मुंबई : Avkali Paus… राज्यात ऐन हिवाळ्यामध्ये पाऊस हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. बंगालच्या उपसागरातील ‘मंडोस’ चक्रीवादळाचा परिणाम प्रामुख्याने दक्षिणेकडील राज्यांसह महाराष्ट्रात होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, ढगाळ हवामानामुळे राज्यात किमान तापमानातही वाढ झाली आहे.
बंगालच्या उपसागरातील वादळी प्रणालीच्या प्रभावामुळे राज्यात पावसाला पोषक हवामान तयार होत आहे. तर किमान तापमानात अचानक मोठी घट झाली आहे. यामुळे आता राज्यामध्ये ढगाळ वातावरण दिसून येत आहे. त्याचमुळे पावसासाठी पोषक हवामान होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
हवामान विभागाने काय माहिती दिली?
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, चक्रिवादळ विरले आहे. परंतु उत्तर केरळ तामिळनाडूवर हवेच्या मधल्या स्तरात चक्राकार वारे कायम असून ते पश्चिमेकडे सरकत केरळ, कर्नाटक किनारपट्टीवर अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्राच्या रूपात अवतीर्ण होण्याची शक्यता आहे. १३ डिसेंबर व त्यानंतर हे कमी दाबाचे क्षेत्र भारतीय भूभागापासून दुर जाईल. याच्या प्रभावामुळे विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता कायम आहे.
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन @ नाशिक – 6 ते 9 जानेवारी 2023
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा👇
https://youtu.be/8SNwMAz8j-8
कुठे होईल पाऊस
आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भामध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता होईल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सोमवारी दिवसभर राज्यात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं. कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील नाशिक, नगर, पुणे, सातारा जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी आज पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर पावसाळी वातावरण निवळताच पुढील २ दिवसात किमान तापमान २ ते ४ अंशाने घटेल अशी शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
‘या’ जिल्ह्यांत होणार पाऊस
या मंडोस चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात ढगाळ वातावरण तयार झालं आहे. राज्यामध्ये पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. या ढगाळ वातारणामुळे राज्यात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडला. तर आता नाशिक, नगर, पुणे, सातारा, रायगड आणि रत्नागिरी या जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी विजांसह मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता हवामान विभागणी आहे.
शेतकऱ्यांवर मोठं संकट
ऐन हिवाळ्यात या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठं संकट असणार आहे. ४८ तासांमध्ये महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस होईल, असा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. या अवकाळी पावसामुळे शेतीवरही मोठे संकट ओढावले आहे. ढगाळ हवामानामुळे किमान तापमानातही वाढ होताना पाहायला मिळेल. आज म्हणजे मंगळवारीच महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, तेलंगणा, आणि कर्नाटकपर्यंत पाऊस पडणार असल्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.