ग्रीन-नेक्टर (GreenNectar) हा नाशिकमधील नाविन्यपूर्ण ॲग्रीटेक स्टार्टअप आहे. त्यांची खास ओळख म्हणजे – “100% नैसर्गिक शेतीला” प्रोत्साहन देणे! आधुनिक, पण सोपी व कमी खर्चिक ऑरगॅनिक उत्पादनेही ते बनवतात. जमिनीचे आरोग्य वाढवणे व उत्पादन वाढवणे यावर भर देतात.
FPC ला ₹ 10 कोटींपर्यंतचे कर्ज.. 3 ते 6 कोटींपर्यंत अनुदान
Agri Startup ला ₹ 10 लाख ते ₹ 10 कोटींपर्यंत फंडिंग..
FPC & Agri Startup – ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला कार्यशाळा
उत्पादने व सेवा:
– ऑरगॅनिक लिक्विड प्लांट फूड, ग्रीन कंपोस्ट, फार्म यार्ड नेचर, वर्मी वॉश फिल्टरेशन, स्लरी फिल्टरेशन, इ.
– नैसर्गिक खत, बियाणे प्रक्रिया व आधुनिक सेंद्रिय शेतीसाठी विविध सोल्यूशन्स.
– बायोलॉजिकल संरचना वापरून उत्पादन कमी वेळात, सहज व निसर्गपूरक बनते.
तंत्रज्ञान व इनोव्हेशन:
– परंपरागत शेतीच्या पद्धतीची आधुनिक विज्ञानासोबत सांगड घालून नवे उत्पादनक्षम काम करणे.
– शेतकऱ्यांसाठी सहज प्रशिक्षण, तांत्रिक सल्ला आणि मार्केट कनेक्टिव्हिटी.
“ग्रीन-नेक्टर”कडे आज शेकडो शेतकऱ्यांचा विश्वास आहे. ते पर्यावरणपूरक, उत्पादक व दीर्घकाळ फायदेशीर शेतीसाठी कार्यरत आहेत.
ग्रीन-नेक्टर शेतकरी यशोगाथा
सागर भोसले (मालेगाव)
हे शेतकरी पारंपरिक रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत बिघडत असल्याचं अनुभवत होते. त्यांनी ग्रीन-नेक्टरचे ऑरगॅनिक लिक्विड प्लांट फूड आणि वर्मीवॉश या उत्पादनांचा वापर सुरू केला.
– सुरुवातीला त्यांना उत्पादन थोडं कमी मिळालं, पण दुसऱ्या हंगामातच पिकांची वाढ, फळांची गुणवत्ता आणि मातीचा ओलावा वाढला. खर्च कमी झाला, भाजीपाला आणि द्राक्षांच्या उत्पादनात 25% वाढ झाली.
– शेतातून मिळणारी उत्पन्न आणि पिकांची मार्केट किंमत दोन्हीही वाढली. त्यांनी इतर शेतकऱ्यांनाही या उत्पादनांचा वापर करायला सुचवलं आहे.
शेतीत थोड्या चिकाटीने आणि ग्रीन-नेक्टर सारख्या ऑरगॅनिक स्टार्टअप्सच्या सोबतीनं आपल्या जमिनीला पुन्हा नवी ताकद मिळू शकते!
अतुल पाटील (दिंडोरी)
– अतुल पाटील यांनी द्राक्ष बागेत 2 वर्षे ग्रीन-नेक्टरची सेंद्रिय उत्पादने वापरली.
– परिणाम, द्राक्षांचे घड जाड, गोड, व टिकाऊ झाले; बाजारात दरही जास्त मिळाला.
– मातीचा पोत सुधारला, रासायनिक खतांचा खर्च 30% ने कमी झाला आणि शेताला NABARDकडून ऑरगॅनिक शेतीसाठी चांगले सर्टिफिकेटही मिळाले.
• यामुळे त्यांना निर्यात बाजारात प्रवेश मिळाला आणि परिसरातील अजून दहा शेतकऱ्यांनी हे मॉडेल अवलंबलं!
संपर्क/ पत्ता:
– रो हाऊस नंबर 7, प्रीतम सोसायटी, वीर सावरकर नगर, नाशिक – 422013.
– फोन: 9422251967 / 7447751967
– ईमेल: info@greennectar.in
– वेबसाईट: http://greennectar.in
ॲग्रोवर्ल्डतर्फे नाशिकमध्ये 10 ऑगस्टला (रविवारी).. FPC & Agri Startup कार्यशाळा
