• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

भारतातील सर्वांत मोठा सम्राट अशोकाचे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला अफगाणिस्तान, इराण असे तब्बल 50 लाख वर्ग किमी पसरलेले होते.. अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह..

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 8, 2022
in वंडरवर्ल्ड
0
भारतातील सर्वांत मोठा सम्राट अशोकाचे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला अफगाणिस्तान, इराण असे तब्बल 50 लाख वर्ग किमी पसरलेले होते.. अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह..
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

मौर्य साम्राज्य हे प्राचीन जगाच्या इतिहासातील एक प्रमुख साम्राज्य असून भारताच्या इतिहासातील सर्वात मोठे साम्राज्य होते. मौर्य वंशाने शासन केलेल्या साम्राज्याचा कालखंड इ.स.पू. ३२१ ते इ.स.पू. १८५ इतका समजला जातो. चंद्रगुप्त मौर्य हे मौर्य साम्राज्याचे संस्थापक तर सम्राट अशोक हे या साम्राज्यातील सर्वात प्रमुख शासक होते. गंगेच्या खोऱ्यामधील मगध राज्यापासून उगम झालेल्या या साम्राज्याची राजधानी पाटलीपुत्र (आजचे पाटणा) ही होती. हे साम्राज्य इ.स.पू. ३२२ मध्ये चंद्रगुप्त मौर्य याने नंद घराण्याला पराभूत करुन स्थापन केले. त्याने त्याकाळच्या भारतातील सत्तांच्या विसंवादाचा फायदा उठवून आपल्या साम्राज्याचा पश्चिमेकडे व मध्य भारतात विस्तार केला. इ.स.पू. ३२० पर्यंत या साम्राज्याने सिकंदरच्या प्रांतशासकांना (क्षत्रप) हरवून पूर्णपणे वायव्य भारत ताब्यात घेतला होता.

प्रतीक्षा संपली ॲग्रोवर्ल्ड तर्फे सेलम हळद जळगावात दाखल… वितरण सुरू…

 

मुघल साम्राज्यापेक्षाही मोठे होते सम्राट अशोकाचे साम्राज्य
मौर्य घराण्यातील सम्राट अशोकाच्या काळात ५०,००,००० (पन्नास लाख) वर्ग चौरस किमी एवढा प्रचंड प्रदेश ताब्यात असलेले मौर्य साम्राज्य हे तत्कालीन सर्वांत मोठ्या साम्राज्यांपैकी एक व भारतीय उपखंडातील सर्वांत मोठे साम्राज्य होते. आपल्या सर्वोच्च शिखरावर असताना हे साम्राज्य उत्तरेला हिमालय, पूर्वेला आसाम, पश्चिमेला पाकिस्तान, अफगाणिस्तान व इराणचे काही भाग इतके पसरले होते. भारताच्या मध्य व दक्षिण प्रदेशांमध्ये चंद्रगुप्त व बिंदुसार यांनी कलिंग (सध्याचा ओरिसा) हा प्रदेश वगळता विस्तार केला. नंतर सम्राट अशोकाने कलिंग जिंकून घेतला. अशोकांच्या मृत्यूनंतर साठ वर्षांनी मौर्य साम्राज्याचा अस्त झाला. इ.स.पू. १८५ मध्ये शुंग साम्राज्याने मौर्यांना पराभूत करून मौर्य साम्राज्य संपुष्टात आणले.

 

चंद्रगुप्ताने आपल्या कारकिर्दीत सिंधू नदीपलीकडील अलेक्झांडरच्या साम्राज्याचा प्रदेश जिंकून घेतला. चंद्रगुप्ताने सेल्युकस निकेटर याला पराभूत करून इराणचेही काही भाग जिंकून घेतले.

 

सम्राट अशोकाची राज्यव्यवस्था :
पाटलीपुत्र या राजधानीवरून एवढ्या विशाल साम्राज्याच्या कारभाराचे संचलन करणे सामान्य काम नव्हते. उत्तरापथ, पश्चिमचक्र, दक्षिणपथ, कलिंग, मध्यप्रदेश यांच्या तक्षशिला, उज्जैन, सुवर्णगिरी, तोसली पाटलीपुत्र येथून राजपरिवारातील ‘उपराज’ मार्फत राज्य-व्यवस्था केली जात असे. बिंबीसाराच्या शासन काळात स्वतः कुमार अशोक उज्जैन येथील आणि अशोकचा पुत्र कुणाल राजा बनण्यापूर्वी तक्षशिला येथे ‘उपराज’ म्हणून राहिलेले आहे.
ज्याप्रमाणे भारतात केंद्र सरकार, राज्य सरकार, राज्यातील अनेक जिल्हे, तालुके आणि गट, गण असतात. त्याप्रमाणे अशोकाच्या साम्राज्यामध्ये पाटलीपुत्र येथे केंद्र सरकार होते. त्यानंतर राज्यसरकार त्यात प्रदेश, प्रदेशात जनपदे आणि जनपदाचे अनेक भाग पडलेले असत. त्यांना स्थानीय, द्रौणमुख, खार्वरिक, संग्रहण आणि गाव म्हटले जात असे राज्यात सर्वात लहान ग्राम अथवा गाव होते. दहा गावांचा एक संग्रहक बनत असे. ग्रामिक-गोप-स्थानिक-समाहर्ता-महामात्र-कुमार-अमात्य व सर्वोच्च स्थानी मौर्य सम्राट अशा प्रकारची शासनव्यवस्था सम्राट अशोकाच्या राज्यव्यवस्थेत होती. अशाच प्रकारची व्यवस्था आपण आज स्विकारली आहे असे म्हटले तरी अतिशयोक्तीचे ठरू नये.

 

 

सम्राट अशोकाची प्रजाहिताची कामे :
सम्राट अशोक प्रजाहितासाठी नेहमी झटे. त्यांनी प्रजेच्या सुखाकरिता अनेक कामे केली. प्रवाशांच्या सोयीकरिता रस्त्याच्या दोन्ही बाजूस झाडे लाविली. ठिकठिकाणी विहिरी व धर्मशाळा बांधल्या प्रजेचे दु:ख नाहीसे व्हावे म्हणून त्याने ठिकठिकाणी दवाखाने उघडले. औषधांचा पुरेसा पुरवठा व्हावा म्हणून त्याने दिव्य औषधांच्या बागाही ठिकठिकाणी लावल्या. काठेवाडीतील सुदर्शन तलावासारखी त्यांनी धरणे बांधली. सर्वात महत्वाचे एका माणसाचे दुसऱ्या माणसाच्या प्रती कोणती कर्तव्ये असायला पाहिजे हे शिलालेख व स्तंभालेख कोरून प्रजेच्या मनावर बिंबवले. उदा. वडिलांची मुलांबद्दल असणारी कर्तव्ये अथवा मुलांची वडिलाप्रती कशी वागणूक असावी तसेच पती-पत्नी यांनी एकमेकांच्या प्रती कसा व्यवहार करावा याचाही उल्लेख आहे. सर्व प्रजाजनांना सद् धम्माचे ज्ञान झाल्याने जनतेचा कायम स्वरूपी उद्धार झाला.

 

अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह
कलिंगच्या युद्धानंतर सम्राट अशोकांच्या कारकिर्दीत मौर्य साम्राज्याने ५० वर्षे शांतता व सुरक्षितता अनुभवली. अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार करून या धर्माचा श्रीलंका, आग्नेय व पश्चिम आशिया तसेच युरोपमध्ये प्रसार केला. अशोकाचे सारनाथ येथील स्तंभशीर्षावरील सिंह व अशोकचक्र हे भारताचे राष्ट्रचिन्ह आहे.

या साम्राज्याची लोकसंख्या अंदाजे ५ ते ६ कोटी इतकी होती व हे साम्राज्य हे जगातील लोकसंख्येनुसार मोठे साम्राज्य होते.

 

अशोकस्तंभ
सारनाथ येथील मूळ स्तंभामध्ये स्तंभाच्या अगदी वरच्या भागावर ४ उभे आशियायी सिंह कोरले आहेत. या सिंहांखालच्या पट्टीवर पूर्वेकडे हत्ती, पश्चिमेकडे घोडा, दक्षिणेकडे बैल व उत्तरेकडे एक सिंह कोरला आहे. प्रत्येक जोडीमध्ये एक अशोक चक्र कोरले आहे. हे संपूर्ण शिल्प एका उलट्या कमळावर उभे आहे.

मौर्य साम्राज्याची स्थापना साम्राज्याचा संस्थापक चंद्रगुप्त मौर्य याने चाणक्य या तक्षशिला येथील त्याच्या शिक्षकाच्या मदतीने केली. आख्यायिकांनुसार, चाणक्य मगध प्रांतात गेला. मगधामध्ये नंद घराण्यातील धनानंद हा जुलमी राजा राज्य करीत होता. त्याने चाणक्याला अपमानित केले. सूड घेण्याच्या निर्धाराने चाणक्याने ही जुलमी सत्ता मोडून काढण्याची प्रतिज्ञा केली. दरम्यान, अलेक्झांडर या ग्रीक सम्राटाने बियास नदी ओलांडून भारतावर स्वारी केली होती. अलेक्झांडर बॅबिलोनला परत गेला तिथेच त्याचा इ.स.पू. ३२३ साली मृत्यू झाला. त्यानंतर त्याच्या साम्राज्यात फूट पडली व त्याच्या क्षत्रपांनी (प्रांतशासक) आपापली अनेक वेगवेगळी विखुरलेली राज्ये तयार केली.

ग्रीक सेनापती युडेमस व पिथोन यांनी इ.स.पू. ३१६ पर्यंत राज्य केले. नंतर चंद्रगुप्ताने चाणक्याच्या मदतीने (जो त्याचा आता सल्लागार होता) त्यांना पराभूत केले. मगधातील सत्तेच्या जोरावर त्याने एक मोठे साम्राज्य तयार केले. मगध साम्राज्यावरील विजय चाणक्याने चंद्रगुप्त व त्याच्या सैन्यास मगध जिंकण्यासाठी प्रोत्साहन दिले. चंद्रगुप्ताने चातुर्याने मगध व आजूबाजूच्या प्रांतांमधून नंद राजावर नाराज झालेले तरुण लोक व लढण्यासाठीची साधने गोळा केली. त्याच्या सैन्यामध्ये तक्षशिलेचा भूतपूर्व सेनापती, चाणक्याचे इतर हुशार विद्यार्थी, काकायीच्या पोरस राजाचा मुलगा मलयकेतू व लहान राज्यांचे राज्यकर्ते होते.

 

पाटलीपुत्र आक्रमण

पाटलीपुत्रावर आक्रमण करण्याच्या उद्देशाने चंद्रगुप्ताने एक योजना आखली. युद्धाची घोषणा झाल्यावर मगधचे सैन्य मौर्य सैन्याचा प्रतिकार करण्यासाठी शहरापासून लांब आले. दरम्यान मौर्याचे सेनापती व हेर यांनी मगधाच्या भ्रष्ट सेनापतीला लाच दिली, तसेच राज्यात यादवी युद्धाचे वातावरण निर्माण केले. या गोंधळात मगधाचा युवराज मृत्यू पावला. धनानंदाने शरणागती पत्करली व सत्ता चंद्रगुप्त मौर्याकडे देऊन तो अज्ञातवासात गेला. चंद्रगुप्ताने मगधाचा प्रधान राक्षस यास हे पटवून दिले की त्याची निष्ठा मगधावर राज्य करणाऱ्या नंद वंशावर नसून मगधावर होती. चंद्रगुप्ताने राक्षसाला हेही सांगितले की शहर व राज्य नष्ट होईल असे युद्ध तो होऊ देणार नाही. राक्षसाने चंद्रगुप्ताचा युक्तिवाद मान्य केला व चंद्रगुप्त अधिकृतरीत्या मगध सम्राट झाला. राक्षस हा चंद्रगुप्ताचा मुख्य सल्लागार झाला व चाणक्य मोठा राजनेता झाला.

 

 

चंद्रगुप्त मौर्य
अलेक्झांडरच्या मृत्यूनंतर त्याचा क्षत्रप सेल्युकस निकेटर याने साम्राज्याचा पूर्वेस असलेल्या भारतावर चढाई केली. चंद्रगुप्ताने त्याचा प्रतिकार केला. इ.स.पू. ३०५ मध्ये झालेल्या या लढाईत चंद्रगुप्ताने सेल्युकसचा पराभव केला. त्यानंतरच्या तहानुसार सेल्युकसच्या मुलीचा चंद्रगुप्ताबरोबर विवाह झाला. तर कंभोज-गांधार (पॅरोपॅमिसेड), कंदाहार (अराकोसिया) व बलुचिस्तान (जेड्रोसिया) हे प्रांत मौर्य अधिपत्याखाली आले. बदल्यात ५०० लढाऊ हत्ती चंद्रगुप्ताकडून सेल्युकसला मिळाले, ज्यांचा उपयोग त्याला इप्ससच्या लढाईत झाला. दोन्ही देशांत राजनैतिक संबंध दृढ झाले. मेगॅस्थनिस, डिमॅकस व डायोनिसस हे ग्रीक इतिहासकार चंद्रगुप्ताच्या दरबारात राहत.

चंद्रगुप्ताने पाटलीपुत्र येथे गुंतागुंतीच्या शासनव्यवस्थेसोबत शक्तिशाली व केंद्रीकृत प्रांत निर्माण केला. मॅगॅस्थनिसने लिहिल्याप्रमाणे, चंद्रगुप्ताने भव्य इराणी शहरांशी स्पर्धा करेल अशी ६४ दरवाजे व ५७० मनोरे असलेली मोठी लाकडी भिंत पाटलीपुत्रभोवती बांधली होती. चंद्रगुप्ताचा मुलगा बिंदुसार याने दक्षिण भारतात आपल्या सत्तेचा विस्तार केला. त्याच्या दरबारीही डिमॅकस हा ग्रीक राजदूत होता.

मेगॅस्थनिसने चंद्रगुप्ताच्या सत्तेतील मौर्य जनतेचे शिस्तप्रिय, साधी राहणी, प्रामाणिकता या गुणांचे तसेच निरक्षरतेचेही वर्णन केलेले आहे.

चंद्रगुप्ताचा मुलगा बिन्दुसार चंद्रगुप्तानंतर मौर्य सम्राटपदी आला. त्याच्या कारकीर्दीत मौर्य साम्राज्याचा दक्षिणेत कर्नाटकमध्ये विस्तार झाला. त्याचा मृत्यू इ.स.पू. २७२ मध्ये झाला.

 

सम्राट अशोक
चंद्रगुप्ताचा नातू (बिन्दुसाराचा मुलगा) हा अशोकवर्धन मौर्य हा होता. तो इ.स.पू. २७३ ते इ.स.पू. २३२ इतका काळ मौर्य साम्राज्याचा सम्राट होता. अशोक राजपुत्र असताना त्याने उज्जैन व तक्षशिला येथील बंडे मोडून काढली. राजा म्हणून तो महत्त्वाकांक्षी व आक्रमक होता. त्याने दक्षिण भारतात मौर्य राजवट पुनर्स्थापित केली.

 

 

अफगाणिस्तानातही अशोकाचे शिलालेख
दगडामध्ये कोरलेले अशोकाचे शिलालेख संपूर्ण भारतीय उपखंडात सापडतात. अतिपश्चिमेकडील अफगाणिस्तानपासून दक्षिणेकडे नेल्लोर जिल्ह्यातही ते आढळतात. या शिलालेखांवर अशोकाची धोरणे व कार्य लिहिले आहे. प्रामुख्याने हे शिलालेख प्राकृत भाषेत लिहले गेले आहेत, तरी दोन शिलालेख ग्रीकमध्ये तर एक ग्रीक व एक ॲरेमाइक भाषेमध्ये लिहला गेला आहे. ते असेही प्रमाणित करतात की अशोकाने भूमध्य समुद्राकडील ग्रीक राजांकडेसुद्धा आपले राजदूत पाठवले होते. त्यांच्यावर ग्रीक राजांची नावेदेखील कोरण्यात आली आहेत. अंतियोको (ॲंटियोकस), तुलामाया (टॉलेमी), अंतिकिनी (ॲंटिगोनस), मक (मॅगस), व अलिकासुन्दरो (अलेक्झांडर) यांची नावे त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारल्यामुळे शिलालेखांवर आली आहेत. त्यांच्या प्रदेशाचे (म्हणजेच ग्रीसचे) भारतापासूनचे अंतरही शिलालेखांवर अचूक म्हणजेच “६०० योजने दूर” (एक योजन म्हणजे सात मैल) असे लिहिले आहे (अंदाजे ४,००० मैल).

 

अशोकाच्या साम्राज्याची प्रांतीय रचना
मौर्य साम्राज्य हे चार प्रांतात विभागले गेले होते. अशोकाच्या शिलालेखांच्या अनुसार प्रांतांची नावे तोसली (पूर्वेकडील), उज्जैन (पश्चिमेकडील), सुवर्णनगरी (दक्षिणेकडील) व तक्षशिला (उत्तरेकडील) ही होती. प्रांतीय प्रशासनाचा प्रमुख हा कुमार (राजपुत्र) असे. तो राजाचा प्रतिनिधी म्हणून प्रांतावर राज्य करत असे. राजपुत्राला सहाय्यक म्हणून महाअमात्य व मंत्र्यांची समिती असे. अशीच शासनव्यवस्था साम्राज्याच्या स्तरावरदेखील असे. प्रशासनाचा प्रमुख म्हणून सम्राट तर त्यास साहाय्य करण्यासाठी मंत्रिपरिषद असे.

सम्राट अशोकाच्या साम्राज्याचे सैन्य हे त्याकाळचे सर्वांत मोठे सैन्य होते. या साम्राज्याकडे ६,००,००० पायदळ, ३०,००० घोडदळ व ९,००० लढाऊ हत्ती होते. हेरगिरीचा विभाग अंतर्गत व बाह्य सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणावर माहिती गोळा करत असे. अशोकाने उत्तरार्धात जरी युद्ध व विस्तारास आळा घातला तरी त्याने त्याचे सैन्य शांतता व सुरक्षितता यांसाठी कायम ठेवले.

 

शेतकरी कराच्या बोज्यातून मुक्त
मौर्य साम्राज्याच्या आधिपत्याखाली एकछत्री शासन आल्यामुळे अंतर्गत लढायांना आळ बसला व प्रथमच संपूर्ण भारताची अशी एकत्र आर्थिक व्यवस्था उदयास आली. आधीच्या काळात शेकडो राज्ये, शेकडो लहान सैन्ये, शेकडो प्रमुख तसेच आपापसातील अनेक युद्धे अशी परिस्थिती होती. मौर्य काळात शेतकरी कराच्या व सरकारला पिके देण्याच्या बोज्यातून मुक्त झाले. त्याऐवजी अर्थशास्त्र या चाणक्याच्या ग्रंथातील तत्त्वांच्या आधारे शासनाद्वारे प्रशासित अशा शिस्तशीर व उचित प्रणालीद्वारे कर घेतला जाई.

मौर्य साम्राज्याने संपूर्ण भारतभर एकच चलन स्थापित केले. त्याने भारतात शेतकऱ्यांना व व्यापाऱ्यांना न्याय व सुरक्षा मिळावी म्हणून प्रांतीय नियंत्रकांचे व प्रशासकांचे जाळे निर्माण केले. मौर्य सैन्याने अनेक गुन्हेगारी टोळ्या, प्रांतीय खाजगी सैन्यांना पराभूत केले. फुटकळ जमीनदारांची राज्ये साम्राज्यात विलीन केली. मौर्य शासन कर गोळा करण्यात कडक असले तरी त्याचा खर्च अनेक सार्वजनिक कार्यांवर केला गेला. याच काळात भारतात अनेक कालवे तयार केले गेले. भारतात अंतर्गत व्यापार या काळात नवीन राजकीय एकात्मता व अंतर्गत सुरक्षा यांमुळे मोठ्या प्रमाणावर वाढला.

 

सामाजिक कामे व व्यापार वृद्धी
अशोकाच्या कारकीर्दीत हजारो रस्ते, कालवे, जलमार्ग, दवाखाने, धर्मशाळा व इतर सार्वजनिक कामे झाली. धान्य व कर गोळा करण्यासंबंधीच्या अनेक कठोर कायद्यांच्या शिथिलीकरणाने मौर्य साम्राज्यात उत्पादनक्षमता व आर्थिक हालचाल वाढली. याचबरोबर मौर्य साम्राज्याने आंतरराष्ट्रीय व्यापारासही प्रोत्साहन दिले. ग्रीक क्षत्रपांच्या राज्यांशी मैत्री करून त्यांच्याशी व्यापाराचे आंतरराष्ट्रीय जाळेही वाढविले. सध्या पाकिस्तान व अफगाणिस्तानच्या सीमेवरील खैबर खिंड ही या व्यापारात अतिशय महत्त्वाची होती. पश्चिम आशियातील ग्रीक राज्ये भारताशी मोठ्या प्रमाणावर व्यापार करू लागली. मौर्य साम्राज्याचे मलय द्वीपकल्पाबरोबरही व्यापारी संबंध होते. भारत रेशीम, रेशमी कापड, कपडे तसेच मसाले व विविध खाद्यपदार्थ निर्यात करी. युरोपाबरोबर विज्ञान व तंत्रज्ञानाची देवाणघेवाण केल्याने हे साम्राज्य अधिकच समृद्ध झाले.

मौर्य साम्राज्याची अर्थव्यवस्था ही त्यानंतर अनेक शतकांनंतर उदयाला आलेल्या रोमन साम्राज्यासारखीच होती. दोन्ही साम्राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर व्यापारी संबंध होते. दोन्ही साम्राज्यांत सहकारी संस्थांसारख्या संस्था होत्या.

 

 

 

कलिंगच्या युद्धाने परिवर्तन
कलिंगचे युद्ध हा त्याच्या जीवनातील सर्वांत महत्त्वाचा प्रसंग ठरला. घनघोर युद्धानंतर अशोकाने कलिंगच्या सैन्याचा पराभव केला. या युद्धात व नंतरच्या कत्तलीत अंदाजे १,००,००० सैनिक व नागरिक या युद्धात मरण पावले. त्यातील अंदजे १०,००० सैनकि मागधी तर इतर कलिंगदेशीय होते. हे पाहिल्यावर त्याला इतके घोर युद्ध करून लाखो लोकांच्या मृत्यूस कारणीभूत झाल्याचा पश्चात्ताप झाला. कलिंग जिंकल्यावर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार केला. त्याने हिंसा व युद्ध यांचा त्याग केला.

अशोकाने अहिंसेची तत्त्वे आपल्या राज्यात अंमलात आणली. तसेच प्राण्यांची शिकार करणे तसेच गुलामगिरीची प्रथा बंद केली. त्यानुसार कलिंग युद्धातील पराभूतांना सक्तीने गुलाम केलेल्यांना मुक्ती दिली गेली. अशोकाने आपल्या प्रचंड व शक्तिशाली सैन्याचा उपयोग राज्यात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी केला. अशोकाने आशिया व युरोपीय राष्ट्रांशी चांगले संबंध ठेवले तसेच त्याने तिथे बौद्ध विचारांचा प्रसार केला. ४० वर्षांपेक्षा जास्त काळ त्याच्या राज्यात शांती, समृद्धी व सामंजस्य त्याच्या राज्यात नांदत होते. त्यामुळे तो भारतातील सर्वांत प्रसिद्ध राजांपैकी एक समजला जातो. तो भारतात अजूनही एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून ओळखला जातो.

 

 

सम्राट अशोकाची योग्यता व अखेर :
लोकांच्या वागण्यावर व आचरणावर अपार मेहनत घेऊन अशोक आपल्या प्रजेला चोख न्याय देई. मृत्यूदंडाची शिक्षा नसेच. शिक्षणाच्या प्रसाराकरिता त्याने पुष्कळ पैसा, धन दौलत खर्च केली. नालंदा येथील विश्वविद्यालयास तो सढळ हाताने मदत करीत असे. सुमारे चाळीस वर्षे राज्य केल्यावर अशोक इ. स. पूर्व २३२ मध्ये मृत्यु पावला. तो बौद्ध धम्माचा चाहता होता. त्या धम्माचा त्याने जगभर प्रसार केला. त्यामुळे त्याची कीर्ती जगभर झाली. तो न्यायी होता. इतर धर्माच्या लोकांसही तो उदारपणे वागवीत असे. त्याच्या मागून त्याचा नातू संप्रति मौर्य मगधच्या गादीवर बसला. त्यानंतर पुढे काही वर्षे मौर्यवंशातील पुरुषांनी राज्य केले. मौर्य साम्राज्याच्या काळात बौध्द धम्म जगभर पसरून त्याचा नावलौकिक वाढला मात्र भारतातील बौध्द धम्माच्या पतनाबाबत जग अत्यंत खेद जनक आश्चर्य व्यक्त करत आहेत कारण भारतीय मातीतील हा धम्म चीन, जपान, बर्मा, सियाम, अनाम, इंडो चायना, सिलोन(श्रीलंका), मलाया द्वीप समूहातील अनेक बेटांव

मौर्य साम्राज्याच्या काळात बौध्द धम्म जगभर पसरून त्याचा नावलौकिक वाढला मात्र भारतातील बौध्द धम्माच्या पतनाबाबत जग अत्यंत खेद जनक आश्चर्य व्यक्त करत आहेत कारण भारतीय मातीतील हा धम्म चीन, जपान, बर्मा, सियाम, अनाम, इंडो चायना, सिलोन(श्रीलंका), मलाया द्वीप समूहातील अनेक बेटांवर पोहोचला. कारण पुढे मौर्य वंशातील शेवटचा राजा बृहद्रथ मौर्य गादीवर असतांना पुष्यमित्र शुंग या त्याच्या ब्राह्मण सेनापतीने कपटाने त्याचा खून केला. हि घटना इ. स. पूर्व १८५ ला झाली. अशा प्रकारे या गौरवशाली साम्राज्याचे पतन करण्याचे कार्य ब्राह्मनाद्वारे झाले.
पुष्यामित्रानंतर त्याचा मुलगा अग्निमित्र मगधच्या गादीवर बसला परंतु त्याने फक्त ८ वर्षे राज्य केले. तो व त्यानंतरचे शुंगवंशातील राजे नालायक निघाले. ब्राह्मण धर्म (वैदिक) धर्माभिमानी वंशजांनी भारतभर गडबड, गोंधळ व अशांतता माजवली. शुंगवंशातील शेवटचा राजा देवभूमी यांचा देखील वसुदेव नामक प्रधानाने खून केला. वसुदेव देखील वैदिक धर्माचा अभिमानी होता. शुंग व कण्व राजे वैदिक (ब्राह्मणी) धर्माचे अभिमानी होते. ते ब्राह्मणांचे आश्रयदाते होते. त्यामुळे या काळात पोथ्या, पुराणे तयार झाली. पतंजली हा याच काळातील असून त्याने संस्कृत व्याकरणावर ग्रंथ लिहिला.
मनुस्मुर्ती, रामायण व महाभारत हे ग्रंथ देखील याच काळात उदयास आले.

 

 

अस्त
अशोकानंतर पन्नास वर्षे दुर्बळ सम्राटांचे राज्य होते. दक्षिणेकडे सातवाहन साम्राज्य व वायव्येकडे ग्रीक-बॅक्ट्रिया राजतंत्र या सत्तांच्या उदयामुळे मौर्य साम्राज्याचा विस्तार घटला. अखेरचा मौर्य सम्राट बृहद्रथ याची हत्या त्याच्या ब्राह्मण सेनापती पुष्यमित्र शुंग याने ख्रि.पू. १८५ मध्ये एका लष्करी संचलनात केली व शुंग राजवंशाची स्थापना केली.

 

 

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: AshokchakraChandragupta MauryaEmperor AshokaMaurya EmpireNational Emblem Of IndiaState Systemअशोकचक्रचंद्रगुप्त मौर्यभारताचे राष्ट्रचिन्हमौर्य साम्राज्यराज्यव्यवस्थासम्राट अशोक
Previous Post

उन्हाळी भुईमुगाची करा लागवड… मिळवा खरीपापेक्षा दीडदुपटीने उत्पादन… असे करा व्यवस्थापन

Next Post

तोडणीवर आलेल्या तुरीच्या शेंगांची अशी घ्या काळजी..

Next Post
तोडणीवर आलेल्या तुरीच्या शेंगांची अशी घ्या काळजी..

तोडणीवर आलेल्या तुरीच्या शेंगांची अशी घ्या काळजी..

ताज्या बातम्या

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

गव्हाचे पीक पिवळे

गव्हाचे पीक पिवळे पडण्याची “ही” आहेत कारणे; जाणून घ्या प्रभावी उपाय …

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 18, 2025
0

कॉफीची लागवड

कॉफीची लागवड करून शेतकऱ्याची 30 लाखांची कमाई!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 17, 2025
0

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग

सांगलीत ब्लू जावा केळीचा यशस्वी प्रयोग; 100 रुपये किलोने विक्री

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 16, 2025
0

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

राज्यात नवा पणन कायदा: शेतकऱ्यांसाठी वरदान की कॉर्पोरेट कंपन्यांसाठी पायघड्या?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 15, 2025
0

नागपूर हिवाळी अधिवेशन

नागपूर हिवाळी अधिवेशन : ₹75,000 कोटींच्या पुरवणी मागण्या; शेतकऱ्यांच्या पदरात काय?

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 13, 2025
0

बायो फर्टीलायझर मार्केट

बायो फर्टीलायझर (Bio fertilizer) मार्केट 10 वर्षात तिप्पट वाढणार

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 12, 2025
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

अव्होकॅडोची शेती

‘कोरडवाहू भागात अव्होकॅडोची शेती करून 10 लाखांची कमाई !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 23, 2025
0

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

आंब्याच्या बागेतून करोडोंच्या व्यवसायापर्यंत प्रेरणादायी प्रवास

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 20, 2025
0

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

खारपाड जमीन, मिठागरात खजूर लागवडीचा यशस्वी प्रयोग

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 19, 2025
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish