• Cart
  • Checkout
  • Home
    • आमच्याविषयी
  • My account
  • Services
  • Shop
AgroWorld
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स
No Result
View All Result
AgroWorld
No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर

पावनखिंड – भाग ११

टीम ॲग्रोवर्ल्ड by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 27, 2020
in इतर
0
पावनखिंड भाग – 5  बाजी प्रभू – इतिहास सन्मानाचा, अभिमानाचा, अतुल्य पराक्रमाचा
Share on WhatsappShare on Facebook
ADVERTISEMENT

सिंध गावच्या देशपांडेवाड्यात एकच धावपळ चालली होती. वाड्याच्या तटावरची सारी तणं, पिंपळाची रोपटी काढून टाकून तट स्वच्छ केला होता. वाड्याच्या सदरसोप्याचे शिसवी नक्षीदार खांब तेलातला हुरमंज लावल्यामुळं लकाकत होते. वाड्याच्या भिंती पिवळ्या धोट पिवडीनं रंगवल्या होत्या. पहिल्या चौकातील जमीन शेणसड्यानं सारवल्यामुळं चौक अधिकच प्रशस्त भासत होता. सणासुदीचे कपडे घातलेले सेवक वाड्याच्या आत-बाहेर करीत होते.
दोन प्रहर टळत आली.
फुलाजी-बाजी आपल्या सोप्यात बैठकीवर बसले होते.
सोनाबाई, गौतमाई दाराशी अधोवदन उभ्या होत्या. दोघा भावांचं बोलणं त्या ऐकत होत्या.


‘बाजी, तू हवं, ते म्हण.’ फुलाजी म्हणाले, ‘त्या पोराच्या अंगी मोठी धमक आहे. वय केवढं कोवळं! अजून ओठावरच्या मिशीला रंग फुटला नाही. पण काय हिंमत!’
‘खरं आहे, दादा!’ बाजी म्हणाले, ‘आजवर या बाजीच्या डोळ्याला डोळा भिडवण्याची कुणाची ताकद नव्हती. पण राजांच्या डोळ्यांतलं तेज पाहवत नव्हतं. राजांच्या बोलण्यात नागाला डोलवणाऱ्या पुंगीची साद आहे. त्यांच्या डोळ्यांत चित्त्याच्या नजरेतला धाक आहे. केव्हा हातचा पट्टा गळून पडला आणि त्यांच्या मिठीत सापडलो, तेही कळलं नाही.’
फुलाजी हसले. म्हणाले,
‘बाजी, तू काही म्हण. त्या पोराच्या अंगात दैवी शक्ती आहे. आजवर मी ऐकत होतो. त्याला पाहिलं आणि ते पटलं, बघ.’
‘त्यांना भवानी प्रसन्न झालेय, म्हणे!’ गौतमाई म्हणाल्या.


‘का होणार नाही?’ फुलाजी उठत म्हणाले, ‘त्यांन वाईट काय केलं? आज या मुलखात गोरगरिबांचा वाली कोण आहे? आजवर एवढया आयाबहिणींची अब्रू गेली. कुणाला त्याची चाड होती? या पोरानं सांगितलं, असलं या पुढं चालायचं नाही. रांझ्याचा पाटील लई माजोरी. त्यानं असंच केलं. हात-पाय तोडले त्याचे. त्याच्या मागं का माणसं धावणार नाहीत? तरी सांगत होतो, बाजी! आपल्या राजानं सलूख केला असता, तर फार बरं झालं असतं. पण तुझा सल्ला त्यानं मानला.’
बाजी उफाळले,
‘मला काय माहीत, शिवाजी राजे असे असतील, म्हणून! जसे जेधे आले, तसे शिवाजी….’
‘तिथंच गल्लत झाली. आज तेच कान्होजी जेधे शिवाजीच्या संगती आहेत. ठीक आहे. झालं-गेलं गंगेला मिळालं. पण शिवाजी राजे येतील, नव्हे?’
बाजी म्हणाले,
‘जरूर येतील! तसा सांगावा त्यांनी धाडला आहे.’
फुलाजींनी उभ्या असलेल्या सोनाबाई, गौतमाईंच्याकडं पाहिलं.


त्यांनी सांगितलं,
‘शिवाजीराजे केव्हाही येतील. आज इथं ते मुक्कामाला आहेत.’
‘सगळं झालं आहे. आपण चिंता करू नये.’ गौतमाईंनं विश्वास दिला.
‘ठीक आहे. आम्ही सदरेवर जातो.’
बाजी-फुलाजी सदरेवर आले, तेव्हा सदरेवर लोड, तक्क्यांनी सजलेली पांढरी धोट बैठक तयार होती. सदरेवर गावचा तात्याबा म्हसकर उभा होता.
बाजी-फुलाजी सदरेवर येताच त्यांचं लक्ष तात्याबा म्हसकरकडं गेलं.
‘बसा तात्या! लवकर आलात?’
म्हातारा तात्याबा मिस्किल हसला. तो म्हणाला,
‘धनी, कोंबडा झाकून ठेवला, म्हणून सुर्य उगवायचा ऱ्हातो काय?’
‘काय?’ बाजींनी विचारलं.
‘साऱ्या गावभर नव्हं, तर साऱ्या गावठाण्यात आवई उठलीया. शिवाजी राजं आज येनार. खरं हाय?’
‘होय! ते येणार आहेत.’ बाजी म्हणाले.
‘आनि आमांस्नी त्याची खबर न्हाई.’ तात्याबा म्हसकर उफाळला, ‘तुमचा बा असता, तर त्यानं हे केलं असतं?’
‘तसं नाही, तात्याबा! राजांनी सक्त ताकीद दिली, आम्ही येणार, हे कुणाला सांगू नका.’
‘मग साऱ्या गावाला कसं कळलं?’
‘तेच आमचं दुर्दैव आहे. ह्या घरात पळी पडली, तरी, हंडा पडला, म्हणून साऱ्या गावाला कळतं!’
तात्याबा शांत झाला. तो म्हणाला,
‘मला बलवलं न्हाई, म्हनून राग न्हाई. शिवाजी राजा आता ईल. त्याला मानानं घरात घ्या.’


‘म्हणजे?’ फुलाजी उद्गारले.
‘किती केलं, तरी आपला राजा हाय त्यो! दारात पाच सुवासिनी उभ्या करा. भाताचे मुटके ठेवा. त्याला ओवाळून घरात आणा. सदरेजवळ घंगाळ ठेवा. पाय धुऊन तो पायरी चढंल.’
तात्याबा म्हणाला, त्यात काही खोटं नव्हतं.
बाजी तत्परतेनं वाड्यात गेले. परत धावपळ झाली. आरत्या सजल्या. सदरेच्या खाली पायऱ्यांजवळ चकचकीत तांब्याचं घंगाळ ठेवलं गेलं.
तात्याबा ती सारी धावपळ थंडपणे पाहत होता.
किंचित रोषानं बाजींनी विचारलं,
‘झालं मनासारखं?’
‘आता झालं.’ तात्याबा म्हणाला, ‘पन त्यो राजा हाय. त्यो काय एकटा येनार? त्याच्या संगती शिबंदी असंल. ते आल्यावर त्यांस्नी गूळपानी…’
‘ती व्यवस्था केली आहे.’
‘मग झालं, तर!’ तात्याबा निर्विकारपणे म्हणाला.
त्याच वेळी यशवंत धावत आला. तो म्हणाला,
‘धनी, टापांचा आवाज येतूया….’
बाजी-फुलाजींनी आपली पागोटी सावरली. सुवासिनी प्रवेशद्वाराजवळ गेल्या. त्यांत सोनाबाई-गौतमाईही होत्या.

🚩क्रमशः🚩

Share this:

  • Click to share on Facebook (Opens in new window) Facebook
  • Click to share on X (Opens in new window) X
Tags: कान्होजी जेधेगौतमाईतात्याबापावनखिंडप्रवेशद्वारबाजीम्हसकरशिवाजी राजेसोनाबाईस्वराज्य
Previous Post

फुफ्फुसांचं आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी या गोष्टी ठेवा लक्षात

Next Post

जांभूळ उत्पादनाचा संपन्न वारसा – बाहडोली गाव

Next Post
जांभूळ उत्पादनाचा संपन्न वारसा – बाहडोली गाव

जांभूळ उत्पादनाचा संपन्न वारसा - बाहडोली गाव

ताज्या बातम्या

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम

महाराष्ट्रात थंडीचे पुनरागम: जाणून घ्या सद्यस्थिती, कारणे आणि पुढील 72 तासांचा हवामान अलर्ट

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 16, 2026
0

भाजीपाल्याची लागवड

जानेवारी-फेब्रुवारीत करा “या” पिकांची, फळ-भाजीपाल्याची लागवड अन् मिळवा रग्गड उत्पन्न!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 14, 2026
0

मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा

पशुपालकांनो, आता मोबाईलच सांगणार तुमच्या नुकसानीचा आकडा! लुवास विद्यापीठाचा ‘हा’ ॲप ठरणार गेम चेंजर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 13, 2026
0

जैन हिल्स कृषी महोत्सव

जैन हिल्स कृषी महोत्सव 2025-26: जिथे तंत्रज्ञान आणि परंपरा एकत्र येऊन शेतकऱ्यांचे भविष्य घडवतात

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 11, 2026
0

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

महाराष्ट्र थंडीने गारठला: पाच वर्षांतील सर्वात तीव्र हिवाळा; हवामान खात्याकडून सतर्कतेचा इशारा

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

जानेवारी महिन्यात करावयाची महत्त्वाची शेती कामे

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 10, 2026
0

तांत्रिक

स्पायरल सेपरेटर

मळणीनंतर सोयाबीन व तूर साफसफाईसाठी- स्पायरल सेपरेटर

by टीम ॲग्रोवर्ल्ड
December 22, 2025
0

प्रिसिजन फार्मिंग

काय आहे प्रिसिजन फार्मिंग ? ; जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
July 3, 2025
0

पार्सली भाजी काय आहे ?

200 रुपये किलोची पार्सली भाजी काय आहे ? जाणून घ्या…

by टीम ॲग्रोवर्ल्ड
May 20, 2025
0

केळी बाग

केळी बागेचे ऊन्हापासून असे करा संरक्षण !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
April 24, 2025
0

जगाच्या पाठीवर

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप

शाळकरी बहिणींचा शेळीच्या दुधापासून कोटीचं स्टार्टअप !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

स्कॉटलंड

दुधाला भाव नाही, घामाचे दाम नाही: स्कॉटलंडमध्ये 20 वर्षांतील सर्वात तीव्र डेअरी संकट!

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 20, 2026
0

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

जळगाव जिल्ह्यात केळी पिकाने बदलले शेतकऱ्यांच्या दोन पिढ्यांचे जीवनमान !

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 21, 2026
0

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी

उत्तर भारतात पुन्हा कडाक्याची थंडी; महाराष्ट्रात हळूहळू तापमान वाढणार – IMD

by टीम ॲग्रोवर्ल्ड
January 19, 2026
0

मुख्य कार्यालय

ॲग्रोवर्ल्ड
दुसरा मजला,बालाजी संकुल,
खाँजामिया चौक, जळगाव 425001

संपर्क :  9130091621/22/23/24/25

विभागीय कार्यालय- पुणे

ॲग्रोवर्ल्ड
बी- 507, अवंती अपार्टमेंट, सर्वे.नं. 79/2, भुसारी कॉलनीच्या डाव्या बाजूला, पौंड रोड, कोथरूड डेपो, पुणे- 411038

संपर्क : 9130091633

विभागीय कार्यालय- नाशिक

ॲग्रोवर्ल्ड

तळमजला,  प्रतिक अपार्टमेंट, गणपती मंदिर शेजारी,  सावरकर नगर, गंगापूर रोड, नाशिक- 422222

संपर्क :  9130091623

विभागीय कार्यालय- संभाजीनगर (औरंगाबाद )

ॲग्रोवर्ल्ड

शॉप क्र : 120,
कैलाश मार्केट, पदमपुरा सर्कल,
रेल्वे स्टेशन रोड,
संभाजीनगर (औरंगाबाद ) – 431005
संपर्क : 9175050178

  • Cart
  • Checkout
  • Home
  • My account
  • Services
  • Shop

© 2020.

No Result
View All Result
  • होम
  • हॅपनिंग
  • शासकीय योजना
  • पशुसंवर्धन
  • ग्रामविकास योजना
  • यशोगाथा
  • तंत्रज्ञान / हायटेक
  • तांत्रिक
  • हवामान अंदाज
  • कृषीप्रदर्शन
  • कार्यशाळा
  • इतर
    • वंडरवर्ल्ड
    • महिला व बालकल्याण
    • आरोग्य टिप्स

© 2020.

EnglishEnglish