरबार, जळगाव, नाशिक, अहमदनगर, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, छ. संभाजीनगर, जालना, परभणी, बीड, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला असून वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे.