मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहे. अशी तिव्र ऊन तर कधी अवकाळी पाऊस अशा विरोधी परिस्थितीचा सामना सर्वसमान्यांसह शेतकर्यांना करावा लागत आहे. पून्हा एकदा राज्यात अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली असून काही जिल्ह्यांना येलो तर काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मानवाने केलेल्या निसर्गाच्या हानीमुळे वातावरणात दिवसेंदिवस झपाट्याने बदल होत आहे. त्यामुळे ऋतुचक्र देखील विस्कळीत होतांना दिसून येत आहे. मागील एक महिन्यापासून उन्हाळा असूनही शेतकर्यांना वादळ, अवकाळी पाऊस, गारपीटीचा सामना करावा लागत आहे. यामुळे शेतीकामांमध्ये देखील व्यत्यय येत आहे. त्यातच हवामान विभागाकडून राज्यात दि.12 ते 16 एप्रिल दरम्यान अवकाळी पाऊस व गारपीट होण्याची शक्यता वर्तविली आहे.आहे.
या जिल्ह्यांना यलो अलर्ट
12 एप्रिल रोजी राज्यातील जळगाव, धुळे, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सोलापूर, 13 एप्रिल रोजी पालघर, ठाणे, रायगड, जळगाव, छ.संभाजीनगर, बुलडाणा, अकोला, अमरावती, जालना, बीड, उस्मानाबाद, लातुर, सोलापूर, सांगली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, 14 एप्रिल रोजी रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातुर, नांदेड, परभणी, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, गोदिया, भंडारा, नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, वाशिम, बुलडाणा, जळगाव, धुळे, नाशिक, नंदुरबार, 15 एप्रिल रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड तर 16 एप्रिल रोजी अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, उस्मानाबाद, लातुर, नांदेड आदी जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. या जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
या जिल्ह्यात गारपीटीची शक्यता?
हवामान विभागाकडून काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 12 रोजी नाशिक, अहमदनगर, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, 13 एप्रिल रोजी नंदूरबार, धुळे, नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, कोल्हापूर तर 14 रोजी पुणे, अहमदनगर, सातारा, बीड, छ. संभाजीनगर आणि जालना आदी जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकर्यांनी आपली कामे आटोपून घ्यावीत असे आवाहन देखील करण्यात आले आहे.