• Home
    • आमच्याविषयी
  • Services
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

अरोमा मिशन : शेतकर्‍यांच्या जिवनात प्रगतीचा सुगंध

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 20, 2023
in शासकीय योजना
0
अरोमा मिशन
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

आपला भारत देश कृषी प्रधान देश आहे, त्यामुळे आजही अनेकांच्या उदरनिर्वाहाचे साधन शेतीच आहे. याशिवाय उद्योगधंदे देखील अवलंबून आहेत. त्यामुळे शेती आणि उद्योगधंदे यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न शासनाकडून केला जात आहे. त्यासाठी विविध योजना देखील शासनाकडून राबविल्या जात आहेत. अशाच काही योजनांपैकी अरोमा मिशन ही देखील एक योजना असून या योजनेच्या माध्यमातून औषधीय आणि सुगंधीत वनस्पतीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना शेती करण्याबरोबर प्रक्रीया करण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. या मिशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या जिवनात प्रगतीचा सुगंध आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. चला तर मग जाणून घेवूया काय आहे ही योजना.

आपला देश हा विविधतेने नटलेला देश आहे. जसे काही अंतरावर बोलीभाषा किंवा राहणीमान बदलते तसेच त्या-त्या भागाच्या वातावरणात बदल देखील जाणवतो. त्यामुळे त्या-त्या भागातील शेतकरी तिथल्या वातावरणानुसार पारंपारिक पिकांची लागवड करीत असतो. पारंपारिक पिके घेण्याच्या सवयीत शेतकरी अडकल्यामुळे अनेकदा नुकसान होते. जास्तीचे उत्पादन होवून भाव कमी मिळतो. ज्याप्रमाणे केळी, कापूस, गहू, तांदूळचे उत्पादन घेतले जाते तसे काही भागात औषधी आणि सुगंधीत वनस्पतींचे उत्पादन घेतले जाते. शेतकरी उत्पादीत करीत असलेल्या शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी व चांगला दर मिळावा यासाठी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, अरोमा मिशन यांसारख्या विविध योजना राबवित आहे.

अरोमा म्हणजे सुगंध… जे शेतकरी औषधी आणि सुंगधीत वनस्पतीचे उत्पादन घेत आहेत. अशा शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढीसाठी हे अरोमा मिशन राबविले जात आहे. केंद्र शासनाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (उडखठ) संचलित औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था या मिशनचे नेतृत्व करीत आहे. या मिशनअंतर्गत औषधी आणि सुंगधीत वनस्पतीचे उत्पादन घेणार्‍या शेतकर्‍यांना शेतीविषयी माहिती, रोपे तसेच प्रशिक्षण दिले जात आहे. एवढेच नव्हे तर शेतकर्‍यांनी उत्पादीत केलेल्या मालावर प्रक्रिया आणि मार्केटींगसाठीही सहकार्य केले जात आहे.

Green Drop

काय आहे अरोमा मिशन

अरोमा मिशन विषयी बोलतांना औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेचे संचालक डॉ. प्रबोध कुमार त्रिवेदी सांगतात की, अरोमा मिशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढविण्याबरोबर उद्योगांना कशी मदत करता येईल, यासाठी प्रयत्न करीत आहोत. औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था (उखचअझ) तसेच इतर काही अशा संस्था आहेत ज्यांनी सुगंधीत वनस्पतींची उच्चप्रतीचे वाण विकसीत केले असून ते शेतकर्‍यांपर्यंत देखील पोहोचविले आहे. तसेच शेतकर्‍यांना या सुगंधीत वनस्पतींची शेती कशी करावी, या वनस्पतींवर प्रक्रिया केल्यानंतर जे तेल निघत आहे ते कंपन्यांपर्यंत कसे पोहोचवावे, याबाबत देखील प्रशिक्षण दिले जात असल्याचे डॉ. प्रबोध कुमार त्रिवेदी सांगतात. आजच्या घडीला औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था अरोमा मिशनच्या माध्यमातून 24 राज्यातील शेतकर्‍यांसोबत काम करीत आहे. शिवाय 3 हजार शेतकर्‍यांचे क्लस्टर देखील सुरु झाले आहेत. यामुळे सुगंधित पिकावर चांगल्याप्रकारे काम होवून फायदा झाल्याचेही ते सांगतात.

600 टन लेमन ग्रास ऑईल निर्यात

केंद्र शासनाच्या वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (उडखठ) संचलित औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्था या मिशनचे नेतृत्व करीत आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या सर्व प्रयोगशाळा औषधी आणि सुगंधी वनस्पती संस्थेच्या नेतृत्वात शेतकर्‍यांसाठी अरोमा मिशन अंतर्गंत काम करीत आहेत. पुढे बोलतांना डॉ. त्रिवेदी सांगतात की, लेमन ग्रास (गवती चहा), जिरेनियम, मेंथा यांसारख्या पिकांची शेती केल्यामुळे आता बाहेरच्या देशांमधून तेल आयात करावे लागत नाही. मेंथाच्या बाबतीत सांगायचे तर गेल्या अनेक वर्षांपासून भारत याचा सर्वात मोठा उत्पादक आणि निर्यातक आहे. लेमन ग्रास बाबत सांगायचे तर आतापर्यंत आपण त्याची आयात करीत होतो, परंतु यंदा 600 टन पेक्षा जास्त लेमन ग्रास ऑईल आपण एक्सपोर्ट केले आहे. यामुळे लेमन ग्रास ऑईलचे सर्वात मोठे एक्सपोर्ट म्हणून आपण पुढे आले आहोत.

प्रशिक्षणासह सहकार्य…

इतर पिकांच्या जाती देखील आम्ही शेतकर्‍यांना दिल्या आहेत. दिल्याच नाही तर त्याची शेती कशी करावी याच्या प्रशिक्षणासोबत पिक काढल्यानंतर त्यावर प्रक्रिया कशी करावी, याचे देखील प्रशिक्षण दिले आहे. एवढेच नाही तर शेतकर्‍यांना सुगंधील ऑईलशी संबंधीत कंपन्यांशी देखील जोडले. अरोमा मिशनच्या माध्यमातून शेतकर्‍यांना फक्त बियाणे, रोपे आणि प्रशिक्षण दिले जात नाहीये तर मालावर प्रक्रिया आणि मार्केटींगला देखील एकच व्यासपीठावर आणत आहोत.

शेतकरी आणि उद्योग दोघांसाठी व्यवस्था

पुढे बोलतांना डॉ. त्रिवेदी सांगतात की, शेतकरी आणि उद्योग यांन आम्ही एकाच व्यासपीठावर आणण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपला शेतमाल कोण खरेदी करीत आहे. उद्योगांच्या मागणीनुसार शेती केली पाहिजे, हे शेतकर्‍यांना माहीत असले पाहिजे. अरोमा मिशनमध्ये शेतकरी आणि उद्योग दोघांसाठी व्यवस्था आहे. अरोमा मिशनचा लाभ घ्यायचा असेल तर शेतकरी आणि व्यापारी यांना संस्थेच्या संकेतस्थळावर नोंदणी करावी लागेल. नोंदणी झालेले शेतकरी, व्यापारी आपआपसात संवाद देखील साधू शकतील, असेही ते सांगतात.

Vikas Milk

उत्पन्नात वाढ

अरोमा मिशनच्या माध्यमातून आम्ही अशा काही आदिवासी भागांपर्यंत पोहोचलो, ज्या ठिकाणी जाणे कठीण होते. काही भाग तर असेही होते ज्या ठिकाणी जायला रस्ता देखील नव्हता. अशा ठिकाणांपर्यंत आमचे शास्त्रज्ञ पोहोचले. अशा ठिकाणी पोहचून आम्ही सुगंधित पिकांची शेती करुन त्यांच्या उत्पन्नात कशा प्रकारे वाढ होवू शकते, याबाबत मार्गदर्शन केले व त्यामुळे आम्ही देशभरात 20 क्लस्टर बनविले आहेत.

पुर आणि दुष्काळग्रस्त भागांना फायदा

पुढे माहिती देतांना डॉ. त्रिवेदी सांगतात की, आम्ही ईशान्यकडील राज्यांमध्ये देखील पोहोचले आहोत. आमचे शेतकर्‍यांना सांगणे आहे की, पारंपारिक शेती तर करतच आहात. परंतु पुर आणि दुष्काळग्रस्त भागात खस सारख्या पिकांची शेती करा. आसाममधील माजुली द्विपवर जिथे वर्षातील जास्तीत जास्त महिने पाणी भरलेले असते. अशा ठिकाणी शेतकरी खसची शेती करीत आहेत. आज देखील असे काही सुगंधीत तेल आहे जे बाहेरील देशांमधून आयात करावे लागते. जसे की जिरेनियम. 90 टक्के जिरेनियम आज देखील बाहेरुन आयात केले जाते. अरोमा मिशनच्या पुढील भागात आमचा या पिकांवर काम करण्याचा आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही ते सांगतात.

तुम्हाला हेही वाचायला नक्की आवडेल 👇

  • कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा भाव ; वाचा कापूस बाजारभाव
  • सेंद्रिय शेतीचे अन्नद्रव्य व्यवस्थापन

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: अरोमा मिशनपारंपारिक शेतीशेतकरीसुंगधीत वनस्पती
Previous Post

कापसाला ‘या’ बाजार समितीत मिळतोय असा भाव ; वाचा कापूस बाजारभाव

Next Post

कांद्याला असा मिळतोय भाव ; वाचा आजचे कांद्याचे बाजारभाव

Next Post
कांद्याला

कांद्याला असा मिळतोय भाव ; वाचा आजचे कांद्याचे बाजारभाव

ताज्या बातम्या

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा 2)

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

मिल्की मिस्ट : दुधाचा एक थेंबही न विकता उभा केला 2,000 कोटींचा मिल्क ब्रँड !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 21, 2025
0

आज 20 ऑगस्ट 2025

आज 20 ऑगस्ट 2025 : जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, बुलढाणा, छ. संभाजीनगर, जालनाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

आज 20 ऑगस्ट 2025 : महाराष्ट्रासह देशभरातील पावसाची स्थिती

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास...??

5 म्हशीपासून 120 म्हशीपर्यंतचा प्रवास…??

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 20, 2025
0

दुग्धव्यवसायासाठी अनुदान

दुग्धव्यवसायासाठी अनुदान… वैयक्तिक ₹ 10 लाख तर सामूहिक ₹ 3 कोटींपर्यंत..

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 19, 2025
0

तांत्रिक

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

एप्रिल महिन्यातील कांदा पीक व्यवस्थापन !

एप्रिल महिन्यातील कांदा व्यवस्थापन !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
March 29, 2025
0

जगाच्या पाठीवर

मान्सून पुन्हा सक्रिय होणार

मान्सून पुन्हा सक्रिय होणार; राज्याच्या काही भागात आज पुन्हा मुसळधार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

राज्यात थंड

राज्यात थंड, बोचरे वारे! आरोग्याला फायदा की नुकसान? जाणून घ्या …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 25, 2025
0

दुग्धव्यवसाय कार्यशाळा

बुकिंगची आज शेवटची संधी…; पुढची दुग्धव्यवसाय कार्यशाळा पुढच्या वर्षी…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 23, 2025
0

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज

पावसाचा आगामी दोन आठवड्यांचा अंदाज; 25 ऑगस्टला कमी दाबाचे नवे क्षेत्र, महाराष्ट्रात पाऊस सुरूच राहणार !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
August 22, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Home
  • Services

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.