पूर्वजा कुमावत
दशपर्णी अर्क म्हणजे दहा वनस्पतींचा वापर करून बनवलेला अर्क. हा अर्क नैसर्गिक कीटकनाशक असून शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. व याचा उपयोग सेंद्रिय शेतीमध्ये केला जातो. या अर्थात वेगवेगळ्या उग्र वासाच्या वनस्पतींचा पाला वापरला जातो. केमिकल युक्त कीटकनाशक न वापरता जर घरच्या घरी दशपर्णी अर्क बनवले, तर शेतकऱ्याला खर्चही कमी होऊ शकतो.
दशपर्णी अर्कासाठी लागणाऱ्या वनस्पतींचा पाला
गुळवेल, कडुनिंब, पपई, टनटनी, एरंड, निर्गुडीची, रुई, सिताफळ, घाणेरी, धोतरा, लाल कन्हेर, करंज यापैकी कोणत्याही दहा वनस्पतींच्या पाल्यांचा उपयोग करावा. हा पाला सम-मापात घ्यावा. 200 लिटर प्लास्टिकची टाकी, देशी गाईचे शेण 3 किलो, देशी गाईचे गोमूत्र 5 लिटर, हिरवी मिरची 2 किलो, लसुन पाव किलो, वरीलपैकी कोणत्याही दहा वनस्पतींचा पाला घ्यावा. शक्यतो देशी गाईचे शेण हे ताजेच घ्यावे व गोमूत्र जितके जुने तेवढाच त्याच्यात औषधी गुणधर्म जास्त असते. दशपर्णी अर्क करताना तो सावलीत करावा व हे सर्व साहित्य एकजीव करून झाल्यानंतर वस्त्रगाळ करण्यासाठी सुती कपड्याचा वापर करावा.
अर्क तयार करण्याची पद्धत
दशपर्णी अर्कासाठी दहा वनस्पती या आवश्यक आहे. वरील वनस्पतींपैकी एकूण दहा वनस्पतींचा पाला बारीक करून घेणे तसेच तिखट हिरवी मिरचीचा ठेचा, लसूण ठेचा व देशी गाईचे शेण व गोमूत्र हे सर्व मिश्रण 200 लिटर क्षमता असलेल्या टाकीत सावलीत ठेवावे. हे मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यावर गोणपाटाने झाकून ठेवावे आणि दिवसातून दोन वेळा या मिश्रणाला काठीने ढवळून घ्यावे व परत त्यावर गोणपाटाने झाकून ठेवावे. हे मिश्रण महिन्याभर ठेवल्यानंतर त्याचा उग्र वास येणे सुरुवात होते. त्यानंतर हे मिश्रण सुती कापडाने गाळून घ्यावे.

अर्काचा वापर
हे अर्क तयार केल्यापासून तीन महिन्यापर्यंत वापरता येते. पण हे अर्क बंद झाकणाच्या कॅनमध्ये व्यवस्थितरित्या ठेवल्या गेले पाहिजे. या अर्काचा वापर कीटक नियंत्रणासाठी 16 लिटर पाण्याच्या 200 मिली फवारणीसाठी वापर करावा. या अर्काची फवारणी सकाळी किंवा सायंकाळी करावी. या अर्कापासून पासून नियंत्रित होणारे मावा, तुडतुडे फुलकिडे, आया यांच्यावर प्रभाव करते. या दशपर्णी अर्काची फवारणी शक्यतो दर 8 दिवसाला करावी.
अर्काचे फायदे
नैसर्गिक पद्धतीने किड नियंत्रण होते. उग्र वासामुळे किडी पिकांमध्ये अंडी देत नाहीत. पर्यावरणपूरक कीड नियंत्रण झाल्यामुळे सकस व विषमुक्त भाजीपाला उत्पादित होतो व शेतीमाल हा सेंद्रिय असल्यामुळे त्याला उच्च दर्जाचा दर मिळतो. हा अर्क वनस्पतीच्या प्रतिकारशक्ती अधिक मजबूत बनवते.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल. 👇