तांबे हे एक असे धातू आहे, ज्याच्या स्पर्शानं शरीरापासून अनेक आजार दूर राहतात. हेच कारण आहे की, अनेक लोक तांब्याचं ब्रेसलेट घालतात. तांब्याच्या कड्यामुळे शरीरात सकारात्मक प्रभाव निर्माण होतो. तांबे म्हणजेच कॉपरमध्ये अनेक प्रकारचे चिकित्सक गुण असतात. अनेकांना तुम्ही तांब्याची अंगठी किंवा कडं वापरताना पाहिलं असेल. या सर्वच वस्तू खास असतात आणि इतर धातूंपेक्षा वेगळ्या असतात.
तांब्यात अँटी बॅक्टेरिअल आणि अँटी मायक्रो बॅक्टेरिअल तत्व आढळतात. जे शरीराला वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करण्यास मदत करतात. मॉडर्न सायन्सने सुद्धा हे मान्य केलं आहे की, तांब्याचा जर शरीराल स्पर्श झाला तर याने अनेक आजार दूर होतात.
हेच कारण आहे लोक तांब्याचं ब्रेसलेट वापरतात. चला जाणून घेऊ तांब्याने आरोग्याला होणारे फायदे.
चमकदार होते त्वचा
तांब्यात अँटी-ऑक्सिडेंट गुण असतात जे फ्री रॅडिकल्सना शरीरात विषारी पदार्थ पसरवण्यापासून रोखतात. याने त्वचा निरोगी राहते. सोबतच याने त्वचेचे सामान्य रोगही दूर होतात. तसेच याची अंगठी वापरल्याने हात, बोटे आणि पायांवरील सूजही कमी होते. गुडघ्याचं दुखणं होतं बरं
तांब्याचं कडं, अंगठी किंवा बांगडी घातल्यानं गुडघ्याचं दुखणं कमी होतं, असं सांगितलं जातं. हे कडे घातल्याने हिवाळ्यात वाढणारं दुखणं कमी होतं. जुने दुखणे अर्थात ऑस्टियोआर्थराइटिसमध्ये सुद्धा हे खूप फायदेशीर ठरतं. तांब्यामध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात त्यामुळे ते घातले पाहिजे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवावी तांबे शुद्ध असावे.
हृदयासाठी फायदेशीर
तांब्याच्या कमतरतेनं शरीरात असंतुलन निर्माण होतं आणि रक्तात कोलेस्ट्रॉलचं प्रमाण वाढतं. त्यामुळे हृदय आणि नसांवर वाईट परिणाम होऊ शकते. म्हणून यावर उपाय म्हणून तांब्याचे कडे किंवा ब्रेसलेट घालावे. तांब्याला क्रॉस-लिंक फायबर, कोलेजन आणि इलास्टिनसाठी विशेष मानलं जातं, म्हणून तांबे अवश्य घालावे.
इम्यूनिटी पॉवर वाढवतं –
तांबे शरीरात असलेले अनेक टॉक्सिन कमी करण्याचं काम करतं. तांबे एंजाइम्सच्या प्रतिक्रियेलाही ट्रिगर करतं, जे शरीरात हिमोग्लोबिन बनवण्यात मदत करत असतात.
त्वचा तरुण ठेवते –
तांब्यात अँटी-ऑक्सिडंट गुण असतात, जे शरीरातील वाईट पदार्थ वाढण्यापासून रोखतात. तांबे घातल्यानं त्वचा तरुण राहते.
राग कमी होतो –
तांब्याचे ब्रेसलेट घातल्यानं मन शांत राहतं आणि रागावर नियंत्रण मिळवता येतं.
सौजन:- आरोग्य जागर