मुंबई : शेतकऱ्यांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हवामान विभागाने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. राज्यातील पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला आहे. पुढच्या 48 तासांमध्ये पाऊस फक्त राज्यच नाही तर देशभरातून परत जाणार आहे.
राज्यात गेल्या काही दिवसांपासून परतीच्या पावसाने प्रचंड कहर माजवला आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये परतीच्या पावसाने अक्षरश: थैमान माजवलेलं बघायला मिळत आहे. काही ठिकाणी ढगफुटीसदृश्य पाऊस पडला, जनजीवन विस्कळीत झालं. अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाच्या पाण्याने बळीराजाच्या डोळ्यांमध्ये पाणी आणलं. अनेक ठिकाणी शेतीचं नुकसान झालं. पीकं वाहून गेली. त्यामुळे ऐन दिवाळी सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांच्या सर्व आशांवर पाणी फेरलं गेलं. हे संकट आणखी किती दिवस राहील? अशी चिंता बळीराजाला सतावत होती. पण सुदैवाने राज्यातील पाऊस आता परतीच्या मार्गाला लागला आहे.
भव्य कृषी व दुग्ध प्रदर्शन अॅग्रोवर्ल्ड 11 ते 14 नोव्हेंबर 2022 @जळगाव..!
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/1xF7vny7J0I
के. एस. होसाळीकर यांनी दिली ‘ही’ महत्त्वाची माहिती
हवामान विभागाचे तज्ज्ञ के. एस. होसाळीकर यांनी वातावरणातील बदलाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. विदर्भातील अनेक भागांमधून पाऊस आता निरोप घेणार आहे, असं होसाळीकर यांनी सांगितलं आहे. याशिवाय छत्तीसगड, ओडिशा, तेलंगणातील काही भागातून पाऊस जाणार असल्याच देखील माहिती होसाळीकर यांनी दिलीय. विशेष म्हणजे होसाळीकर यांनी राज्य आणि देशभरातून पाऊस कधी जाणार याबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. पुढच्या 48 तासांमध्ये देशभरातील वातावरण कोरडं होणार आहे. त्यामुळे पाऊस आता जाणार आणि हिवाळ्याला सुरुवात होण्याची शक्यता आहे.
राज्यातील पावसाची परिस्थिती वेगळीच?
हवामान विभागाने पुढच्या दोन दिवसात पाऊस देशातून हद्दपार होणार असल्याची माहिती दिली असली तरी राज्यातील सध्याची स्थिती अजूनही जैसे थे अशीच आहे. अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळत आहे. काही भागांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता असून त्यामुळे ऐन दिवाळीत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, पुढच्या दोन दिवसात पावसाने निरोप घेतला तर राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकतो.
तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇