• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
Advertisement
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

हरितगृहातील जरबेरा फुल पिकाची लागवड व खत व्यवस्थापन

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 1, 2023
in तांत्रिक
0
जरबेरा फुल
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

प्रा. मयुरी देशमुख
मृद विज्ञान व कृषी रसायनशास्त्र विभाग, डॉ .उल्हास पाटील कृषी महाविद्यालय, जळगाव

जरबेरा हे हरितगृहातील एक महत्त्वाचे व्यावसायिक पिक आहे, जरबेराचे फुल हे फारच आकर्षण असते जरबेराच्या ़फुलाचा आकर्षकपणा व तसेच या फुलाचा ताजेपणा आणि टिकाऊपना या गुणधर्ममुळे हे शोभिवंत फुले लग्नकार्ये, इतर समारंभात आणि फुलांचे गुच्छ बनवण्यासाठी याचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. जरबेरा फुलाचे मार्केटमधील व्यावसायिक मूल्य जास्त आहे. बाजाराच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील जरबेरा फुलशेतीची लागवड दिवसेंदिवस वाढत आहे. जरबेरा लागवड करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणूकीची गरज आसते. यामध्ये जराबेरा लागवाडीसाठी प्रमूख हरितगृह (Polyhouse) तयार करणेसाठीचा खर्च जास्त येतो. या फुलांमध्ये पिवळा, नारंगी, पांढरा, गुलाबी, लाल आणि इतर अनेक रंगाच्या जाती उपलब्ध आहेत. जरबेरा फुलाचे दांडे लांबसडक आणि हिरव्या रंगाचे असतात. जरबेराची बाजारपेठत चांगली मागणी यामुळे जरबेरा फुलशेती ही शेतकर्‍यांसाठी चांगल्या उत्पन्नाचे साधन बनली आहे.

हरितगृहामध्ये जरबेराची लागवड मातीमध्ये किंवा मातीविना (कोकोपीट) केली जाते. या दोन्ही पद्धतीचे काही फायदे व काही तोटे पण आहेत. मातीविना पद्धतीत जरबेरा लागवड खर्च 20-30% अधिक आहे. मातीविना पद्धतीत उत्पादन जास्त येते. मातीविना पद्धतीत पिकाची काटेकोर देखरेख करणे आवश्यक असते. 2 एकर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी मातीविना पद्धत व्यावसायिक दृष्टीने योग्य आहे.

Shriram Plastic

जरबेरा लागवडीसाठी आवश्यक माती

जरबेराची लागवड करण्याआधी माती परीक्षण करणे गरजेचे आहे लागवडीसाठी मातीमध्ये खालील घटक आवश्यक आहेत. मातीचा सामु 5.5 ते 6.5 दरम्यान असावा. क्षारता स्तर 1 एमएस / सें.मी. पेक्षा जास्त नसावी. माती फार सच्छिद्र आणि तसेच पाण्याचा निचरा होणारी असावी त्यामुळे रोपांची मुळाची चांगली वाढ होते.

माती निर्जंतुकीकरण

जरबेरा लागवड करण्यापूर्वी मातीची निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. यामुळे मातीमधिल रोग, जीवाणू, कीड, बुरशी, कीडची अंडी यांचा नायनाट करता येतो. माती निर्जंतुकीकरण करण्याच्या तीन मुख्य पद्धती उपलब्ध आहेत.
1). स्टीम पद्धत : ही पद्धत भारतीय परिस्थितीसाठी व्यावहारिक नाही.
2). सूर्य किरण पद्धत : या पद्धतीत प्लास्टिकची शीट जमिनीवर 6-8 आठवडे झाकली जाते. सुर्य किरणमुळे माती गरम होते आणि बुरशीचे नष्ट होते.
3). केमिकल पद्धत : ही सर्वात प्रगत आणि उपयुक्त पद्धत आहे. या पद्धतीत Hydogen peroxide (H2O2) with silver हे द्रावण जमिनीचा निर्जंतुकीकरण करण्यासाठी वापरला जातो.

केमिकल पद्धत प्रक्रिया :

1). लागवडीपूर्वी पाण्याने बेड ओले करावेत.
2). त्यानंतर Hydogen peroxide (H2O2) with silver 35 मिली प्रति लीटर पाण्यात मिसळा.
3). हे द्रावण माती बेडवर समान रीतीने एक मीटर क्षेत्रासाठी एक लिटर वापरा. त्यानंतर 4 ते 6 तासांत पीक लागवड करु शकतो.

Hydogen peroxide (H2O2) with silver फायदे :-

1). आर्थिकदृष्ट्या सुलभ.
2). वापरायला खूप सोपे आणि सुरक्षित.
3). निर्जंतुकीकरण केल्यानंतर पिकाची लागवड 4 ते 6 तासानी करू शकतो.
4). पर्यावरणाला अनुकूल आणि रोपावर कोणत्याही नुकसानकारक प्रभाव करत नाहीत.
5). जवळजवळ सर्व बुरशी, जीवाणू आणि मातीमधील उपस्थितीत कीटकांच्या अंडी नष्ट करते.

Ellora Natural Seeds

जरबेरा लागवडीसाठी बेड तयार करण्याची पद्धत

जरबेरा वनस्पतीला पाण्याचा चांगला निचरा होणार्‍या जमिनीची आवश्यकता असते, त्यामुळे जरबेराची लागवड उंच बेडवर करतात; बेडचे आकारमान बेडची उंची: 1. 5 फूट (45 सें.मी.), बेडची रूंदी: 2 फूट (60 सें.मी.), दोन बेड मधिल अंतर: 1 फूट (30 सें.मी.) याप्रमाणे असावे. जर शेतात काळी माती असेल तर प्रथम मुरुमाचा 6 थर द्यावा, त्यानंतर बाहेरून लागवडी योग्य लाल माती आणावी व त्यानंतर चागले कुजलेले शेणखत सोबत मिसळावे. शेणखत मातीची पोषण क्षमता वाढविते आणि पिकाला हळूहळू पोषण देते. नेमेटोड रोग प्रतिबंधासाठी नीम केकचा वापर करावा. हे सर्व साहित्य मातीमध्ये चांगले मिसळून घेणे आवश्यक आहे. जरबेरासाठी मातीचे बेड तयार झाल्यावर त्या बेडवर खताचा बेसल डोस द्यावा. हा डोस रोपे लावण्याआधी बेड वरील 6 मातीमध्ये चांगला मिसळावा.

जरबेरा रोपांची निवड व लागवड

जरबेरा रोपाच्या विविध जाती उपलब्ध आहेत. जरबेराची योग्य जात निवडणे हे फार महत्त्वाचे आहे. यावरच जरबेराचे उत्पादन अवलंबून असते. तसेच मार्केटिंग दृष्टीकोनातून रंग संयोजन असणे आवश्यक आहे. ह्या रंगसंगीत लाल, पिवळा, गुलाबी, केशरी, पांढरा या रंगांचा समावेश असावा.
सुधारित वाण : शारदा, आनेगीरी, नारी-6, परभणी कुसुम, परभणी-80, एसएस.56 , मॉडर्न ई.
रोपे लागवड : जरबेराची रोपे लावताना, रोपाचा लीेुप मातीच्या 1 ते 2 सें.मी. पेक्षा मातीच्यावर राहील असा लावावा. एका बेडवर दोन ओळीत रोपांची लागवड केली जाते, दोन ओळीमधील अंतर 37.5 सें.मी. आणि दोन रोपमधील अंतर 30 सें.मी. ठेवावे.
ओळी ते ओळी = 37.5 सेमी = 1.25 फूट
रोप ते रोप = 30 सेमी = 1 फूट

खते व्यवस्थापन

रोपे लागवडीनंतर तीन आठवड्यांनी खते देणे सुरू करावे. पहिले तीन महिने जरबेरा पिकाला स्टार्टर ग्रेड खते दिली जातात. प्रत्येक दिवसाआड खताचा डोस दिला जातो. 45-50 दिवसानंतर जरबेराच्या रोपाला कळी लागणे सुरु होते. सुरवातीच्या काळात रोपांची वाढ होण्याकरिता करिता कळ्या खुडून (वळीर्लीववळपस) टाकाव्यात. जरबेराच्या रोपाला 16 ते 18 पूर्णपणे विकसित पाने येतील तेव्हापासून आपण जरबेरा फुलांचे उत्पादन घेऊ शकतो.जेव्हा आपण जरबेरा फुलाचे उत्पादन घेणे सुरु करतो त्याकाळात उत्पादक काळ (productive phase) खते द्यावीत. ती N:P:K – 2:1:4 (e.g., N:P:K – 15:8:35) प्रती रोप 0. 4 ग्रॅम या प्रमाणात द्यावी. हि खते दिवसाआड द्यावीत. त्याचबरोबर सूक्ष्म अन्नद्रव्ये पिकच्या गरजेनुसार द्यावीत. प्रत्येक 2 ते 3 महिन्यानंतर मातीची तपासणी करावी व त्यानुसार पिकासाठी लागणारे खताचे नियोजन करावे.

जरबेरा फुले काढणी

पेरणीनंतर 12-14 आठवड्यांनी (85-90 दिवस) पहिली फुले काढणीस सुरुवात करतात. जेव्हा जरबेरा फुलाची 2-3 पटल पूर्णपणे विकसित होतात तेव्हा ते फुल काढण्यायोग्य आहे हे समजले जाते. हरितगृहामध्ये जरबेराची लागवड मातीमध्ये किंवा मातीविना (कोकोपीट) केली जाते. या दोन्ही पद्धतीचे काही फायदे व काही तोटे पण आहेत. मातीविना पद्धतीत जरबेरा लागवड खर्च 20-30% अधिक आहे. मातीविना पद्धतीत उत्पादन जास्त येते. मातीविना पद्धतीत पिकाची काटेकोर देखरेख करणे आवश्यक असते. 2 एकर पेक्षा जास्त क्षेत्रासाठी मातीविना पद्धत व्यावसायिक दृष्टीने योग्य आहे.
चांगल्या जरबेरा फुलांच्या देठची लांबी 45-55 सें.मी., आणि फुलाचा व्यास 10-12 सें.मी. असते.

सकाळी किंवा संध्याकाळी वेळी जरबेरा फुलांची काढणी केली जाते. जरबेरा फुलांची काढणीसाठी कुशल कामगारांची आवश्यकता असते. काढलेली फुले स्वच्छ पाणी असलेल्या बादलीमध्ये ठेवावीत. त्यानंतर छिद्र असलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये ती पॅक करावीत. 10 फुलाचा एक गठ्ठा याप्रमाणे गठ्ठे बनवावेत व ते गठ्ठे कोरोगेट बॉक्समध्ये 300-500 फुले (30-50 गठ्ठे) भरावीत व विक्रीसाठी बाजारपेठेत पाठवावीत. जरबेराचे एक रोप दर वर्षी सुमारे 45 फुले देते.

Legend Irrigation

दैनिक कामे

जरबेराचे पिक हे बहुवार्षिक पिक आहे. या पिकापासून जास्तीत जास्त नफा मिळविण्यासाठी जरबेरा पिकाची योग्य ती काळजी घेणे जरुरेचे आहे. हरितगृहामध्ये कीटक आणि रोग नियंत्रणासाठी प्रत्येक 2-3दिवसांनी कीटक आणि रोग नियंत्रणासाठी विविध कीटकनाशके आणि बुरशीनाशक व टॉनीकचा वापर करावा. तसेच दररोज पिकाची काळजीपूर्वक पाहणी करावी याद्वारे येणार्‍या रोगावर लवकर नियंत्रण करता येते.

खुरपणी आणि माती सैलसर करणे :-बेडवर येणारे तण हे जरबेरा पिकासोबत स्पर्धा करते, याचा परिणाम उत्पादनावर होतो, म्हणून लवकरात लवकर येणारे तण काढून टाकणे आवश्यक आहे. दैनंदिन सिंचनमुळे, बेडचा पृष्ठभाग कठिण होते त्यामुळे रोपाच्या मुळांना खत व हवा मिळणे अवघड जाते म्हणून बेड वरील माती खरवडून सैल करणे आवश्यक असते. माती खुरपणी एका महिन्यातून एकदा किवा दोनदा करावी.

जुन्या पानांची काढणी :- जरबेराची जुनी, वाळलेली पाने काढून टाकावीत त्यामुळे हवा खेळती राहन्यास मदत होते तसेच कीटक आणि रोग नियंत्रण करणे सोपे जाते व जरबेराच्या रोपाला लवकर नविन पाने येतात.

जरबेरा फुलांचे मार्केटिंग

जरबेरा फुलांची मागणी लग्नाच्या हंगामात जास्त असते, मुख्यतः जानेवारी, फेब्रुवारी, मे, ऑगस्ट, नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये जरबेराला फारच मागणी असते त्यानुसार जरबेरा उत्पादन शेतकर्याने नियोजन करावे. फुलांचा प्रमुख बाजार आहे हैदराबाद, मुंबई, दिल्ली, कोलकता, अहमदाबाद, पुणे, बंगलोर या मोठ्या शहरात चालतो.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • Harit Urja : 2025-26 पर्यंत 20% इथेनॉल मिश्रणाचे देशाचे उद्दिष्ट
  • पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Share this:

  • Facebook
  • X
Tags: खत व्यवस्थापनजरबेरा फुल लागवडप्रा. मयुरी देशमुखहरितगृह
Previous Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

Next Post
आजचे बाजारभाव

पुणे, नाशिक, जळगाव आजचे बाजारभाव

ताज्या बातम्या

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

काय..? तुर्कस्तानच्या बाजरीतून एकरी 26 क्विंटल उत्पादन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 24, 2025
0

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

या भागात मुसळधार पावसाचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 23, 2025
0

व्हिएतनाम

व्हिएतनामींचा योगगुरू बनलाय साताऱ्यातील शेतकरीपुत्र?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 21, 2025
0

AI

500 कोटींच्या AI शेती धोरणाचा फायदा !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 19, 2025
0

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

गावागावात हवामान केंद्रांची उभारणी करणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

महाॲग्री- एआय

महाॲग्री- एआय धोरण मंजूर ; 500 कोटींची तरतूद

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 18, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

फार्मिंग GT रोबोट : AI-आधारित, ऑटोमेटेड तण काढणारे मशीन

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 2, 2025
0

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

कॉर्पोरेट जग सोडून मधमाश्यांमध्ये हरवलेला इंजिनीअर !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 27, 2025
0

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

अशी मिळवा ट्रॅक्टर सबसिडी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
June 25, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.