अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 03 ते 06 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव
प्रदर्शनात पहिल्याच दिवशी, पाच हजार शेतकर्यांना मोफत भाजीपाला बियाणे पाकीट व मोफत पाणी परीक्षणाची संधी…
अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचा शुभारंभ मंगळवार, दि. 3 नोव्हेंबर रोजी होत आहे. याच पार्श्वभूमीवर प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी, प्रदर्शनस्थळी नोंदणी केलेल्या पहिल्या पाच हजार शेतकर्यांना निर्मल सीड्सतर्फे विविध प्रकारच्या भाजीपाल्याचे दहा ग्रॅम बियाण्याचे एक पाकीट मोफत दिले जाणार आहे. तर ओम गायत्री नर्सरी तसेच आनंद अॅग्रो केअर यांच्यातर्फे पाण्याचा PH, EC, TDS परीक्षण मोफत व तात्काळ करून मिळणार आहे. प्रदर्शनाला भेट देण्यासाठी, नोंदणीसाठी कोणतीही प्रवेश फी नाही.
ॲग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शनाचे जळगावातील हे नववे प्रदर्शन असून प्रदर्शनात 210 हून अधिक स्टॉल्स आहेत. बियाणे पेरणी, कोळपणी व फवारणी करणारा तसेच जीपीएस प्रणालीवर चालणारा इलेक्ट्रीक बैल ठरणार प्रदर्शनाचे आकर्षण.. आधुनिक तंत्रज्ञान, टेरेस गार्डन, किचन गार्डन टूल्सचे साहित्य तसेच कृषी यंत्र व अवजारे हा मुख्य गाभा असलेले हे प्रदर्शन मोफत असून याचा शेतकऱ्यांनी आवर्जून लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
तेव्हा तारीख आणि ठिकाण लक्षात असू द्या… अॅग्रोवर्ल्ड कृषी प्रदर्शन 2023… 03 ते 06 नोव्हेंबर… एकलव्य क्रीडा संकुल, एम. जे. कॉलेज कॅम्पस, जळगाव…
संपर्क –
9175040173
9175060174
https://www.eagroworld.in