तेलंगणातील केसीआर सरकारच्या शेतीविषयक धाडसी योजनांची नेहमीच चर्चा होते. या तेलंगणात मेहनती आणि प्रामाणिक प्रयत्न करणार्या शेतकर्यांना प्रगतीला मोठा वाव मिळतो. असेच एक उदाहरण आहे संगारेड्डी जिल्ह्यातील मोहम्मद हनीफ या करोडपती शेतकर्याची. इ. स. 2000 मध्ये वयाच्या 17 व्या वर्षी इंटरमिजिएट पूर्ण केल्यानंतर परिस्थितीमुळे त्यांनी शाळेला रामराम ठोकला. वयाच्या 19 व्या वर्षी बागायती शेतीमध्ये हात आजमावण्यापूर्वी त्यांनी काही पडेल ती कामे, नोकर्या केल्या. आता त्यांच्याकडे 20 शेतमजूर काम करतात आणि वयाच्या 40 व्या वर्षी शेती व्यवसायातून हनीफ दर वर्षी एक कोटी रुपयांचा नफा कमावतात.
आपल्या यशोगाथेने मोहम्मद हनीफ यांनी फक्त संगारेड्डी जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण राज्यातली शेतकर्यांना प्रेरणा दिली आहे. केवळ पावसाळी हंगामात शेती करणारे अनेक शेतकरी तेलंगणात आहेत. हनीफ हे असेच एक कोरडवाहू पट्ट्यातील शाळा सोडून दिलेले ड्रॉपआऊट विद्यार्थी. घरची परिस्थिती आणि जबाबदारी अंगावर येऊन पडल्यामुळे शिक्षणाच्या वयात त्यांनी छोट्या-मोठ्या नोकर्या, प्रसंगी हमाली-रोजंदारी करत कुटुंबाची भूक भागवली.
आधी भाडेतत्त्वावर शेती, पुढे नफा शेतीतच गुंतवला.
हनीफ हे सारे प्रयत्न करून नंतर शेतीकडे वळले. मेडक जिल्ह्यातील अल्लादुर्गम मंडळातील रेड्डीपल्ली येथील मूळ रहिवासी असलेल्या या कुटुंबाचे पूर्वज संगारेड्डी जिल्ह्यातील गुम्मडीदला मंडलातील मंबापूर गावात स्थलांतरित झाले. तिथे त्यांच्याकडे जमीन वैगेरे काही नव्हती. केवळ चरितार्थ चालविणे यातच कुटुंबाची धन्यता होती. हनीफ यांनी इथे आधी भाडेतत्त्वावर आणि पुढे शेतीतील नफा शेतीत गुंतवून स्वतःची आठ एकर जमीन खरेदी केली. सुरुवातीला पारंपरिक पिके घेत पुढे हनीफ आधुनिक शेती प्रयोगांकडे वळले. आता त्यांनी स्वतःच्या जमिनीशिवाय विविध प्रकारच्या भाज्यांची लागवड करण्यासाठी आणखी 20 एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली आहे.
दर महिन्याला रोखीत आठ लाखांचा नफा
हनीफ सांगतात, 28 एकरातील उत्पादनातून त्यांना मासिक 8 लाख रुपयांचा नफा मिळतो, ज्याचा अर्थ वर्षाला 1 कोटी रुपये नफा होतो. गुम्मडीदला परिसर आता भाजीपाला लागवडीसाठी ओळखला जातो. अभ्यास बंद केल्यानंतर मी मिळेल त्या नोकरीच्या शोधात होता. वडील उदरनिर्वाहासाठी किरकोळ व्यवसाय करत होतो. मला माझ्या कुटुंबाला आधार द्यायचा होता. हा एकच उद्देश डोळ्यांसमोर ठेवून मी 2002 मध्ये मंबापूर येथे पालेभाज्यांची लागवड करण्यासाठी दोन एकर जमीन भाडेतत्त्वावर घेतली.
रयतु बाजारचा आर्थिक प्रगतीत मोठा वाटा
हनीफ यांच्या शेतात वर्षभर 20 पेक्षा जास्त मजूर काम करतात. ते आता प्रगतिशील बागायती शेतकरी आहेत. त्यांची बहीण, भावजय आणि कुटुंबातील इतर सदस्यांचे केसीआर सरकारने निर्माण केलेल्या रयतु बाजार येथे दोन स्टॉल आहेत, जिथे ते स्वतःच स्वत:ची उत्पादने विकतात. इथे ग्राहकांना चांगला, दर्जेदार माल आणि शेतकर्यांना चांगला भाव मिळतो. केसीआर सरकारचे रयतु बाजार हे शेतकरी ते ग्राहक असे थेट व्यासपीठ आहे. इथे दलालांना, व्यापार्यांना थारा नाही.
प्रगतिशील शेतकर्यांचे रोल मॉडेल
गेल्या वर्षी मोहम्मद हनीफ यांचा जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी संगारेड्डी एम हनुमंथ राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. राव यांनी दलित बंधू लाभार्थींना प्रवृत्त करण्यासाठी आणि प्रेरणा देण्यासाठी हनीफ यांची निवड केली, यात आश्चर्याची बाब नाही. तेलंगणात या योजनेंतर्गत दलित शेतकर्यांना 10 लाख रुपयांसह व्यवसाय सुरू करून आर्थिकदृष्ट्या सक्षम बनण्याची प्रत्येक संधी दिली जात आहे.
शेतात स्वतः वेळ दिल्याशिवाय शेती नफ्यात येऊ शकत नाही
जिल्हा फलोत्पादन अधिकारी पी. सुनीता या नेहमीच इच्छुक बागायतदार शेतकर्यांना हनीफच्या शेतात जाऊन त्याच्या पद्धती जाणून घेण्यास सांगतात. हनीफ सांगतात, तेलंगणा अजूनही 70 टक्के भाजीपाला आयातीवर अवलंबून आहे. बागायती शेतीमध्ये मोठी क्षमता आहे. इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतीला अधिक बांधिलकीची गरज आहे. अर्थात थोडीशी सावधगिरीही शेतकर्यांनी बाळगायला हवी. शेतकर्यांनी स्वतः शेतात बराच वेळ घालवायला हवा. शिवाय, कापणीसाठी योग्य वेळ आणि मार्केटिंग व्यवस्था सुनिश्चित करणे ही नफ्यातील शेतीची गुरुकिल्ली आहे.
स्वतः पिकविलेला माल स्वतः विकला तरच फायदा
स्वतः उत्पादित केलेला माल व्यापार्यांच्या हवाली न करता स्वतःच विकून हनीफने सुरुवातीपासूनच चांगला नफा कमावण्यास सुरुवात केली. तेव्हापासून त्यांनी कधीही मागे वळून पाहिले नाही. कमावलेला नफा परत शेतीत गुंतवून त्यांनी मंबापूर येथे आठ एकर जमीन विकत घेतली. ग्रीन हाऊस, पॉली हाऊस, मल्चिंग आणि ठिबक सिंचन यासारख्या आधुनिक शेती पद्धतींचा अवलंब करण्याबरोबरच हनीफ यांनी आपली लागवड 28 एकरांपर्यंत वाढवली.
शेतात स्वतः वेळ दिल्याशिवाय शेती नफ्यात येऊ शकत नाही
जिल्हा फलोत्पादन अधिकारी पी. सुनीता या नेहमीच इच्छुक बागायतदार शेतकर्यांना हनीफच्या शेतात जाऊन त्याच्या पद्धती जाणून घेण्यास सांगतात. हनीफ सांगतात, तेलंगणा अजूनही 70 टक्के भाजीपाला आयातीवर अवलंबून आहे. बागायती शेतीमध्ये मोठी क्षमता आहे. इतर कोणत्याही व्यवसायापेक्षा शेतीला अधिक बांधिलकीची गरज आहे. अर्थात थोडीशी सावधगिरीही शेतकर्यांनी बाळगायला हवी. शेतकर्यांनी स्वतः शेतात बराच वेळ घालवायला हवा. शिवाय, कापणीसाठी योग्य वेळ आणि मार्केटिंग व्यवस्था सुनिश्चित करणे ही नफ्यातील शेतीची गुरुकिल्ली आहे.
काय आहे तेलंगणातील दलालमुक्त रयतु बाजार?
मध्यस्थ आणि दलालांची व्यवस्था मोडीत काढून शेतकर्यांना थेट बाजारपेठ उपलब्ध करून देणारी आणि कृषी मालाला चांगला हमी भाव मिळवून देणारी रयतु बाजार ही भक्कम अशी शेतकरी ते ग्राहक व्यवस्था आहे. शेतकर्याला तेलगू भाषेत रयतु असे म्हटले जाते. शेतकर्याचा बाजार म्हणजे रयतु बाजार. योग्य सुविधा उभारून तेलंगणात केसीआर सरकारने खर्या अर्थाने शेतकर्याला राजा बनवले आहे. आंध्र प्रदेश आणि तेलंगणा राज्यात विविध बाजार समित्यांनी सुरू केलेले रयतु बाजार तसेच आपला भाजीपाला हे प्रयोग यशस्वी होताना दिसत आहेत. तिथे शेतकर्यांना भावाची हमी मिळतेय. शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी शेतकरी ते ग्राहक या संकल्पनेतून सुरू झालेल्या या उपक्रमाला शेतकर्यांसह ग्राहकांकडूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे.
गेल्या पंधरा वर्षांहून अधिक काळापासून हे बाजार सुरू आहेत. सुमारे साडे पाच एकर परिसरात पसरलेला विजयवाडा येथील रयतु बाजार सर्वात मोठा आहे. या बाजारात सहभागी होण्यासाठी तहसीलदारांमार्फत शेतकर्यांची नोंदणी केली जाते. त्यानुसार त्यांना या बाजारात हंगामानुसार जागा निश्चित करून दिली जाते. त्यासाठी शेतकर्यांकडून कसलेही पैसे घेतले जात नाहीत. येथील बाजारातील विविध शेतमालाचे भाव सकाळी राज्य शासनाचे अधिकारीच निश्चित करतात. त्यानुसार बाजार संपेपर्यंत त्या भावातच शेतमालाची विक्री करावी लागते. परिणामी, ग्राहकांकडून भाव कमी करून मागितले जात नाही. शेतकरी व ग्राहकांनाही भाव परवडत असल्याने या बाजारांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळतो.