Home तंत्रज्ञान / हायटेक Boka Tandul : काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’...

Boka Tandul : काय सांगता ! चक्क थंड पाण्यात शिजवला जातो ‘हा’ जादुई तांदूळ

Boka Tandul

नवी दिल्ली : Boka Tandul… जेव्हा तुम्हाला खूप भूक लागते तेव्हा तुम्ही काही मिनिटांत काय करता? साहजिकच बहुतेक लोकांचे उत्तर नूडल्स असेल. पण जर तुम्हाला सांगण्यात आले की तांदळाची विविधता आहे. जी पूर्णपणे नैसर्गिक आहे आणि ते खाण्यासाठी शिजवण्याची गरज नाही. होय. पाणी देखील गरम करू नका. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे. विशेष म्हणजे या तांदळाची आसाममध्ये लागवड केली जाते.

तांदळाचे असे प्रकार आहेत, जे फक्त भारतातच पिकतात. एवढंच नाहीतर हे प्रकार संपूर्ण जगात प्रसिद्ध झाले आहेत. दरम्यान, असा एक तांदळाचा प्रकार आपल्या देशात पिकवला जातो, ज्यासाठी तुम्हाला गरम पाणी किंवा पाणी उकळण्याची गरजच भासत नाही, तर फक्त थंड पाण्यातच हा तांदूळ शिजतो. हा राईस आसाम मध्ये पिकवला जात असून त्याला बोका राईस किंवा आसाम राईस.

Panchaganga Seeds

बोका राईसला मिळालाय जीआय टॅग

बोका राईस किंवा आसाम राईस (ओरिझा सॅटिवा) हे आसामचे एक नैसर्गिक उत्पादन आहे. ज्याबद्दल लोकांना ऐकून अनेकदा आश्चर्य वाटते. या तांदळाच्या जातीची अलीकडेच जीआय (भौगोलिक संकेत) टॅगसह नोंदणी करण्यात आली आहे.

बोका तांदूळाचं वैशिष्ट्य काय?

आसाममध्ये पिकणारा बोका राईस मॅजिकल राईस म्हणूनही ओळखला जातो. नैसर्गिक सुबत्तेचं वरदान लाभलेल्या आसामची माती आणि तेथील हवामान यामुळे या तांदळाला एक वेगळीच चव आणि सुगंध असतो. बोका राईसची लागवड आसाममधील कोक्राझार, बारपेटा, नलबारी, बक्सा, धुबरी, दररंग, कामरूप या भागांत प्रामुख्यानं केली जाते.

बोका राईस थंड पाण्यात शिजवल्यानंतर

या तांदळाची पेरणी कधी केली जाते?

आसाममध्ये खरीप हंगामात म्हणजेच, जून महिन्यात बोका राईसची पेरणी केली जाते. त्यानंतर ऑक्टोबरमध्ये पीक तयार होतं. बोका तांदूळ किंवा बोका राईसची लागवड आसामच्या डोंगराळ भागांत राहणारे आदिवासी करतात. या तांदळात 10.73% फायबर आणि 6.8% प्रोटीन असतं. याशिवाय बोका तांदळात अनेक प्रकारचे शरीराला आवश्यक असणारे पोषक घटकही असतात. जे वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त ठरतात.

Planto

कसा पिकवला जातो बोका राईस?

बोका राईसचा अनेक हजार वर्षांचा इतिहास आहे, जो थेट आसामशी संबंधित आहे. यामुळेच भारत सरकारनं आसाममध्ये पिकवल्या जाणाऱ्या या तांदळाला जीआय टॅगही दिला आहे. आता या तांदळाची लागवड पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशमध्येही केली जाते. बोका राईस शिजवायला जेवढा सोपा आहे, तेवढंच अवघड तो पिकवणं आहे. अर्धा एकर शेतातून केवळ पाच पोती तांदळाचं उत्पन्न येतं. इतर तांदळाच्या जातींच्या तुलनेत हा तांदूळ 145 दिवसांत पिकून काढणीला येतो.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇