मुंबई : राज्यात यंदा मान्सूनने लवकर हजेरी लावली होती. राज्यातील काही भागात जोरदार पाऊस झाला असून राज्यातील बहुतांश धरणातील साठा चांगला झाला आहे. राज्यात झालेल्या पावसामुळे बहुतांश भागातील नदी, नाले ओसंडून वाहत आहे. त्यामुळे शेती व सिंचनासाठी पाणी उपलब्ध होत असल्याने काही भागात दिलासा देणारे चित्र आहे. यासंदर्भात जलसंपदा विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 13 ऑगस्ट अखेर राज्यातील प्रमुख धारणांपैकी काही धरणे ही 90 टक्क्यांच्या वर भरलेली आहेत. उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्र किती टक्के पाणीसाठा झाला, हे जाणून घेऊया..
या विभागात इतका टक्के साठा
राज्यातील नाशिक विभागात 13 ऑगस्ट अखेर 67.75% पाणीसाठा,
छ. संभाजीनगर विभागात 38.11% पाणीसाठा,
पुणे विभागात 73.71% पाणीसाठा,
कोकण विभागात 67.05% पाणीसाठा,
नागपूर विभागात 67.30% पाणीसाठा,
अमरावती विभागात 61.63% पाणीसाठा,
राज्यातील महत्त्वाच्या धरण साठ्यांमधील पाण्याच्या अहवालानुसार, नाशकातील गंगापूर धरणात 90.42 % पाणीसाठा आहे. छ. संभाजीनगरातील जायकवाडी धरणात 34.27 % इतका कमी पाणीसाठा आहे. जळगावातील वाघूर धरण 56.58 % भरले. तसेच कोकणातील बहुतांश धरणे 90% भरली असून उपयुक्त पाणीसाठा आहे. ठाण्यातील भातसा धरणात 98.03% पाणी आहे.
नागपूर विभागातील धरणातील साठा
अमरावती विभागातील धरणातील साठा
छ. संभाजीनगर विभागातील धरणातील साठा
नाशिक विभागातील धरणातील साठा
पुणे विभागातील धरणातील साठा
कोकण विभागातील धरणातील साठा