मुंबई : आपण सुरुवातीला चपाती बनवायला शिकतो. तेव्हा कधी पिठात पाणी जास्त होतं तर कधी पीठ नीट मळल जात नाही. आणि जर पीठ चांगलं मळल गेलं तर शेकवताना चपाती फुलत नाही, ती कडक होते. पण आता तुम्हाला पीठ न मळता आणि न लाटता ते पण टम्म फुगणारी चपाती बनवता येणार आहे. चला तर मग जाणून घेऊया कशी बनते ही चपाती…
जे पहिल्यांदा स्वयंपाक करायला शिकत आहेत. आणि ज्यांना पीठ भिजवणं आणि चपात्या लाटणं हे थोडं किचकट वाटत, अशा महिलांसाठी ही ट्रिक नक्की कामात येणार आहे. रेसिपीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. चपाती न मळता, न लाटता आणि टम्म फुगणारी कशी बनवायची याचा व्हिडिओ एका महिलेने शेअर केला आहे. या महिलेने तिच्या सिम्पी मराठी या यूट्यूब चॅनलवर ही रेसिपी शेअर केली आहे.
पीठ न मळता आणि न लाटता बनवा चपाती
सर्वात आधी तुम्हाला एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ घ्यायच आहे. यात थोडं पाणी टाकून ते पातळ करायचं आहे. जसे आपण डोशासाठी पीठ बनवतो त्या पद्धतीने. आता गॅस चालू करून त्यावर तवा ठेवायचा आहे. तो तापल्यावर गव्हाचं पातळ केलेलं पीठ एका खोल अशा चमच्यात घ्यायचे. आणि ते तव्यावर गोलाकार पसरवायचं आहे. पण हे पीठ पसरवताना फार जाड आणि फार पातळ पसरवू नका. एक बाजू शिकल्यानंतर चपाती चमच्याने फिरवून घ्या. आता दोन्ही बाजूने ते नीट शेकवून घ्या. त्यानंतर तुम्हाला ही चपाती हळूहळू फुलताना दिसेल. आणि ही चपाती दोघी बाजूने व्यवस्थित शेकलीही जाते. पीठ न मळता, न लाटता बनवलेली चपाती बघून यावर कुणालाही विश्वास बसणार नाही.
तुम्ही सुद्धा ही रेसिपी ट्राय करून पहा. आणि तुम्ही तयार केलेली चपाती कशी झाली. ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा..