तीन दिवसांत ९० हजार शेतकऱ्यांच्या भेटी; प्रदर्शनाचा आज समारोप
जळगाव, ता. १७ (प्रतिनिधी)ः कृषी क्षेत्रातील तंत्रज्ञान अॅग्रोवर्ल्डच्या कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचतोय. उद्योजकांनी शेतमालाच्या विक्री व्यवस्थेवर देखील लक्ष देण्याची गरज असून अशा प्रकारच्या प्रदर्शनातून शेतकरी व उद्योजक यांना सकारात्मक उर्जा मिळते. त्यामुळे येणाऱ्या काळात नक्कीच शेतीचे चित्र बदलणार आहे, असा विश्वास खासदार उन्मेश पाटील यांनी व्यक्त केला.
अॅग्रोवर्ल्डच्या राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनात राज्यातील कृषी उद्योगक्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल उद्योजकांना तसेच कार्यक्षम अधिकारी यांना ‘अॅग्रोवर्ल्ड कृषी सन्मान पुरस्कार” देऊन गौरविण्यात आले. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.खा.उन्मेष पाटील बोलत होते. येथील शिवतीर्थ मैदानावर सुरू असलेल्या अॅग्रोवर्ल्ड प्रदर्शनात पहिल्या तीन दिवसात ९० हजारांहून अधिक शेतकऱ्यांनी भेटी देऊन माहिती घेतली. प्रदर्शनाचा उद्या (दि.१८) शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी प्रदर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
जळगांव शहराचे आ. सुरेश भोळे, अमरावतीचे विभागीय कृषी सहसंचालक सुभाष नागरे, कृषी उपसंचालक अनिल भोकरे, प्लॅन्टो कृषीतंत्रचे स्वप्नील चौधरी, क्वालीटी ड्रीपचे रमेश पाटील, यावल पंचायत समितीच्या सभापती सौ. चौधरी, जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर सोनवणे,जळगांव जिल्हा दुध उत्पादक संघाचे कार्यकारी संचालक सुशीलकुमार गौतम व अॅग्रोवर्ल्डचे संचालक शैलेंद्र चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुरस्कार्थी उद्योजक व अधिकारी
अशोक गुप्ता (एस.बि.आय. प्रबंधक, अकोला), दिलीप झेंडे विभागीय (कृषी सहसंचालक, पुणे), (सुभाष नागरे विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती ), प्रमोद सावदेकर (महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्या. जळगांव), विणा राव ( विभागीय व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र , जळगांव) , अशोक वामनराव संसारे (कृषी अधिकारी कळंब ता कळंब जि.उस्मानाबाद), बि.सी.देशमुख (महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, नाशिक)
याचबरोबर कृषी उद्योगक्षेत्रासह सामाजिक बांधिलकी जपून केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल बाळासाहेब सूर्यवंशी (संचालक -लक्ष्मी अॅग्रो केमिकल्स, जळगांव), (मिलिंद प्रल्हाद भांडारकर, अल्फाटेक , पुणे), आर.एम.चौधरी(दि ताप्ती व्हॅली बनाना प्रोसेसिंग अॅण्ड प्रोडक्ट्स को-ऑफ सोसायटी मर्यादित ,फैजपूर), कैलाश मगर(कार्यकारी संचालक ग्रब अॅग्रो, पुणे), खंडू भिका अहिरे (नर्मदा प्लास्ट, रामतीर,ता.सटाना, जि.नाशिक), अरुण मधुकर बोरोले( सि.ई.ओ. सुमधु उद्योग, जळगांव), चंद्रकांत दोडके व सतीशकुमार ऐतवाडे (संचालक, पद्मावती सीड्स सांगली) रामसिंग देवरे(संचालक, साई नेटहाउस) सुनील पाटील संचालक( लिजेंड इरिगेशन, नाशिक) अशिष जैन संचालक( स्पेक्ट्रा इनोव्हेशन, नाशिक), रोटरी क्लब जळगांव वेस्ट,( २०१८-१९ मध्ये गाडेगांव येथील जलसंधारण कार्यासाठी), राजेश चौधरी( सनशाईन अॅग्री प्रा.लि.जळगांव) पार्श्व सब्द्रा( नमो बायोप्लांट ,पुणे), निखील चौधरी, स्वप्नील चौधरी(प्रलशर बायो प्राॅडक्टस प्रा.लि.), पुष्कराज चौधरी ( रामबायोटेक, जळगांव), जळगांव जिल्हा दुध उत्पादक संघ जळगाव.