पाण्याचा ताण सहन करणाऱ्या व क्षारपड जमिनीत तग धरणाऱ्या ऊस जातींची शिफारस पाडेगाव येथील मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राने केली आहे. कोएम 0265 (फुले 265), एमएस 10001 (फुले 10001), फुले ऊस 15012 या जातींची लागवड करावी.
पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या मुळांची रचना खोलवर असते. कमी रुंदी आणि उभट पानांची रचना असलेल्या जाती पाण्याचा सहन ताण करतात.
ऊस कांडीवर आणि पानांवर पांढरा मेणाचा थर असलेल्या जाती पाण्याच्या ताणास सहनशील असतात. पाण्याचा ताण सहन करणाऱ्या जातींच्या पानातील तापमान वातावरणातील तापमानापेक्षा 4 ते 5 अंश सेल्सिअसने कमी असते. पानांची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते.
(कंटेंट सौजन्य : ADT/KVK, बारामती & रेनट्री)