धुळे : खरीप पणन हंगाम २०२२-२३ मध्ये केंद्र शासनाने किमान आधारभुत किंमत खरेदी योजनेतंर्गत निश्चित केलेल्या हमीभावाने राज्यात भरडधान्य (मका, ज्वारी व बाजरी) खरेदीकरीता ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी प्रकियेसाठी २१ ऑक्टोबर, २०२२ पर्यंत मुदत देण्यात आलेली होती. तथापि, शेतकरी नोंदणीचा ओघ लक्षात घेता नोंदणी प्रकिया करण्यासाठी १० नोव्हेंबर, २०२२ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. असे एस. बी. सोनवणे, जिल्हा पणन अधिकारी, धुळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
ज्या शेतक-यांना शेतमालाची विक्री करावयाची आहे, त्या शेतक-यांनी स्वत: नोंदणीसाठी LIVE PHOTO अपलोड करण्यासाठी नोंदणीच्या ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक आहे. त्यानुसार जास्तीत जास्त शेतक-यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व मुदतीत नोंदणी करावी. असेही श्री. सोनवणे यांनी प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.


तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇