येत्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना दिलासा देणारी ही बातमी आहे. यंदा देशात मान्सून चांगला राहण्याची शक्यता, स्कायमेटनं वर्तवली आहे. पावसाळी चार महिन्यांच्या कालावधीत 868.6 मिमी म्हणजे सरासरीहून अधिक 102 टक्के पाऊस पडण्याचा अंदाज स्कायमेटनं जाहीर केला आहे. विशेष म्हणजे यावेळी पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातही चांगला पाऊस राहणार आहे.
“एल-निनो” वेगानं “ला-निना”कडं स्थित्यंतरित होत असल्याचं स्कायमेटचे व्यवस्थापकीय संचालक जतिन सिंग यांनी सांगितलं. “ला-निना”मुळं पाऊस मजबूत होतो, तर “एल-निनो” मान्सून कमजोर करतो. गेल्या वर्षी “एल-निनो”मुळे खूपच कमी पाऊस झाला होता. त्यामुळे देशातील अनेक भागात दुष्काळी स्थिती आहे.