• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

शेळीपालन : उन्हाळ्यात घ्यावयाची काळजी

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 18, 2024
in पशुसंवर्धन
0
शेळीपालन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

शेळीपालन : वाढते तापमान आणि पाण्याचे दुर्भिक्ष अशा दुहेरी संकटात बदलत्या हवामानाचा शेळ्या- मेंढ्यांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतो. सर्वसाधारणपणे शेळ्या-मेंढ्यांचा पैदासकाळ हा पावसाळ्याच्या सुरवातीला येतो; मात्र पैदाशीसाठी सक्षम शरीर यंत्रणा तयार होण्यासाठी उन्हाळी हंगामातच त्यांची काळजी घेणे गरजेचे आहे.

शेळीपालन : उन्हाळ्यातील रोग व काळजी

या वर्षी निसर्गाचा, वातावरणाचा लहरीपणा आणि हवामान स्थिती फारच गंभीर असून, सतत दोन वर्षे कमी-अधिक, अवकाळी पाऊस झाल्याने त्याची झळ शेळ्या- मेंढ्यांनाही बसत आहे. कधी नव्हे ते शेळ्या-मेंढ्यांसाठीही छावण्यांची मागणी अलीकडे सातत्याने होत आहे. दुष्काळ आणि त्याचबरोबर वाढते तापमान यामुळे उद्भवणाऱ्या आरोग्य समस्यांचा व त्यावर करावयाच्या उपचाराचा आढावा सदर लेखात घेत आहोत. या परिस्थितीत उद्भवणाऱ्या आरोग्याच्या प्रमुख समस्या खालीलप्रमाणे आहेत.

 

उष्माघात

शेळ्या जर जास्त काळापर्यंत तीव्र उन्हात राहिल्या किंवा बाहेर सोडल्या, तर ही समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते. त्यांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते, त्या मलूल दिसतात. चारा-पाणी घेण्याचे थांबते अथवा शरीराचे तापमान सामान्य तापमानाच्याही वर साधारणतः 105-106 फॅ. पर्यंत पोचते. कधीकधी शेळ्या मूर्च्छित होऊन पडतात. उपचाराला प्रतिसाद देण्याच्या आधी दगावतात.

उन्हाळी हगवण

एकंदरीत अशा हगवणीसाठी अनेक घटक कारणीभूत असतात. जसे उष्माघात, गरम व दूषित पाणी, साचलेल्या दूषित पाण्याद्वारे जंतबाधा, जिवाणूबाधा किंवा अपचन अशा अनेक घटकांचा समावेश करता येईल. हगवणीची बाधा झाल्यास जनावरांच्या शरीरातील पाण्याचे प्रमाण व इलेक्ट्रोलाइटचे प्रमाण फार कमी होते, त्यामुळे शेळ्या अगदी अशक्त होतात व जमिनीवर पडून राहतात. जंतबाधेची हगवण असल्यास शेणाला विशिष्ट वास येतो.

जंतबाधेमुळे दुष्परिणाम खरे तर उन्हाळ्यामध्ये जंतांची वाढीची

अवस्था म्हणजे अंडी, अंड्यांपासून विषारी अवस्था व वयस्क अवस्था ही थांबलेली असते; परंतु शरीराच्या आत असलेले जंत जसे यकृत, आतडी व पोटाचे कप्पे यांतील जंत क्रियाशील असतात. सामान्यतः यकृतातील जंत जास्त क्रियाशील असतात. अशा जंतांची शरीरातील संख्या वाढली, की शेळ्यांमध्ये रक्ताल्पता वाढते व शेळ्यांची रोग प्रतिकारकशक्ती कमी होते. शेळ्यांची हाडे व बरगड्या दिसायला लागतात. केस राठ झालेले व चकाकी नसलेले, तसेच कातडी निस्तेज झालेली दिसते. डोळ्यांची श्लेष्मा निस्तेज, फिकट दिसते आणि यकृतावर व पचनक्रियेवर परिणाम झालेले दिसतात. काही प्रसंगी शेवटी शेळ्यांना हगवणीचा तीव्र त्रास होऊन शेळ्या अगदी अशक्त होतात व उपचाराला प्रतिसाद न देता दगावतात.

उपचार व प्रतिबंध

उष्माघाताचा त्रास होऊ नये, म्हणून शेळ्यांना दिवसातील थंड काळ जसे सकाळी लवकर (सहा ते दहा वाजेपर्यंत) आणि संध्याकाळी उशिरा (तीन ते सात वाजेपर्यंत) या काळातच चरावयास सोडावे. स्वच्छ, ताजे व थंड पाणी शेळ्यांना उपलब्ध होईल याची काळजी घ्यावी. हगवणीला कारणीभूत घटकांचा योग्य तो उपचार अथवा प्रतिबंध करावा. जसे की हगवण थांबविणाऱ्या औषधांचा उपयोग, प्रतिजैविक गोळ्या (पेसुलिन, फॅजाल, पॅबाडीन इ.) सोबत इलेक्ट्रोलाइटची पावडर हे सर्व एकत्र करून स्वच्छ पाण्यातून दोन ते तीन वेळा पाजावे. तीव्र हगवणीच्या प्रकारात शिरेतून इलेक्ट्रो लाइट व ऊर्जेचे द्रावण द्यावे. जास्त पिष्टमय खाल्ल्याने आम्लीय अपचन होऊन तीव्र हगवण लागते. शेळ्या दूषित, टाकलेले, उरलेले अन्न खाणार नाहीत, याची काळजी घेणे गरजेचे आहे. अचानक अशी समस्या आली तर पाण्यातून खाण्याचा सोडा पाजावा अथवा तीव्रता जास्त असल्यास शिरेद्वारे सोडाबायाकार्बचे द्रावण द्यावे, सोबत जीवनसत्त्वे व कोणतेही एक प्रतिजैविक द्यावे.

 

पीएम किसानचा 17 वा हप्ता कधी येणार ? या व्हिडिओमध्ये पहा संपूर्ण माहिती

आम्लीय अपचन

उन्हाळ्यात जनावरांची पचनशक्ती मंदावलेली असते. बाह्य तापमानाचे नियंत्रण करण्यासाठी शेळ्या पाणी जास्त पितात. शेळ्यांच्या खाद्यामध्ये जर कोरडा चारा जास्त प्रमाणात असला, तर पचनशक्तीवर परिणाम होतो. उन्हाच्या तीव्रतेने शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊन रक्तामध्ये आम्ल वाढते व आम्लीय अपचन होते. कधीकधी समारंभातील उरलेले तेलकट, पिष्टमय, दूषित अन्न खाल्ल्यामुळे सुद्धा असे अपचन होते.

जंतबाधा : शेळ्यांमधील प्रमुख समस्या

जंतबाधा ही शेळ्यांमधील प्रमुख समस्या आहे. उन्हाळ्यात जंतांची अंडी सुप्तावस्थेत असतात, अशा काळात गोठ्यातील जंतयुक्ती माती काढून घ्यावी व त्याठिकाणी जंतरहित माती टाकावी. या मातीमध्ये चुना व कॉस्टिक सोडा मिसळल्यास जमीन निर्जंतुक होण्यास मदत होईल, याशिवाय शरीरातील क्रियाशील जंत मारणे अति आवश्यनक असते, त्यासाठी सर्व प्रकारच्या जंतांवर प्रभावी असलेले जंतुनाशक जसे फेनबेन्डॅझाल, डिस्टोडीन, बॅनमिन्थसारखी जंतुनाशक औषधे वापरून जंतनिर्मूलन करून घ्यावे. जेणेकरून उत्पादनक्षम काळात शेळ्यांचे आरोग्य चांगले राहील व गर्भाची योग्य वाढ होईल. शरीरावर वाढणारे परोपजीवीसुद्धा या काळात सुप्तावस्थेत असतात. मात्र, त्याआधी योग्य ते औषध फवारणी करून शरीरावरील परोपजीवींचा बंदोबस्त करावा. अशाप्रकारे उन्हाळ्यात घेतलेली आरोग्याची काळजी पुढील काळात विशेषतः पावसाळ्यातील संक्रमण काळात प्रतिबंधक म्हणून आणि उद्भवणाऱ्या समस्येवर उपाय ठरते.

(सौजन्य : ॲग्रोवर्ल्ड प्रकाशन)

 

Planto Krushitantra

 

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • गारपिटीमुळं राज्यात 82 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान
  • ॲग्रोवर्ल्ड – देवगड हापूस 20 एप्रिलची गाडी हाउसफुल्ल… आता 26 एप्रिल (शुक्रवार) च्या गाडीचे बुकिंग सुरू…

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: उपचार व प्रतिबंधउष्माघातदूषित पाणीशेळीपालन
Previous Post

गारपिटीमुळं राज्यात 82 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान

Next Post

इफको लाँच करणार जास्त नायट्रोजनवाला नॅनो युरिया प्लस

Next Post
इफको

इफको लाँच करणार जास्त नायट्रोजनवाला नॅनो युरिया प्लस

ताज्या बातम्या

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

गाजर शेतीतून करोडोंचा टर्नओव्हर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 24, 2026
0

आंतरराज्य शेतमाल व्यापार

आंतरराज्य शेतमाल व्यापार : रस्ते वाहतूक अनुदान योजना

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 23, 2026
0

कापसाचे 'पांढरे सोने'

कापसाचे ‘पांढरे सोने’: शेतकऱ्यांचा खिसा रिकामा का राहतो?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 22, 2026
0

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish