भारतीय संस्कृतीत सिंदूरला (कुंकू) खूप महत्त्व आहे. सौभाग्याचे प्रतीक म्हणून आणि पूजेसाठी त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. बऱ्याच महिला रासायनिक सिंदूरऐवजी नैसर्गिक सिंदूर वापरतात. अनेकांना हे माहीत नसेल, की नैसर्गिक सिंदूर वनस्पती झाडापासून मिळतो. हीच नैसर्गिक सिंदूर शेती करून उत्तर प्रदेशातील शेतकरी चांगला नफा कमावत आहेत. आपण त्याचा तपशील जाणून घेऊया.
भारतीय लोकजीवनात सिंदूर हे सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. सध्या बाजारात केमिकलयुक्त सिंदूरही उपलब्ध आहे. मात्र, त्याचा वापर केल्याने त्वचेशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. ज्यामध्ये त्वचारोग, डोकेदुखी असे अनेक गंभीर आजार होऊ शकतात. त्यामुळे अनेक महिला सध्या रासायनिकऐवजी नैसर्गिक सिंदूर वापरतात.
कुमकुम ट्रीपासून तयार केला जातो नैसर्गिक सिंदूर
विशेषत: विवाहित महिलांसाठी, सिंदूर खूप महत्त्वाचा आहे. जरी सिंदूर प्रत्येक दुकानात उपलब्ध असला तरी बहुतांश सिंदूर हा रासायनिक प्रक्रियेने हळद आणि पारा मिक्स करून बनवला जातो. नैसर्गिक सिंदूर हा वनस्पतीपासून तयार केला जातो. या झाडाला इंग्रजीत कुमकुम ट्री किंवा कामिला ट्री म्हणतात. इतर वनस्पतींप्रमाणेच सिंदूर हे देखील एक झाड आहे. या वनस्पतीच्या फळांपासून पावडर आणि द्रव स्वरूपात सिंदूरसारखा लाल रंग (कुंकू) तयार करतात. बरेच लोक याला लिक्विड लिपस्टिक ट्री असेही म्हणतात, कारण त्यातून निघणारा रंग तुमच्या ओठांना नैसर्गिकरित्या रंग देऊ शकतो.
उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यात होतेय उत्पादन
सिंदूर शेती करणारे उत्तर प्रदेशातील फतेहपूर जिल्ह्यातील अशोक तपस्वी आता दरवर्षी चांगला नफा कमावत आहेत. या रोपाची माहिती तपस्वी यांना सुमारे 12 वर्षांपूर्वी मिळाली. महाराष्ट्रात गेलेले असताना त्यांना सिंदूरचे झाड लावलेले दिसले होते. सोलापूर जिल्ह्यातील केम या कुंकू, सिंदूर, अष्टगंध उत्पादनाची 100 वर्षांची परंपरा असलेल्या गावातून त्यांनी एक रोप उत्तर प्रदेशात आपल्या गावी नेले. या एका रोपापासून त्यांनी पाच ते सहा रोपे तयार केली. जेव्हा झाडांमध्ये फुले उमलली, तेव्हा त्यापासून त्यांनी सिंदूर बनवला. त्यानंतर त्यांनी सिंदूर वनस्पतीची शेती करण्यास सुरुवात केली.
नैसर्गिक सिंदूराला बाजारात जास्त मागणी
बाजारात मिळणाऱ्या भेसळयुक्त रसायनांच्या सिंदूरऐवजी नैसर्गिक सिंदूराला अधिक मागणी आहे. त्यामुळे शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना चांगला नफाही मिळत आहे. यातून अनेक प्रकारची उत्पादनेही तयार केली जातात. नैसर्गिक सिंदूर वापरल्याने महिलांचे मनही शांत राहते, असेही समोर आले आहे.
औषधी वनस्पतींची लागवड करूनही चांगले उत्पन्न
अशोक तपस्वी सांगतात की, पूर्वी महाराष्ट्राबाहेर फारशी सिंदूर लागवड होत नव्हती. मात्र आता उत्तर प्रदेशातील इतर शेतकरीही त्यांच्यापासून प्रेरित झाले आहेत. आजकाल शेतकरी केवळ धान्याचे उत्पादनच नव्हे तर औषधी वनस्पतींची लागवड करून चांगले उत्पन्न मिळवू शकतात. तुळशी, कोरफड, गुग्गुळ अशा अनेक प्रकारच्या वनस्पतींची मागणी झपाट्याने वाढत आहे. अगदी कमी जागेतही त्यांची लागवड सुरू करता येते. जर मोठ्या प्रमाणावर नसेल तर स्वतःच्या वापरासाठी ही रोपे घरी लावता येतात.
एका रोपापासून 400 रुपयांची कमाई
सिंदूर वनस्पती दक्षिण अमेरिका आणि काही आशियाई देशांमध्ये उगवले जाते, तर भारतात या वनस्पतीचे पीक फक्त महाराष्ट्र आणि हिमाचल प्रदेशातील काही निवडक भागात घेतले जाते. सिंदूर वनस्पती सहजासहजी दिसत नाही, एका रोपातून एक किंवा दीड किलोपर्यंत सिंदूर फळ मिळू शकते आणि त्याची किंमत प्रति किलो ₹ 400 पेक्षा जास्त आहे. सिंदूरचे झाड म्हणजेच कॅमेलिया ट्री 20 ते 25 फूट उंच असते, म्हणजेच त्याचे झाडही पेरूच्या झाडाप्रमाणे पसरते.
कॅमेलिया ट्रीपासून सिंदूर कसा तयार होतो?
कॅमेलिया ट्री या झाडाच्या फळातून बाहेर पडणाऱ्या बिया सिंदूर तयार करण्यासाठी वापरल्या जातात, कारण ते पूर्णपणे नैसर्गिक आहे. त्यामुळे कोणतीही हानी होत नाही. कॅमेलियाच्या झाडावरील फळे गुच्छात वाढतात, ज्याचा रंग सुरुवातीला हिरवा असतो, पण नंतर हे फळ लाल होते. या फळाच्या आतच सिंदूर असतो. ते सिंदूर लहान दाण्यांच्या, बियांच्या आकारात आहे, जे इतर कोणत्याही गोष्टीमध्ये न मिसळता थेट वापरता येते. ते शुद्ध आणि आरोग्यासाठी देखील खूप उपयुक्त आहे. त्याचे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.
सौंदर्य प्रसाधने, औषाधातही होतो वापर
कॅमेलिया ट्री सिंदूर केवळ कपाळावर लावण्यासाठी वापरला जात नाही तर त्याचा वापर खाद्यपदार्थांना लाल रंग देण्यासाठीही केला जातो. कॅमेलियाच्या झाडापासून काढलेला सांडूर उच्च दर्जाची लिपस्टिक बनवण्यासाठी वापरला जातो. त्यातून औषधेही बनवली जातात. लिपस्टिक, हेअर डाय, नेल पॉलिश अशा अनेक गोष्टींमध्ये याचा वापर होतो. व्यावसायिक वापरामध्ये लाल शाई बनवणे, रंगासाठी वापरणे, साबणासाठी वापरणे यांचा समावेश होतो. जिथे नैसर्गिक लाल रंग वापरायचा असतो, तिथे ही वनस्पती वापरली जाते.
सिंदूर रोप कसे लावायचे?
सिंदूर रोप लावण्याचे दोन मार्ग आहेत. त्याची लागवड बियांच्या मदतीने करता येते आणि दुसरे म्हणजे त्याची तयार केलेली रोपे कलमांच्या मदतीने लावता येतात. सिंदूर रोप घरामध्ये सहज वाढू शकत नाही, कारण त्याला वेगळ्या प्रकारचे हवामान आवश्यक आहे. हे झाड जंगलात अधिक चांगले वाढते. जर तुम्ही रोपाला जास्त पाणी किंवा खत दिले तर ते मरते आणि कमी दिले तर त्याला फळ येत नाही.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇
- कापसाला या बाजार समित्यांमध्ये मिळतोय असा भाव
- AI तंत्रज्ञानामुळे टोमॅटोच्या शेतीत वाढले उत्पन्न; शेतकऱ्याने केला यशस्वी प्रयोग